ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आठवड्यातून केवळ दोन वेळा वापरा अँटिएजिंग फेसमास्क, म्हातारपण ठेवा दूर

आठवड्यातून केवळ दोन वेळा वापरा अँटिएजिंग फेसमास्क, म्हातारपण ठेवा दूर

वाढतं वय आपण कोणीच थांबवू शकत नाही. पण वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू न देणे हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. साधारणतः वयाच्या तिशीनंतर चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणं दिसू लागतात. यालाच एजिंग असंही म्हणतात. सध्याच्या लाईफस्टाईलनुसार तर फारच कमी वयात म्हातारपणाची लक्षणं दिसून येतात. पण तुम्ही जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला नक्कीच याचा परिणाम भोगावा लागतो. तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागता. पण यावर एक उत्तम उपाय आहे जो तुम्ही तुमच्या घरीच करू शकता आणि तेही आठवड्यातून दोन वेळा तुम्ही घरी तयार करण्यात आलेला हा अँटिएजिंग फेसमास्क वापरलात तर तुम्ही तुमच्या म्हातारपणापासून नक्कीच दूर राहू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी लागणाऱ्या वस्तू या तुम्हाला स्वयंपाकघरातच सापडतील आणि तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज भासणार नाही. स्वयंपाकघरातील ती महत्वाची वस्तू म्हणजे मेथी दाणे. मेथी दाणे हे त्वचेला अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच चेहऱ्यावरील मुरूमं, पुरळ यासारख्या समस्यांपासूनही तुम्हाला सुटका मिळवून देण्यासाठी मेथी अतिशय उपयुक्त आहे.

असा बनवा मेथीचा फेसपॅक

असा बनवा मेथीचा फेसपॅक

Shutterstock

मेथीचा फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला मेथी दाणे आवश्यक आहेत. 

ADVERTISEMENT
  • सर्वप्रथम तुम्ही मेथी दाणे वाटून घ्या आणि त्याची पावडर तयार करा. या  पावडरमध्ये दही मिक्स करा. याचे प्रमाण म्हणजे तुम्ही 2 चमचे मेथी पावडरमध्ये 3 चमचे दही मिक्स करा. 
  • तयार पेस्ट कमीत कमी तुम्ही अर्धा तास चेहऱ्यावर तसेच लाऊन ठेवा
  • पेस्ट जेव्हा बऱ्यापैकी सुकेल तेव्हा ती सर्क्युलर मोशनमध्ये रगडा आणि मग चेहऱ्यावरून ती पेस्ट काढा 
  • जर तुम्हाला अधिक सुकलेले वाटत असेल तर त्यावर गुलाबपाणी शिंपडून  तुम्ही हलक्या हाताने रगडून हे काढू शकता

सुरकुत्या घालविण्यासाठी असा करा चेहऱ्याला मसाज

पहिल्याच वापरात दिसून येईल फरक

पहिल्याच वापरात दिसून येईल फरक

Shutterstock

मेथीचा हा फेसमास्क लावल्यानंतर तुम्हाला पहिल्याच वापरत नक्की फरक दिसून येईल. तुमची त्वचा अधिक मुलायम  आणि मऊ झालेली दिसून येईल. कारण मेथीचा हा फेसमास्क तुमच्या  चेहऱ्यावर डेड स्किन काढून टाकण्यास  मदत  करतो आणि त्वचेमधील आतील सूज कमी करण्यासाठीही याची मदत होते. हा फेसपॅक इतका प्रभावी आहे की, आठवड्यातून  याचा दोन वेळा उपयोग केल्यानंतर तुम्हाला याचा अप्रतिम परिणाम पाहायला मिळतो.  तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जाण्यास आणि चेहऱ्यावर सूज अथवा प्रदूषणाने त्रास होत असल्यासही याचा उपयोग करता येतो. 

ADVERTISEMENT

मेथीमधील अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेवरील फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यास मदत करते. त्वचेमध्ये लवकर म्हातारपण येणारे फ्री रॅडिकल्सदेखील असतात. त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात. यामुळे विषारी तत्व निर्माण होतात आणि त्वचेला अधिक त्रास होतो. यामुळे त्वचेची सुंदरता कमी होते. पण मेथीमधील अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे त्वचेवरील सूज कमी  करून त्वचा अधिक सुंदर करण्यास याचा उपयोग करून घेता येतो. तसंच चेहऱ्यावरील डाग कमी  करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

DIY: हिवाळ्यात केसगळतीची असेल समस्या तर घरीच बनवा मेथी दाण्याचं तेल

मेथीमधील गुण ठरतात उपयोगी

मेथीमधील गुण ठरतात उपयोगी

Shutturstock

ADVERTISEMENT

मेथीमध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटिइन्फ्लेमेटरी गुणांसह प्रोटीन, निकोटिनिक अॅसिड, फायबर हे जास्त प्रमाणात आढळते. यामुळे चेहऱ्याला अधिक चांगले पोषण मिळते आणि त्याशिवाय चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम होण्यापासूनही वाचवते. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी किमान तुम्ही मेथी दाण्याचा उपयोग केल्यास, तुमच्या त्वचेला अधिक चांगले पोषण मिळू शकते हे लक्षात ठेवा.

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे (Benefit of Fenugreek Seeds For Hair, Skin & Health in Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT