दिवसभराचे नियोजन आखताय... स्वतःसाठी वेळ काढायला विसरु नका!

दिवसभराचे नियोजन आखताय... स्वतःसाठी वेळ काढायला विसरु नका!

मागच्या वर्षातील अनेक आव्हान, महामारी, आर्थिक मंदीने ग्रासलेल्या एका दुःखद वर्षानंतर अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. या 10 महिन्यांच्या कालावधीचे काहींनी अचूक नियोजन केले तर काहींना अजूनही या परिस्थितीशी जुळवून घेता आलेले नाही. आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे वेळ. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवण्यासाठी सर्वांनाच आवडेल परंतु आजच्या हा व्यस्त जीवनशैलीमुळे हे अशक्य झाले आहे. प्रत्येकाने वेळेचे महत्त्व जाणून वेळेचे भान पाळलेच पाहिजे. स्वत:साठी पुरेसा वेळ देणे ही देखील काळाची गरज ठरली आहे. नेहमीच घड्याळ्याच्या काट्यांबरोबर धावताना कधीतरी थांबून आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देत आहोत का हे नक्की विचारा, आपण आहोत म्हणून हे जग आहे याचा विसर पडू देऊ नका. खरं तर आपण आपल्यासाठी वेळ काढतच नाही. विशेषतः महिला. यासाठीच आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुजाता साळवी यांनी काही महत्त्वाच्या बाबी आमच्यासह शेअर केल्या आहेत. त्या खास तुमच्यासाठी. हे वाचल्यावर नक्की याचा विचार करा.

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

स्वतःसाठी वेळ काढल्याचा फायदा

Shutterstock

दिवसातून किमान एक तास जरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकत असाल तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हालाच होणार आहे. वयाच्या २० वर्षापासून मी दिवसातील किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवायला हवा. हा संपूर्ण वेळ फक्त स्वतःसाठी असल्याने त्यातून मिळणारा आनंद स्वतःला उपभोगता येतो. सुरुवातीला महाविद्यालयीन शैक्षणिक, करिअरकडे फोकस करणे अशा कारणांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते पण त्यानंतर मात्र स्वतःला पुरेसा वेळ देण्याचा संकल्पच करायला हवा. संसारातील ही आव्हानं पेलताना अनेकदा स्वतःसाठी वेळ देणे शक्यच होत नाही. काहींना स्वतःसाठी वेळ देणे हे स्वार्थी किंवा मूर्ख कृत्य वाटू शकते परंतु ज्यांनी वेळेचे अचूक नियोजन आखले आहे त्यांना मात्र याचे महत्त्व नक्कीच कळू शकते.

  • स्वतःसाठी वेळ राखून ठेवण्यास सुरुवात केल्यावर स्वतःची खरी ओळख पटते
  • स्वतःचे सामर्थ्य कळते. एक दिवस तसेच एका आठवड्यासाठी काही मिनिटे निश्चित केली आणि तेवढा वेळ स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निश्चय केला. यामधून प्रत्येक वेळी एक वेगळाच आनंद मिळतो ज्यामुळे दिवसेंदिवस आपलेच मनोबल वाढते
  • या सर्व सकारात्मक परिणामांमुळे प्रत्येकवेळी यातून सकारात्मक उर्जा मिळतेच. 

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

काही सोप्या टिप्स

स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवावा यासाठी काही सोप्या टिप्स सुजाता साळवी यांनी सांगितल्या आहेत. तुम्हीही तुमच्या दिवसाचं नियोजन आखताना या टिप्सचा वापर करून घेऊ शकता. 

  • आदल्या रात्री उद्याच्या दिवसाची योजना आखली पाहिजे, झोपण्यापूर्वी मी काय काय गोष्टी केल्या आहे आणि कोणत्या गोष्टी करणे शिल्लक आहे याचे गणित आपल्या डोक्यात मांडावे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी करता येणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. जेणेकरून सर्व काही सुरळीतपणे सुरु राहते आणि या सा-या नियोजनातूनच स्वतःसाठी वेळ कसा राखून ठेवता येईल याचे नियोजन आखून तसा तासभराचा वेळ शोधून ठेवता येतो
  • सहसा महिलांना दुपारची वेळ अनुकूल असते. हा एक तास स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यास आणि छंद जोपासण्याकरिता देता येतो. या वेळेत आवडणारे लेखन अथवा वाचन करणे अथवा तुम्ही यावेळात तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता. हा वेळ केवळ स्वतःला आनंद देणा-या गोष्टींकरिता खर्च करणे गरजेचे आहे
  • काही वेळेस वॉर्डरोब व्यवस्थितशीररित्या रचण्यात घालवणे. जेणेकरुन अस्ताव्यस्तपणामुळे कंटाळवाणं वाटणार नाही. काही वेळेस नेल आर्ट करणे, डोळे अथवा त्वचेची काळजी घेण्याच्या उद्देशाने या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. 
  • काहीवेळा व्हिडिओज किंवा नेटफ्लिक्सदेखील पाहणे. एखादी रोमँटिक कादंबरी वाचणे. तर काही वेळेस पॉवर नॅप अर्थात डुलकी घेणे आणि दिवसभरातील तणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे. असे बरेच इतर मार्ग आहेत ज्यात आपण हा एक तासाचा दर्जेदार वेळ आपल्या स्वतःसोबत घालवू शकतो. हे लहान लहान गोष्टी आपल्या आपल्यासाठी बरेच काही साध्य करण्यात मदत करते. 

आपण या नवीन वर्षात या पर्यायाचा नक्की वापर कराल अशी आम्हालाही  आशा आहे. या मी टाईममध्ये स्वतःचं परीक्षण करा, आपण कुठं कमी पडतोय का, आपण काय चांगलं करतोय आणि आणखी काय चांगलं करू शकतोय याची जाणीव आपल्याला या वेळी नक्कीच होईल.पण स्वतःसाठी रोज वेळ काढायला विसरू नका. कारण त्यामुळेच तुम्ही स्वतःचीही प्रगती करू शकता. 

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक