2,11,20,29 जन्मतारीख असलेल्यांचा असतो असा स्वभाव

2,11,20,29 जन्मतारीख असलेल्यांचा असतो असा स्वभाव

ज्यांची जन्मतारीख 2,11, 20,29 आहे. याचा अर्थ त्यांचा मुलांक2 आहे. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा फार वेगळा असतो. या व्यक्ती नेमक्या कशा असतात याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या व्यक्तींचा नेमका स्वभाव कसा असतो ते सांगणार आहोत. या चार तारखा असलेल्या व्यक्ती तुमच्याही जवळच्या असतील आणि त्यांचा स्वभावही अगदी तसाच असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत ही पोस्ट नक्की शेअर करा.

जाणून घ्या 1 मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तरी कसा

  • 2, 11,20,29 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मुलांक हा 2 असतो.  हा एक स्त्री अंक असल्यामुळे हा मुलांक असलेल्या व्यक्ती या फारच भावूक असतात. त्यांच्या मनात करुणा, दया भाव हा भरलेला असते. अशा व्यक्ती या काहीशा लाजाळू देखील असतात. 
  • अशा व्यक्ती लाजाळू असल्या तरी ध्येयवादी असतात. आता  इतर मुलांकाच्या तुलनेत यांच्या महत्वाकांक्षा या फार लहान असतात. कोणतीही मोठी स्वप्न यांना पाहायला आवडत नाही. अगदी साधी साधी स्वप्न पाहात ते पूर्ण करणे यांचे उद्दिष्ट्य असते. 
  • स्वप्नाळू स्वभाव आणि त्यात रमणं या लोकांना फार आवडते. यांच्या वाणीवर यांचे प्रभुत्व असल्यामुळे या तारखा असलेल्या व्यक्ती या उत्तम लेखक असतात. त्यांना लिखाणाच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते.  चांगली वाणी असल्यामुळे यांच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला समजावण्याची ताकद असते. कमी बोलत असल्या तरी अशी लोक समाजप्रिय असतात. 
  • 2 मुलांक असलेल्या व्यक्ती या थोड्या भित्र्या स्वभावाच्या असतात. एखाद्या भांडणात त्या पटकन पडत नाहीत. त्यात त्यांचे हित असले तरी अशा गोष्टी कशा टाळायच्या याच्या पळवाटा त्यांनी काढलेल्या असतात. 

जाणून घ्या जानेवारीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात

Instagram

  • यांचा लहरी आणि स्वप्नाळू स्वभाव त्यांना एका ठिकाणी फार काळासाठी टिकू देत नाही. पण ही व्यक्ती मवाळ असल्यामुळे यांचा मित्रांचा गोतावळा हा अधिक असतो. त्यांना कायम मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात राहायला फार आवडते आणि मित्रांनाही या व्यक्ती मनापासून आवडतात. 
  • मुलांक 2 असलेल्या व्यक्तींना फिरायला खूप आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अशा पिकनिक करायला त्यांना आवडतात. अशा व्यक्ती ट्रेक आणि पिकनिकचे सतत प्लॅन्स करत असतात. एखादी व्यक्ती जाण्याच्या आधीपासूनच फारच उत्साही असेल तर तिचा मुलांक 2 आहे हे समजून जावे. 
  • मुलांक 2 असलेल्या व्यक्ती या सतत काहीना काही विचार करत असतात. त्यांच्या विचारांमधून त्यांची कधीच सुटका होत नाही. सतत विचार करत राहणे त्यांच्या मुलांकाचा स्वभावदोष आहे. या व्यक्ती मनातील गोष्टी इतरांना सांगत नाहीत त्यामुळेच या व्यक्ती फारच अस्वस्थ असतात. 
  • धरसोडवृत्ती ही 2 मुलांकाचा स्वभाव आहे. त्यांचं एखाद्या गोष्टीत मन फारसं रमत नाही. एखादा विषय त्यांना आज आवडत असेल तर तो दुसऱ्या दिवशी आवडेल असे सांगता येत नाही. त्यामुळे या व्यक्ती सतत काही तरी नवीन करतात आणि मागच्या काही गोष्ट अर्धवट सोडतात.
  • 2 मुलांक असलेल्या पुरुषांसोबत महिलांची मैत्री एकदम पटकन होते. त्यांची मैत्री होण्यासाठी फारसा वेळ जात नाही. अशा पुरुषांकडे स्रिया या अधिक आकर्षिक होतात. 
  • उत्तम लेखक, शिक्षिका किंवा द्रव्यपदार्थातील बिझनेसमध्ये यांचा हातखंडा असतो.मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा हे काही आजार होण्याची यांना दाट शक्यता आहे. 

बड्या आसमी : हिल्टर, एडिसन, सयाजीराव गायकवाड, वि.स. खांडेकर

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली