Valentines Day - आपल्या बजेटनुसार जा डेटवर, जाणून घ्या पर्याय

Valentines Day - आपल्या बजेटनुसार जा डेटवर, जाणून घ्या पर्याय

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) ची तयारी सगळ्यांची जोरात सुरू झाली असेल. काही दिवसांवर आलेला व्हॅलेंटाईन हा प्रेमीयुगुलांसाठीच नाही तर आता प्रत्येकासाठी खूपच महत्वाचा दिवस झाला आहे. प्रेमाचा हा दिवस कसा साजरा करायचा याचा विचार तुम्हीही करत असाल ना? आपल्या जोडीदारासाठी प्रत्येकाला काही खास करायचं असतं. आपल्या जोडीदाराला या दिवशी खास काहीतरी सरप्राईज द्यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. भलेही तुम्ही गेल्या तीन महिन्यांपासून नात्यात असाल अथवा गेली तीन दशकं तुमचं नातं एकमेकांबरोबर असेल. हा दिवस नक्कीच खास असतो. पण बरेचदा हे खास करण्यासाठी आडवा येतो तो खिसा. कारण बजेटमध्ये नक्की कसं काय सरप्राईज द्यायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. समोरच्या माणसाला खास आहेस हे जाणवून द्यायचं असेल आणि बजेटमध्ये हे सर्व करायचं असेल तर काही खास आयडिया आमच्याजवळ आहेत. या कल्पनांचा वापर करून तुम्ही करा हा व्हॅलेंटाईन खास! बजेट, मीडियम रेंज आणि अगदी एक्स्पेंन्सिव्ह या सर्व आयडिया आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तसंच तुमच्या जोडीदाराला पाठवा खास व्हॅलेंडाईन डे संदेश

व्हॅलेंटाईन डे साठी करा अभिनेत्रींसारखा ट्रेंडी मेकअप, खास टिप्स

बजेटमधील व्हॅलेंटाईन डे डेट

Freepik.com

कल्पना - ब्रेकफास्ट इन बेड पासून ते डिनर प्लॅनिंग आणि लव्ह लेटर्स 

खर्च - रू.  500 - 1000

वेळ - तुम्हाला हवा तितका 

काय गिफ्ट्स देता येतील - लव्ह लेटर्स, क्रिएटिव्ह DIY गिफ्ट्स, गुलाब अथवा त्याच्या तिच्या आवडीचा बुके 

बजेटमधील व्हॅलेंटाईन डेट असेल तर तुम्ही अगदी ब्रेकफास्टपासून घरातल्या घरात अनेक योजना करू शकता. जो काही खर्च असेल तो केवळ गिफ्ट्स अथवा सजावटीसाठी असेल. तुम्ही कोणत्याही गिफ्ट्सपेक्षा स्वतःच्या  हाताने त्यांच्यासाठी बनवलेला नाश्ता हे त्यांच्यासाठी  सर्वात मोठं सरप्राईज असेल. तसंच तुम्ही तुमच्या  हाताने ग्रिटींग कार्ड बनवून देणं अथवा जर कितीतरी वर्षात तुम्ही पत्र लिहिलं नसेल तर प्रेमाने ओतप्रोत आणि तुमच्या प्रेमाच्या भावना त्यांच्यासमोर मांडणारं असं पत्र हे त्यांच्यासाठी सर्वात उत्तम गिफ्ट ठरू शकतं.  जर तुम्ही तुमचं प्रेम नियमित त्यांंना दाखवत नसाल तर हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. तसंच सध्या कोरोना काळात तुम्ही हा पर्याय स्वीकारणं जास्त चांगलं आहे.

साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन वीक रोमँटीक (Valentine's Week List In Marathi)

मध्यम स्वरूपातील खर्चाची व्हॅलेंटाईन डे डेट

Make Up

Manish Malhotra Beauty Eye It Makeup Kit by MyGlamm

INR 999 AT MyGlamm

कल्पना - हायकिंग अथवा पिकनिक 

खर्च - रू.  2000 - 5000

वेळ - संपूर्ण दिवस रात्र  

काय गिफ्ट्स देता येतील - ट्रॅव्हलिंग गिअर, पर्सनलाईज्ड टीशर्ट, कपल गिफ्ट्स, कार्ड्स, सौंदर्य प्रसाधने (MyGlamm Beauty Kit, The  Beauty Co. skin care

ही आयडिया  तुमची डेट नक्की खास करू शकते. व्हॅलेंटाईनच्या दिवशी तुमच्या खास प्रेमाच्या व्यक्तीसह तुम्ही एखादे कॅम्पिंग करायला जाऊ शकता अथवा हायकिंगसाठीही जऊ शकता.  यावेळी व्हॅलेंटाईन विकेंडला येत असल्यामुळे तुम्हाला वेगळी सुट्टी घेण्याचीही गरज नाही. एखाद्या रोमँटिक डेस्टिनेशनवर तुम्ही एकमेकांसह वेळ घालवू शकता. जवळच्या  एखाद्या  हिलस्टेशनवर अथवा समुद्रकिनाऱ्यावर अथवा एखाद्या गडावर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मस्त वेळ घालवू शकता. दिलेल्या बजेटमध्ये तुम्ही आरामात फिरून येऊन शकता आणि एकमेकांरोबर वेळ घालवल्यामुळे तुम्हाला अधिक चांगले वाटते.  

रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा 'रोमँटिक' ठिकाणी - Valentines Day With Your Partner In Marathi

महागड्या स्वरूपातील व्हॅलेंटाईन डेट

Freepik.com

कल्पना - प्रायव्हेट मुव्ही शो आणि डिनर डेट  

खर्च - रू. 5000 पेक्षा जास्त 

वेळ - तुम्हाला हवा तितका  

काय गिफ्ट्स देता येतील - दागिने, कपडे, बॅग्ज

कोरोना अजूनही चालूच आहे मग अशावेळी आपल्या जोडीदाराची सुरक्षा घेणेही आपल्याच हातात आहे.  अशावेळी काही खासगी वेळ घालवावा असं दोघांनाही वाटत असतं. मग जर तुम्हाला थोडी महागडी डेट करायची असेल तर तुम्ही गिफ्टमध्ये हिऱ्याच्या अंगठीपासून ते अगदी डिझाईनर कपडे देण्यापर्यंत सर्व काही करू शकता. तसंच आपल्या जोडीदारासाठी  उत्तम स्पा ट्रीटमेंट अथवा प्रायव्हेट मुव्ही शो चे स्क्रिनिंग करू शकता.  एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर डेट अथवा कँडल लाईट डिनर प्लॅन करू शकता. हे सर्व काही तुमच्या जोडीदाराच्या आवडीनुसार आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीवर अवलंबून आहे. 

तुम्हीही यावर्षी करा व्हॅलेंटाईन डेटची योजना आणि करा हा दिवस अधिक खास!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक