बहुगुणी आहे नारळाचे दूध,असा करा वापर (Coconut Milk Uses In Marathi)

Coconut Milk Uses In Marathi

नारळाचे झाडाच्या प्रत्येक गोष्टी या फारच फायद्याच्या असतात. म्हणूनच नारळाला ‘श्रीफळ’ असे म्हणतात. नारळाच्या खोबऱ्यापासून काढले जाणारे नारळाचे दूध तुम्ही सोलकढी, रस घावण, रस शिरवळ्या, खीर अशा रुपात खाल्ले असतील. पण खाद्यपदार्थांव्यतिरिक्त नारळाच्या दूधाचे अनेक फायदे आहेत. नारळाचे दूध हे बहुगुणी आहे सिद्ध करतात त्याचे अनेक फायदे. केस, त्वचा, आरोग्यासाठी नारळाचे दूध हा सर्वोत्तम असा पर्याय आहे. नारळाच्या दूधाचा नेमका उपयोग कसा उपयोग करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या बहुगुणी नारळाचे दूध नेमके कसे वापरावे.

Table of Contents

  नारळाच्या दूधात नेमकं काय असतं? (What Coconut Milk Contains?)

  Instagram

  नारळाचे दूध हे खवलेल्या नारळाच्या दूधापासून काढले जाते. नारळाचे दूध हे रेडिमेड स्वरुपातही मिळते. याशिवाय नारळाच्या दुधाची पावडर देखील मिळते. प्रोसेस करुन नारळाचे दूध तयार केले जाते. नारळाच्या दुधमध्ये कॅलरीज, प्रोटीन, फॅट, कार्बोदकं, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशीअम असते. नारळाच्या दूधामध्ये असलेले फॅट शरीरासाठी फारच चांगले असते. त्यामुळे अनेक आजार दूर राहतात. नारळाचे दूध हे आशिया खंड, आफ्रिका आणि किनारपट्टीतील काही भागांमध्ये अगदी सहज वापरात आणले जाते. अनेक रेसिपीमध्ये नारळाच्या दुधाचा उपयोग केला जातो. नारळाचे दूध आहारातच नाही तर त्याचा वापर सौंदर्यात केला जातो. नारळाच्या दूधामध्ये असलेले व्हिटॅमिन व्हिटॅमिन C त्वचा सुंदर ठेवण्यास मदत करते. 

  केसांसाठी नारळाचे दूध (Coconut Milk For Hair)

  Instagram

  नारळाचे तेल केसांसाठी फारच चांगले असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी त्याच पद्धतीने नारळाच्या दूध ही केसांसाठी फारच फायद्याचे आहे. केसांच्या समस्या दूर करत नारळाचे दूध केसांना कसा फायदा देते ते जाणून घेऊया.

  केसांच्या वाढीला चालना (Promotes Hair Growth)

  नारळाचे दूध केसांसाठी फारच फायदेशीर असते. केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. नारळाच्या दुधामध्ये असलेले घटक केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करतात. नारळाच्या दुधामध्ये असलेले प्रोटिन्स, सोडीअम, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम असते. जे स्काल्पमध्ये रक्ताचा पुरवठा वाढवतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास चालना मिळते. जर केसांच्या वाढीसाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा उपयोग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नारळाच्या दुधाचा असा वापर करा.

  केसांच्या वाढीसाठी नारळाचे दूध:
  एका भांड्यात 4 मोठे चमचे नारळाचे दूध आणि 2 चमचे लिंबाचा रस घेऊन मिक्स करा. हा तयार मास्क केसांच्या स्काल्पला लावा. साधारण 30 ते 35 मिनिटं ठेवा. शॉवर कॅप लावून केस तसेच ठेवा. एखाद्या माईल्ड शॅम्पूने केस धुवा. त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळेल आणि केस सुंदर दिसतील.

  केसांसाठी उत्तम कंडिशनर (Best Hair Conditioner)

  कोरडे आणि दुभंगलेले केस कोणालाच आवडत नाही. मऊ- मुलायम केस आवडत असेल तर नारळाचे तेल तुमच्या केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून काम करते. नारळाच्या दूधामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांवर मॉईश्चरायझर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे केसांना झालेले डॅमेज दूर होण्यास मदत मिळते. शिवाय नारळाच्या दूधामध्ये असलेले प्रोटिन्स केसांना डॅमेजपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

  कंडिशनर म्हणून असे वापरा नारळाचे दूध:
  नारळाचे दूध कंडिशनर म्हणून वापरायचे असेल तर एका भांड्यात नारळाचे दूध थोडेसे गरम करा. हलके गरम झाल्यावर केसांच्या मुळांना लावायला घ्या. केसांना 10 मिनिटं ठेवून केस स्वच्छ धुवून घ्या. केसांमध्ये नक्कीच हा फरक दिसेल.
   

  हेल्दी स्काल्प (Healthy Scalp)

  केसांचे योग्य पोषण झाले नाही की, केसांच्या स्काल्पवर त्याचा फरक पहिला जाणवू लागतो. जर स्काल्प हेल्दी नसेल तर केसांमध्ये कोंडा होणे, केस दुभंगणे, केस गळती असे काही त्रास होत असतील. तर त्यासाठी तुमची स्काल्प जबाबदार असते. स्काल्प चांगली राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठीही नारळाचे दूध हा उत्तम पर्याय आहे. नारळाच्या दूधाच्या वापरामुळे तुम्हाला हेल्दी स्काल्प मिळू शकते.

  हेल्दी स्काल्पसाठी असे वापरा नारळाचे दूध:
  नारळाचे दूध घेऊन तुम्ही थेट स्काल्पला चोळून मसाज करा. असे मसाज केल्यामुळे नारळाच्या दुधामधील पोषक घटक छिद्रातून आत जातात. ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो आणि केस अधिक मजबूत दिसतात.

  त्वचेसाठी नारळाचे दूध (Coconut Milk For Skin)

  Instagram

  केसांसाठीच नाही तर नारळाच्या दुधाचा वापर त्वचेसाठी केला जातो. नारळ पाण्याचे फायदे जसे अनेक पद्धतीेने फायदेशीर आहे. अगदी तसेच नारळाचे दूध त्वचेसाठी फायद्याचे असते. नारळाचे दूध थोडया वेगळया पद्धतीने काम करते. त्वचा सुंदर आणि स्वच्छ ठेवून त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम नारळाचे दूध करते. 

  उत्तम फेशिअल स्क्रब (Good Facial Scrub)

  नारळाचा उपयोग स्क्रब म्हणून कसा करायचा असा विचार तुम्ही करत असाल तर नारळ हे एक माईल्ड स्क्रब आहे. नारळाच्या दूधामध्ये असलेले फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन असे घटक त्वचा मॉईश्चरायईज करायचे काम करते. नारळाच्या दूधासोबत तुम्ही इतर घटक मिसळले तर त्वचा अधिक चांगली दिसू लागते. त्वचा अधिक चमकदार आणि मुलायम बनते. चेहऱ्यालाच नाही तर तुम्ही बॉडी स्क्रब म्हणूनही त्याचा उपयोग करु शकता.

  नारळाच्या दूधापासून असे बनवा स्क्रब:
  नारळाचे दूध थोडे जाडसर ठेवा. त्यामध्ये थोडी दळलेली साखर, कॉफी घालून तुम्ही ते त्वचेवर चोळा. नारळाच्या दूधाचा असा वापर केल्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसू लागते.

  चमकदार त्वचा (Glowing Skin)

  नारळाच्या दूधामध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि E हे घटक त्वचेवरील मृत त्वचा काढून त्वचा चमकदार करण्यास मदत करतात. त्वचेवरील मृत त्वचा  गेल्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते. योग्य पद्धतीने नारळाच्या दुधाचा उपयोग केला त्वचा अधिक प्रसन्न आणि चमकदार दिसू लागते. त्वचेसाठी याचा नक्की उपयोग करावा असा विचार करत असाल तर तेही फार कठीण नाही. नारळाच्या दूधाचा पॅक बनवून तुम्हाला त्याचा वापर करता येतो. सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही नारळाचे दूध वापरु शकता

  नारळाच्या दूधापासून अशी मिळवा चमकदार त्वचा:
  नारळाच्या दूधामध्ये काहीही न घालता तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो. नारळाचे दूध थोडेसे थंड करुन जाड करुन घ्या. ब्रशच्या मदतीने ते चेहऱ्याला लावा. 5 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एकदा हे लावण्यास काहीच हरकत नाही.

  पिंपल्स ठरते उत्तम (Gentle On Pimple)

  नारळाच्या दुधामध्ये लॉरिक अॅसिड नावाचाए एक घटक असतो. जो त्वचेवर तयार होणाऱ्या बॅक्टेरियाला मारण्याचे काम करतो. नारळाचे दूध चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्स जाण्यास मदत करते. पिंपल्सची जळजळ कमी करुन त्याचे डाग कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला खूपच पिपंल्स असतील तर त्याचा वापर योग्य पद्धतीने आणि विचार करुन करा.

  नारळाच्या दुधापासून असे घालवा पिंपल्स:
  कॉटन पॅडवर नारळाचे दूध घेऊन पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा. हे दूध रात्रभर लावून ठेवा त्यामुळे तुमचा पिंपल्समुळे काळवंडलेला भाग पूर्ववत होण्यास मदत मिळेल. 

  आरोग्यासाठी नारळाचे दूध (Coconut Milk For Health)

  Instagram

  आरोग्यासाठी नारळाचे दूध हे खूपच फायदेशीर असते. नारळाच्या दुधाच्या सेवनामुळे आरोग्यासंदर्भातही अनेक फायदे मिळतात. 

  प्रतिकारशक्ती वाढवते (Strengthen Immune System)

  आरोग्य चांगले हवे असेल तर उत्तम प्रतिकार शक्ती आवश्यक असते. जर तुम्हाला प्रतिकार शक्ती उत्तम हवी असेल तर तुम्ही नारळाच्या दूधाचे सेवन करायला हवे. नारळाच्या दुधामधील घटक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. नारळाच्या दुधामध्ये असलेले लॅरिक अॅसिड हे अँटिसेप्टिक असून ते अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. या अँटिसेप्टिक घटकामुळे आरोग्याच्या तक्रारी कमी होतात शरीराला हानीकारक ठरु शकतील अशा बॅक्टेरिया, व्हायरल आणि फंक्सला ते शरीरापासून दूर ठेवण्याचे काम करते.

  ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले (Good For Heart Disease)

  निरोगी आरोग्य हवे असेल तर आहारात नारळाचे दूध हे फारच फायदेशीर आहे. नारळाच्या दुधामध्ये जरी फॅट असले तरी त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करुन शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम नारळाचे दूध करते. त्यामुळे जे नारळाच्या दुधाचे सेवन करतात त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा ही एकदम परफेक्ट असते.

  पचनशक्ती वाढवते (Good Metabolism)

  नारळाच्या दुधाचे सेवन अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात.त्यापैकीच एक म्हणजे सोलकढी. नारळाच्या दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या सोलकढीमुळे पचनसंस्था चांगली होते. पचनाचे कार्य चांगले झाल्यामुळे पोटाचे विकार कमी होतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, शौचायलाचे त्रास नारळाच्या दुधाच्या सेवनामुळे होत नाही. 

  नारळाच्या दूधापासून बनवा या सोप्या रेसिपीज (Coconut Milk Uses In Recipes)

  नारळाच्या दुधापासून तुम्हाला काहीतरी चांगलं बनवायचं असेल तर आम्ही काही सोप्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. त्या नक्की करा.

   

  सोलकढी

  Instagram

  नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवण्याची अनेक ठिकाणी पद्धत आहे. यासाठी फार साहित्यही लागत नाहीत.
  साहित्य: खोवलेला नारळ, कोकमाचा आगळ, आलं, जीरे पूड, मीठ, कोथिंबीर
  कृती:
  खवलेल्या नारळापासून नारळाचे दूध काढून घ्या. त्यामध्ये मीठ, कोकमचा आगळ, किसलेलं आलं.जीरे पूड आणि मीठ घालून सगळं एकजीव करा.
  जर तुम्हाला आलं दाताखाली आलेलं आवडत नसेल तर सोलकढी गाळून घ्या.
  वरुन कोथिंबीर भुरभुरा आणि थंडगार त्याचा आस्वाद घ्या. जेवणानंतर जिरवणी म्हणून ती फारच चविष्ट लागते.

   

  नारळाच्या दूधातील चिकन

  Instagram

  नारळाच्या दूधामध्ये चिकन बनवण्याचीही अनेक ठिकाणी पद्धत आहे. तुम्हा अशा रेसिपीही ट्राय करु शकता.
  साहित्य: चिकन, आलं-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, नारळाचे दूध, कोथिंबीर
  कृती:  

  चिकन मॅरिनेट करुन घ्या. लाल तिखट थोड जास्त घाला. कारण नारळाच्या दुधामुळे ते थोडं गोडं होण्याची शक्यता असते.
  एका भांड्यात तेल गरम करुन चिकन फोडणीत घाला. चिकन चांगले वाफेवर शिजवून घ्या.
  चिकन चांगले शिजले की, त्यामध्ये नारळाचे दूध घाला. चिकनमध्ये नारळाचे दूध छान जाऊ द्या. त्यामुळे चिकन अधिक टेस्टी लागते. 

  नारळाची कढी

  Instagram

  नारळाची कढी ही देखील अनेक ठिकाणी बनवली जाते. विशेषत: साऊथमध्ये नारळाच्या दुधाचा वापर करुन कढी बनवली जाते. त्याला अवियल असे देखील म्हणतात.
  साहित्य: आवडीच्या भाज्या (गाजर, मटार, फ्लॉवर,फरसबी), कडीपत्ता, मीठ, चिंचेचा कोळ , कोथिंबीर, मिरची 

  कृती:
  एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये त्याला कडीपत्त्याची फोडणी करुन घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घाला. हळद,मिरची घालून भाज्या शिजवून घ्या. त्यामध्ये नारळाचे दूध घालून ते छान शिजवून घ्या.थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा कोळ घाला.  तुमची सगळ्यात सोपी असी केरळीपद्धतीची नारळाच्या दुधाची कढी तयार

  तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

  1. नारळाचे दूध घरी कसे बनवतात?

  नारळाचे दूध हे अनेक रेसिपीजमध्ये वापरले जाते. विशेषत: कोकणात नारळाच्या रसापासून अनेक रेसिपीज बनवल्या जातात. यासाठी नारळाचे दूध घरीच काढले जाते. ताजा आणि रसदार नारळ घेऊन तो खोवला जातो. किसलेल्या नारळाला पिळून त्यातून रस काढला जातो. हा रस ताजाच प्यावा किंवा त्यापासून रेसिपी बनवाव्या. रेडीमेड नारळाच्या तुलनेत ताजा रस अधिक चांगला लागतो.

  2. गायीच्या दुधाला पर्याय नारळाचे दूध असू शकते का?

  नारळाचे दूध आणि गायीचे दूध याच्यामध्ये खूपच अंतर आहे. ज्यांना दूधातील लॅक्टोस हे घटक चालत नाही. ज्यांना त्याची अॅलर्जी आहे त्यांनी नारळाचे दूध पिण्यास हरकत नाही. पण गायीच्या दूधातील पोषक घटक हे या नारळाच्या दुधात असतील असे नाही.

  3. नारळाचे दूध हेल्दी फॅट आहे का?

  नारळाचे दूध आणि त्यामधील क्रिम हे एक हेल्दी फॅट आहे. गायीच्या किंवा म्हशीच्या दूधाच्या तुलनेत नारळाच्या दुधात असलेले फॅट शरीरासाठी चांगले असते. वजन कमी करण्यासाठीही नारळाचे दूध हे फायदेशीर ठरते. त्यामुळे नक्कीच नारळाचे दूध हे हेल्दी फॅट आहे.

  Beauty

  POSE HD Foundation Stick - Walnut

  INR 599 AT MyGlamm