ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
मुंगी चावल्यामुळे होणारी त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय

मुंगी चावल्यामुळे होणारी त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय

घरात गोडाधोडाच्या पदार्थांना अथवा थंडाव्यासाठी मुंग्या येतात. अशा वेळी साफसफाई करताना अथवा बेसावध असताना तुम्हाला मुंग्या चावू शकतात. लाल मुंगी चावल्यास अंगाला चांगलाच दाह होतो. मात्र अशा वेळी नेमकं काय करावं हे अनेकांना समजत नाही. मुंगी चावल्यानंतर बराच वेळ त्वचेला जळजळ जाणवत राहते. काही वेळा त्वचेवर मुंगी चावण्यामुळे सूजही येते. अशा वेळी या काही घरगुती उपायांनी तुम्ही  तुमच्या त्वचेचा दाह थांबवू शकता. 

मुंगी चावल्यावर त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी उपाय

मुंगी चावल्यावर त्वचा लाल होणे, सूज येणे आणि जळजळ या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. यासाठी करा हे उपाय

बर्फ

त्वचेचा दाह रोखण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी त्वचेवर बर्फ लावण्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला मुंगी चावली आहे त्या ठिकाणी त्वरीत बर्फ लावा. त्वचेवर थेट बर्फ लावण्यापेक्षा तो एखाद्या सुती कापडात गुंडाळून लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेला जास्त चांगला आराम मिळेल. 

टुथपेस्ट

मुंगी अथवा मधमाशी चावण्यामुळे होणारी त्वचेची जळजळ थांबवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. शिवाय यासाठी तुम्हाला काही कष्ट घ्यायची गरज नाही. घरातच प्रभावित जागेवक टुथपेस्ट लावून तुम्ही उपचार करू शकता. टुथपेस्टमध्ये पुदिना असतं ज्यामुळे त्वचेला लगेच थंडावा मिळतो. त्वचेवर अशा वेळी सूज जरी आली असेल तरी तुम्ही त्यावर टुथपेस्ट लावू शकता.

ADVERTISEMENT

मध

मध त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. शिवाय नैसर्गिक असल्यामुळे त्यामुळे कोणताही दुष्परिणाम त्वचेवर होत नाही. मधातील अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म तुमच्या त्वचेला इनफेक्शनपासून वाचवतात. शिवाय मुंगी चावल्यामुळे होणारी जळजळ आणि खाज यामुळे शमते आणि त्वचेला थंडावा मिळतो. जर एखादी विषारी माशी, किडा, कीटक तुम्हाला चावला असेल तरी मधामुळे तुमच्या त्वचेला विषबाधा होण्याचा धोका टाळता येतो. 

नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेच्या अनेक समस्यांवर वरदान ठरतं. कारण यामुळे तुमच्या त्वचेची कोणतीही समस्या लवकर बरी करता येते. मुंग्या चावल्यामुळे त्वचेवर आग होत असेल तर ती आग अथवा जळजळ थांबवण्याचा आणि त्वचेला त्वरित थंडावा देण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्वचेवर नारळाचे तेल लावणे. त्वचेवर नारळाचे तेल लावून तुम्ही थोडावेळ मसाजही करू शकता. ज्यामुळे त्वचेला चांगला आराम नक्कीच मिळू शकतो. 

तुळशीचा रस –

मुंगी चावल्यावर त्वचेचा दाह आणि इनफेक्शन टाळ्यासाठी तुम्ही त्वचेवर तुळशीचा रस लावू शकता. यासाठीच अंगणातील तुळशीची काही पाने घ्या आणि ती चुरडून अथवा वाटून त्याची पेस्ट, रस त्वचेवर लावा. डास चावल्यामुळे, मधमाशी चावल्यामुळे अथवा कीटकदंशामुळे जरी तुमची त्वचा जळजळ करत असेल तरी तुम्ही हा उपाय करून त्वचेचं इनफेक्शन रोखू शकता.

कोरफडाचा गर –

त्वचेच्या अनेक समस्यांवर कोरफडाचा गर एखाद्या औषधाप्रमाणे कार्य करतो. त्यामुळे मुंगी चावल्यावर होणारी जळजळ थांबवण्यासाठी तुम्ही कोरफडाचा गर त्वचेला लावू शकता. यासाठी कोरफडाच्या पानातील गर काढून घ्या. हा गर चमच्याने चांगला एकजीव करा आणि त्याची पातळ पेस्ट तयार करा. ही कोरफडाची पेस्ट तुमच्या मुंगी चावलेल्या त्वचेवर लावा आणि काही मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवून टाका. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

स्वयंपाक करताना त्वचा भाजली तर करा हे नैसर्गिक उपाय

मिरची चावल्यास झाली तोंडाची जळजळ, तर करा त्वरीत उपाय

ADVERTISEMENT

वॅक्सिंग नंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

09 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT