ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आयब्रोजचा असा मेकअप केला तर चेहरा दिसेल आकर्षक

आयब्रोजचा असा मेकअप केला तर चेहरा दिसेल आकर्षक

खूप मेकअप करायला आवडत नसेल पण तरीही चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसावा असे वाटत असेल तर तुम्हाला मेकअप करण्याची फार गरज नाही. कारण केवळ आयब्रोजचा मेकअप केला तरी देखील तुमच्या चेहऱ्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो. आयब्रोजचा मेकअप ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आयब्रोजला उठाव देण्यासाठी हल्ली खास मेकअप केला जातो. त्यामुळे तुमच्या आयब्रोज चांगल्या उठून दिसतात. आयब्रोजचा मेकअप करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे. त्यामुळेच हा मेकअप उठावदार दिसतो. नुसती काजळ पेन्सिल नाही तर आयब्रोजसाठी असे काही खास प्रॉडक्ट मिळतात. त्यांच्या वापराने तुम्हालाही बेस्ट आयब्रोज मिळतील

तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल (How To Use Concealer In Marathi)

असे करा तुमचे आयब्रोज आकर्षक

आयब्रोज

Instagram

ADVERTISEMENT

आयब्रोज आकर्षक करण्यासाठी तुम्हाला चांगली आयशॅडो पावडर, कन्सिलर, फाऊंडेशन, आयब्रो ब्रश,स्पुली ब्रश 

  • संपूर्ण मेकअप करत नसाल आणि तुम्हाला फक्त आयब्रोजचा मेकअप करायचा असेल तर सगळ्यात आधी संपूर्ण चेहऱ्याला प्राईमर लावून घ्या. जर हा मेकअप फक्त आयब्रोजसाठी असेल तर डोळ्यांच्या आजुबाजूला लावा. 
  • डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे असतील तर कन्सिलर हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कन्सिलर लावल्यामुळे डोळ्यांच्या आजुबाजूचा भाग लगेचच उठून दिसतो. 
  • कन्सिलर लावल्यानंतर तुम्ही स्पुली ब्रशच्या साहाय्याने आयब्रोज विंचरुन घ्या. त्यामुळे आयब्रोजचा आकार उत्तम येतो. 
  • आयशॅडो पावडर किंवा आयशॅडोशी निगडीत तुमच्याकडे जे आहे ते स्ट्रोक लावून आयब्रोजला लावून घ्या. जर तुम्हाला आयब्रोजचा आकार वाकडा तिकडा होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आधी आऊटलाईन काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये फिलिंग करायला घ्या. 

डार्क सर्कल्स नको असतील तर आय मेकअप करताना घ्या ही काळजी

आकर्षक आयब्रोज

Instagram

ADVERTISEMENT
  • तुमच्या आयब्रोचे फिलिंग करुन झाल्यावर आता त्याला फिनिशिंग देणे फारच महत्वाचे असते. कारण आयब्रोज या आर्टिफिशिअल आणि खूप मेकअप केलेल्या वाटायला नको असतील तर त्याची योग्य टेक्निक शिकून घ्या. 
  • आयब्रोजची  पावडर किंवा लिक्वीड पेन्सिल वापरण्याचा विचार करत असाल त्यामुळे पिग्मेंट पडतात त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडू शकतात. त्यामुळे पुढचा मेकअप करु नका. आयब्रोजचा आकार एकदा परफेक्ट झाला की, मगच फाऊंडेशन आणि कन्सिलर घेऊन ब्रशन घेऊन त्याची एक बारीक रेघ आयब्रोज खाली ओढून घ्या. म्हणजे आयब्रोज या अधिक डिफाईन होतील आणि चांगल्या दिसतील.
  • आता तुम्हाला इतका डिटेल मेकअप करायचा नसेल तर तुम्ही सरळ स्पुली ब्रशने आयब्रोज विंचरुन घ्या. त्यानंतर मस्कारा लावून तुम्ही आयब्रोज गडद करु शकता. अशा पद्धतीने आयब्रोज केल्या तरीही त्या गडद दिसू लागतात. 
  • हल्ली नुसत्या आयब्रोज स्ट्रोक पेन्सिल मिळतात. त्यांचा वापरही तुम्ही करु शकता. सरावाने तुम्हालान आयब्रोज अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात. 
    आयब्रोज अशा पद्धतीने केले तर ते नेहमीच गडद आणि आकर्षक दिसतात.

जाड चेहरा स्लिम दाखविण्यासाठी घ्या मेकअपची अशी मदत

07 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT