ADVERTISEMENT
home / Acne
उन्हाळ्यात त्वचेवरील केस काढणे पडू शकते महागात

उन्हाळ्यात त्वचेवरील केस काढणे पडू शकते महागात

त्वचेवरील अतिरिक्त कोणालाही आवडत नाही. विशेषत:चेहऱ्यावर असलेली लव तर अनेकांना नको असते. ओठांवर, कपाळावर आणि गालावर असलेले केस काढण्याची तुम्हालाही सवय असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे फारच गरजेच आहे.केस काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वातावरणानुसार काही पद्धती या त्वचेसाठी फारच हानीकारक ठरतात. विशेषत: उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. तीव्र उन आणि त्वचा यांचे कधीच पटत नाही. अशावेळी त्वचेच्या संरक्षणासाठी असलेले केस काढून टाकले तर त्याचे काही विपरित परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती.

पिंपल्सचा त्रास

त्वचेवरील केस काढल्यामुळे पोअर्स ओपन होतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. उन्हाळ्यात आधीच उन आणि उष्णता असल्यामुळे त्वचेवरील पोअर्स ओपन झालेले असतात. त्याच चेहऱ्यावर रेझर फिरवल्यामुळे किंवा वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेची मूळं दुखावण्याची शक्यता असते.  चेहऱ्यावर असलेले पीच फस काढल्यामुळे त्वचेची मूळ दुखावली जातात. त्यामुळे पिंपल्स येतात.  केसतोडीमुळे आलेल्या पिंपल्समध्ये पस साचण्याची शक्यता असते. असे पिंपल्स लवकर जात नाही. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात मुळीच केस काढू नका. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही ही रिस्क मुळीच घेऊ नका. 

केस आणि उत्तम त्वचेसाठी आहारात समावेश करा या नैसर्गिक प्रोटीन्सचा

त्वचेला होऊ शकतात रॅशेश

रॅशेश

ADVERTISEMENT

Instagram

खूप जणांच्या त्वचेवर जरा जास्त प्रयोग केला तरी तो त्रासदायक ठरतो. असाच त्रास उन्हाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेवरील केस काढण्यासाठी तुम्ही रेझर,क्रिम किंवा वॅक्सिंग अशा कोणत्याही पर्यायाचा उपयोग करत असाल तरी देखील कोणतीही पद्धत तुमच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरु शकते. कारण या कोणत्याही पद्धतीमध्ये त्वचेला रॅशेश येण्याची शक्यता असते. आधीच तापलेले वातावरण त्यामध्ये चेहऱ्यावर अशा पद्धतीने केलेला प्रयोग हा थोडा त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. जर तुमची त्वचा आधीच नाजूक असेल तर तुम्ही उन्हाळ्यात चेहऱ्यावरील केस काढणे थोडे टाळा कारण या दिवसात आलेले रॅशेस हे त्वचेला अधिक नाजूक करतात.

त्वचा दिसते लाल

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रिम्स लावतो. यामध्ये सनस्क्रिन अगदी मस्ट असते. त्यामुळे चेहऱ्याला आधीच आपण वेगवेगळ्या क्रिम लावून संरण करण्याचा प्रयत्न करतो. त्यातच जर तुम्ही त्वचेवरील केस काढून टाकलेले असतील. तर तुमच्या त्वचेला या क्रिम्स थेट लागतात. क्रिममधील काही घटक हे त्रासदायक असल्यामुळे त्वचा लाल पडण्याची शक्यता असते.

ओपन पोर्सपासून सुटका मिळविण्यासाठी सोपे उपाय

ADVERTISEMENT

केस काढल्यानंतर घ्या काळजी

त्वचेवरील केस काढणे जर तुमच्यासाठी अनिवार्य असेल आणि तुम्ही केस काढले असतील. तर पोअर्स योग्यवेळी बंद करा.त्यासाठी चेहऱ्यावरील केस काढताना चेहऱ्याला पाण्याचा हात लावा आणि त्यानंतर शेव्हिंग करा. जर तुमची त्वचा अगदीच नाजूक असेल तर अॅलोवेरा जेल लावून मग केस काढा. केस काढून झाल्यानतंर चेहऱ्यावर बर्फ लावायला विसरु नका. 

 

आता उन्हाळ्यात त्वचेवरील केस काढताना जपूर कारण त्याचा होऊ शकतो त्रास

सॅलिसिलिक अॅसिडच्या मदतीने घालवा पिंपल्सचे डाग

ADVERTISEMENT
26 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT