उत्तम केस आणि त्वचा हवी असेल तर आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करणे हे फार गरजेचे असते. पण सगळ्यांचाच आहार हा परिपूर्ण असतोच असे नाही. अशावेळी शरीरातील कमतरता भरुन काढण्यासाठी काही सप्लिमेंट्सचा आधार घ्यावा लागतो. केस आणि त्वचेसाठी काही मल्टी व्हिटॅमिन्स आणि सप्लेंट पावडर बाजारात मिळतात.ज्या केवळ पाण्यात टाकून घ्यायच्या असतात किंवा नुसत्या टॅबलेट स्वरुपात असलेल्या गोळ्या घेतल्या तरी चालतात. पण विकतच्या गोळ्या, मल्टी व्हिटॅमिन्स घेणे अनेकांना आरोग्यासाठी हितकारक वाटत नाहीत. तुम्हीही या भीतीमध्ये असाल आणि अशा मल्टी व्हिटॅमिन गोळ्या घेणे टाळत असाल तर तुम्ही आहारात नैसर्गिक अशा प्रोटीन्सचा समावेश करु शकता. जाणून घेऊया
अॅलोवेरा रस हा केस आणि त्वचेसाठी सगळ्यात उत्तम असा प्रकार आहे. हल्ली ऑरगॅनिक पद्धतीने काढलेला गर बाजारात मिळतो. तो पाण्यात घालून त्याचे सेवन केले जाते. अॅलोवेरा रसची तशी काही खास चव नसते. पण अॅलोवेराच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते. अॅलोवेरा रसाचे सेवन अनेकदा वेटलॉस किंवा नियंत्रित करु पाहणाऱ्यांना उपाशी पोटी घ्यायला सांगतात. त्यामुळे पोटाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते. अॅलोवेराच्या नित्य सेवनामुळे त्वचेला चांगला ग्लो येतो. तुम्ही महिनाभर हे करुन बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.
गव्हांकुराचे सत्व हे देखील केसांसाठी चांगले होते. अगदी कोणत्याही वयात केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी गव्हांकुराचे सत्व योग्य पद्धतीने काम करते. हल्ली सगळ्यांनाच गव्हांकुराचे सत्न काढण्यासाठी तितकासा वेळ नसतो. शिवाय गव्हांकुराचे सत्व बनवण्याची ही पद्धत खूप मोठी असल्यामुळे बरेचदा गव्हांकुर खाल्ले जात नाही. त्यामुळे वीट ग्रास पावडरचा उपयोग तुम्ही करु शकता. दिवसातून एकदा कधीही तुम्हाला जमेल त्यावेळात तुम्ही एक चमचा वीट ग्रास पावडर खाऊ शकता.यामध्ये कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
आवळ्याचा रसामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन C असते. आवळा अर्क हा हल्ली सहज उपलब्ध असतो. सुंदर त्वचा आणि केसांसाठी तुम्ही आवळा रसाचे सेवन करायला हवे.आवळा रस किंवा आवळा पावडर अशा गोष्टीही हल्ली बाजारात मिळतात. यामध्ये असलेले अनेक आवश्यक घटक तुमच्या केसांना आणि त्वचेला ग्लो देण्याचे काम करते. आवळा रस उपाशी पोटी घेण्यासही सांगितले जाते. त्यामुळे त्याचे अधिक फायदे मिळतात. कोमट पाण्यातही आवळा पावडर किंवा रसाचे सेवन करु शकता. महिन्याभर या रसाचे किंवा पावडरचे सेवन करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा जाणवेल.
वरील सगळ्या कोरड्या पावडर सम प्रमाणात घेऊन तुम्ही दररोज एक चमचा पाण्यात घ्या. तुम्ही याचे सेवन दररोज केल्यानंतर तुम्हाला सगळ्या घटकांचे फायदे मिळतील. एकाचवेळी तुम्हाला डिटॉक्स आणि केस, त्वचेसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला या पैकी कोणत्याही गोष्टीची एलर्जी असेल तर तुम्ही त्या गोष्टी काढून उरलेल्या गोष्टींचे सेवन करु शकता.
आता या काही रेडिमेड सप्लिमेंटचा उपयोग करण्यापेक्षा अशा नैसर्गिक प्रोटीनचा उपयोग करुन तुम्ही त्याचा उपयोग करु शकता.