तुम्हालाही वाटते का इंजेक्शनची भीती, जाणून घ्या नीडल फोबियाविषयी

तुम्हालाही वाटते का इंजेक्शनची भीती, जाणून घ्या नीडल फोबियाविषयी

लहानपणापासून अनेकांना इंजेक्शनच्या सुईची भीती वाटत असते. या भीतीला नीडल फोबिया (Needle phobia) किंवा वैद्यकीय भाषेत ट्रायपानोफोबिया (Trypanophobia) असं म्हणतात. आश्चर्य म्हणजे या भीतीमुळे आज काही माणसं कोरोना वॅक्सिन घेण्यासदेखील तयार नाहीत. कोरोना महामारीच्या काळात ही गोष्ट खरंच खूप गंभीर आहे. कारण कोरोनाचं लसीकरण करून घेणं हे सर्वांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. यासाठीच जाणून घेऊ या काय आहे नीडल फोबियाविषयी आणि या भीतीवर मात करण्यासाठी साधे सोपे उपाय. 

नीडल फोबिया म्हणजे काय ?

काही  लोकांना इंजेक्शनच्या सुईची खूप भीती वाटत असते. बऱ्याचदा अशी माणसं इंजेक्शन घेणं टाळण्यासाठी वाटेल ती गोष्ट करण्यास तयार होतात. लहानपणी इंजेक्शनविषयी मनात बसलेली भीती मोठं होता हळू हळू अधिकच वाढू लागते. अशी माणसं डॉक्टरांना आजारी पडल्यावर इंजेक्शनऐवजी इतर औषधे देण्याची विनंती करतात. खरंतर नीडल फोबिया म्हणजेच इंजेक्शनच्या सुईविषयी इतकी भीती वाटणं ही काही साधारण गोष्ट नक्कीच नाही. कारण सध्या जगभरात कोविड वॅक्शिनेशनचे मिशन सुरू असतानाही अनेक लोक या भीतीमुळे कोविडची लस घेण्यास तयार नाहीत. एवढंच नाही बऱ्याचदा अशा लोकांना एखादी आरोग्य समस्या झाल्यास ते त्यांची रक्ततपासणी करण्यासही या भीतीमुळे तयार होत नाहीत. यासाठी अशा लोकांच्या मनातून या भीतीला कमी करणं खूपच गरजेचें आहे. एका रात्रीत ही भीती नक्कीच कमी होऊ शकत नाही. मात्र नीडल फोबिया मनाला झालेला असल्यामुळे मनाची तयारी करून या भीतीला नक्कीच कमी करता येऊ शकते. 

pexels

कशी कमी करावी इंजेक्शनच्या सुईची भीती -

सर्वात आधी या लोकांना या गोष्टींचे महत्त्व पटायला हवे की कोणतेही लसीकरण हे आरोग्यासाठी हितकारक असते. त्यामुळे निरोगी आणि दीर्घायुषी होण्यासाठी लस घेणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय कोरोना सारख्या गंभीर आरोग्य समस्येची लस घेतल्यामुळे त्यांच्यासोबतच इतरांचे आयुष्यदेखील सुरक्षित होणार आहे. हा विचार केल्यास त्यांना कोरोनाचे वॅक्सिन घेण्याची गरज नक्कीच समजू शकते. वॅक्सिन घेण्यापूर्वी काही गोष्टींचा सराव करून तुम्ही तुमचा नीडल फोबिया कमी करू शकता.

जसं की, 

  • इंजेक्शन घेण्यापूर्वी आणि ते घेत असताना सतत तुमच्या भीतीचा विचार करू नका.
  • सुईमुळे तुम्हाला थोडसं टोचेल पण त्यामुळे तुमचा आणि अनेकांचा जीव वाचू शकेल असा विचार तुम्ही करा.
  • इंजेक्शन घेत असताना ते देत असलेल्या डॉक्टर अथवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तुमच्या भीतीची आधीच कल्पना द्या.
  • इंजेक्शन देण्याची तयारी अथवा साहित्य पाहणे कटाक्षाने टाळा.
  • इंजेक्शन घेत असताना सुई टोचताना पाहू नका त्यावेळी दुसरीकडे पाहा. 
  • इंजेक्शन देत असताना दीर्घ श्वास घ्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भीतावर मात करणं नक्कीच शक्य होईल. 
  • लसीकरणासाठी स्वतःच्या शरीराला आणि मनाला तयार करा. यासाठी मनाला आवश्यक त्या स्वयंसूचना द्या.
  • लस घेतल्यानंतर तुमच्यासारख्या नीडल फोबिया असलेल्या लोकांना तुमच्या अनुभवातून मार्गदर्शन करा. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes

INR 69 AT MyGlamm