वारंवार वाढत असेल रक्तदाब तर करा हे घरगुती उपाय

वारंवार वाढत असेल रक्तदाब तर करा हे घरगुती उपाय

रक्तदाब अचानक वाढणं अथवा अचानक कमी होणं ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. असं असलं तरी त्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येऊ शकतं. एका ठराविक वयानंतर अनेकांना रक्तदाब वाढण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. कामाची दगदग, चिंता, बदलेली जीवनशैली, आरोग्य समस्या अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत असू शकतात. मात्र जर तुमचा रक्तदाब सतत वाढत असेल तर जास्त चिंता काळजी करू नका. कारण चिंता काळजी केल्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढेल. म्हणूनच यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत काही घरगुती उपाय करा आणि मिळवा या समस्येपासून सुटका

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय -

तुळशीचा रस आणि मध -

तुळशीच्या पाने चावून खाण्यामुळेही तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र जर तुम्हाला चांगला आराम मिळावा असं वाटत असेल तर तुळशीच्या पानांचा रस काढा आणि मध मिसळून त्याचे चाटण घ्या. तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. तुळशीच्या पानांमधून हे घटक तुमच्या शरीरात जातात. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीची पानं खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. 

जेष्ठमध -

कफ वात आणि पित्त या दोषांवरच्या उपचारांसाठीदेखील जेष्ठमध परिणामकारक ठरते.  जेष्ठमधीने अशक्तपणा कमी होते. रक्त वाढवणारी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचा रामबाण इलाज म्हणजे जेष्ठमधीचे चाटण घेणे. सतत वाढणारा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदात जेष्ठमध घेण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण जेष्ठमधीमुळे तुमच्या कोर्टीसोलची पातळी कमी होते. यासाठीच ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी एक कप कोमट पाण्यात चमचाभर जेष्ठमधीची पावडर घ्यावी  आणि ते प्यावे. दररोज हा उपाय केल्यास तुमच्या रक्तदाबावर चांगले नियंत्रण मिळू शकते. रक्तदाब नियंत्रित झाल्यावर मात्र हा उपाय करणे थांबवावे.

गाजर -

गाजरामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असले उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी गाजरातील पोटॅशिअम फायदेशीर ठरते. यासाठीच ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांनी आहारात गाजराचा समावेश जरूर करावा. सकाळी उठल्यावर गाजराचा रस घेणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. कारण उपाशी पोटी गाजराचा रस घेतल्यामुळे त्यातील पोषक घटक तुमच्या शरीरावर त्वरीत परिणाम करतात. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हा उपाय तुम्ही करून पाहायलाच हवा.

बीटरूट -

बीट खाण्याने अन्नाचे चांगले पचन होते पण शरीराला त्वरीत उर्जा मिळते. त्याचप्रमाणे बीटमधील नायड्रेटमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यातील अडथळे दूर होतात आणि रक्तप्रवाह सुधारल्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. बीटरूटचे नियमित सेवन करणं तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहे. कारण जरी तुमचा रक्तदाब कमी अथवा जास्त असला तरी बीटमुळे तो नक्कीच नियंत्रणात येऊ शकतो. ज्यांना सतत रक्तदाब वाढण्याचा अथवा कमी होण्याचा त्रास आहे अशा लोकांनी बीटचे सॅलेड आणि बीटचा ज्युस नियमित घ्यायला हवा. त्यातील पोषक घटक तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

नियमित या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होईल. मात्र त्यासोबत आवश्यक ते वैद्यकिय उपचारदेखील अवश्य घ्या. कारण रक्तदाब अनियंत्रित झाल्यास गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.