ADVERTISEMENT
home / Summer
इको फ्रेंडली समर कलेक्शनचा नवा ट्रेंड, उन्हाळ्यात राहा अधिक कम्फर्टेबल

इको फ्रेंडली समर कलेक्शनचा नवा ट्रेंड, उन्हाळ्यात राहा अधिक कम्फर्टेबल

उन्हाळा म्हटला की सर्वात पहिले समर कलेक्शन अर्थात अगदी मऊ आणि सुती तसंच कॉटनचे कपडे समोर येतात. सतत येणारा घाम, अंगाला चिकटणारे कपडे नकोसे वाटतात. तुम्ही जे कपडे घालत आहात ते तुम्हाला अधिक कम्फर्टेबल वाटायला हवेत. कारण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त त्रास घाम येऊन घामुळे येण्याचा होत असतो. यामुळे सतत चिडचिड आणि अंगाला खाज येणे हे अत्यंत कॉमन आहे. पण आता तुम्हाला वातारवणाशी निगडीत असे इको फ्रेंडली समर कलेक्शनदेखील मिळू शकते. मडामने हे नवे कलेक्शन खास तुमच्यासाठी आणले आहे. अगदी सोबर आणि उन्हाळ्याच्या दिवसात अशा या इको फ्रेंडली समर कलेक्शनचा नवा ट्रेंड नक्की काय आहे हे आपण या लेखातून पाहूया. तुम्हीही या उन्हाळ्यात अशी इको – फ्रेंडली फॅशन नक्की करू शकता.

उन्हाळ्यासाठी निवडा या प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे, त्वचेसाठी ठरतील बेस्ट

पर्यावरणाच्या जागरूकतेचीही गरज

पर्यावरणाच्या जागरूकतेचीही गरज

Madame Eco – Aware Collection

ADVERTISEMENT

आपण जेव्हा कपडे वापरतो तेव्हा ते वातावरणाला साजेसे आहेत की नाही अथवा आपल्या पर्यावरणाला पूरक आहेत की नाही हेदेखील पाहणं गरजेचे आहे. आपल्याकडे सध्या पर्यावरणाला पूरक नसणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा वापर करण्यात येतो. पण मडामने असे काही कपडे समर कलेक्शनमध्ये आणले आहेत जे पर्यावरणाला पूरक असून या उन्हाळ्यात तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येईल. हे कपडे रिसायकल करता येण्याजोगे असून हे कॉटन ऑर्गेनिक स्वरूपाचे असल्याचे मडामचे कार्यकारी संचालक अखिल जैन यांचा दावा आहे. इतर गोष्टींसह ग्राहकांना अत्यंत जबाबदारीने कपड्यांचीही निवड करायला हवी. जेणेकरून आपण इको फ्रेंडली कपडे वापरून पर्यावरणालाही मदत करू शकतो. ग्राहकांसाठी हे खास कलेक्शन तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे कलेक्शन अत्यंत साधे तरीही अत्यंत आकर्षक असे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत कम्फर्टेबल फॅशन म्हणून तुम्ही हे कपडे परिधान करू शकता. त्याशिवाय याचा साधेपणा हेच याचे वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑफिस असो अथवा अगदी बाहेर जायचं असो तुम्ही कुठेही जाताना हे कलेक्शन वापरू शकता. 

हवा असेल स्लिम लुक तर वापरा या रंगाचे कपडे

ड्रेस, टॉप्स, जॅकेट्स, जंपसूट्सचे इको अवेअर कलेक्शन

ड्रेस, टॉप्स, जॅकेट्स, जंपसूट्सचे इको अवेअर कलेक्शन

मडामच्या या नव्या इको – अवेअर कलेक्शनमध्ये फ्लोरल ड्रेस, टॉप्स, जॅकेट्स, जंपसूट्स आणि पंँट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हीदेखील तुमच्या आवडीप्रमाणे यामधील इको अवेअर कलेक्शन नक्कीच निवडू शकता. याची किंमतही खिशाला परवडेल अशी अशी आहे. साधारण 1699 – 2999 च्या किमतीमध्ये हे उपलब्ध आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त कम्फर्मेटबल वाटावे आणि अंगाला जराही कपडा चिकटू नये असं ही कलेक्शन आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे कलेक्शन इको – फ्रेंडली असल्याने खराब झाल्यानंतरही तुम्ही पुन्हा हा कपडा वापरात आणू शकता. तुम्हाला जर सोबर आणि अप्रतिम लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच एकदा तरी या कलेक्शनचा वापर करायला हवा. हे खास डिझाईन बनविण्यात आले असून ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो आणि अंगावर पुरळ येणे अथवा खाज येणे असे त्रास असतील त्यांच्यासाठी हे कलेक्शन नक्कीच पर्वणी ठरेल. तसंच पर्यावरणासाठीही एक लहानसे सहकार्य म्हणून आपण या कलेक्शनकडे नक्कीच पाहू शकतो. प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवे असे हे कलेक्शन आहे.

ADVERTISEMENT

लाँग शर्ट आहे सध्याचा नवा ट्रेंड, अशी करा स्टायलिंग

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT