ADVERTISEMENT
home / Fitness
pittashay stone in marathi

पित्ताशयातील खडे घरगुती उपाय (Home Remedies For Pittashay Stone In Marathi)

बदलत्या जीवनशैलीचा आपल्या सगळ्यांच्याच आरोग्यावर खोलवर परिणाम होऊ लागला आहे. अनेक नव्या शारीरिक समस्या या वयाआधीच अनेकांना होऊ लागल्या आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्याच शरीरात वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत. अनेकांच्या पचनशक्तीवर विपरित परिणाम होऊ लागला आहेत. पचनशक्तीशी निगडीत असा एक आजार म्हणजे ‘पित्ताशयातील खडे’ यासंदर्भात तुम्ही अनेकांकडून नक्कीच ऐकले असेल. पित्ताशयाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला की, आपोआपच पित्ताशयामध्ये अशाप्रकारे खडे तयार होतात. तेलकट-तूपाचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे पित्ताशयातील खडे तयार होतात हे एक कारण सगळ्यांनाच माहीत असेल पण पित्ताशयातील खडे म्हणजे काय? पित्ताशयातील खडे घरगुती उपाय आणि लक्षणे यांची माहिती घेणे फारच गरजेचे आहे. जाणून घेऊया पित्ताशयातील खडे (pittashay khade) या संदर्भात महत्वपूर्ण शी माहिती.

पित्ताशयातील खडे म्हणजे काय ? (What Is Gallstone)

पित्ताशयातील खडे

Freepik

ADVERTISEMENT

प्रत्येक मानवी शरीरात पित्तरसाची निर्मिती होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला असलेल्या भागात अर्थात पित्ताशयात म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘Gall Bladder’मध्ये त्याची निर्मिती होत असते. फुग्याच्या आकाराची ही पिशवी असून याचे काम शरीरात तयार झालेले अतिरिक्त पित्त साठवून ठेवणे असते. ज्यावेळी आपण जेवतो. त्यावेळी पित्तनलिकेवाटे हा रस आतड्यांमध्ये सोडला जातो. ज्यामुळे अन्न पचनाची क्रिया ही अगदी सुरळीतपणे होते. ज्या ज्यावेळी आपण अन्न खातो. त्या प्रत्येकवेळी पित्ताशयातून पित्तरस हा सोडला जातो. पण ज्यावेळी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात तेलकट-तूपकट किंवा तंतूमय म्हणजेच फायबरयुक्त पदार्थ येतात अशावेळी पित्तरसाचे कार्य हे थोड्या फार प्रमाणात बिघडू लागते. म्हणजेच पित्तरसाची घनता ही वाढू लागते. या पित्तरसाच्या कार्यात अडथळा आल्यामुळेच याचे खडे होण्यास सुरुवात होते. हे खडे तीन प्रकारांचे असतात. कोलेस्ट्रॉल, पिग्मेंट आणि मिश्र स्वरुपाचे. तेलकट- तूपकट पदार्थ हे एक कारण असले तरी देखील वजन वाढ, महिलांमध्ये गरोदरपणानंतर वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी या कारणामुळेही पित्ताशयातील खडे होऊ शकतात.

पित्ताशयातील खडे लक्षणे (Symptoms Of Pittashay Khade)

पित्ताशयातील खडे लक्षणे

Instagram

ADVERTISEMENT

पित्ताशयात खडे तुम्हाला झाले असतील तर तुम्हाला त्याचा ठराविक त्रास तुम्हाला होऊ लागतो. या त्रासांकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्हाला ही काही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही वेळीच त्याकडे लक्ष द्यायला हवे. जाणून घेऊयात  पित्ताशयातील खडे लक्षणे 

  • पोटात तीव्र वेदना होणे 
  • पोट सतत फुगल्यासारखे वाटणे 
  • तेलकट  किंवा तुपकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात सतत कळ येत राहणे 
  • शौचाचा रंग बदलणे 
  • सतत मळमळल्यासारखे वाटणे 
  • उलट्यांचा त्रास होणे 
  • सतत ताप येणे 
  • दीर्घ श्वास घेतल्यानंतर पोट दुखणे 
  • छातीत मळमळ होणे, छाती दुखणे 
  • थंडीने हुडहुडी भरणे

जाणून घ्या कावीळवर घरगुती आणि आयुर्वेदीक उपचार पद्धती (Kavil Symptoms In Marathi)

पित्ताशयातील खडे घरगुती उपाय (Home Remedies For Gallstones In Marathi)

पित्ताशयातील खड्यांचा त्रास असेल तर काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्हाला थोडासा आराम मिळवता येईल. जाणून घेऊया पित्ताशयातील खडे घरगुती उपाय

ADVERTISEMENT

अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

अॅपल सायडर व्हिनेगर

Instagram

चरबी विरघळवण्यासाठी अॅपल सायडर हे फारच चांगले असते. अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केले की, अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. जर तुम्ही खूप तेलकट-तूपकट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करत असाल तर ते पचण्यासाठी तुम्ही त्यावर थोडे अॅपल सायडर व्हिनेगर पिण्यास काहीच हरकत नाही. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसिड असते. यामध्ये असलेले अॅसिडीक अॅसिड पित्ताशयातील खड्ड्यांना विरघळवण्याचे काम करते. पण याचे सेवन हे थेट करणे ही पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. जर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन करण्याचा विचार करत असाल तर एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर त्या दुप्पट पाणी घेऊन त्याचे सेवन केल्यास त्याचा त्रास होत नाही.

आर्टीचोक (Artichoke)

आर्टीचोक नावाची वनस्पती मिळते जी पित्ताशयातील खडे विरघळवण्यासाठी फारच फायदेशीर असते असे म्हणतात त्याची भाजी करुन खाल्ल्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत होते. काटेरी फुलाच्या आकाराची ही हिरव्या रंगाची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. ही वनस्पती फारच कमी ठिकाणी उपलब्ध असते. त्यामुळे याची चव नेमकी कशी असते हे सांगता येणार नाही. पण अनेक अभ्यासामध्ये या वनस्पतीचा उपयोग पित्ताशयातील खड्यांना विरघळवण्यासाठी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी योग्य असल्याचे निदान करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

वाचा – मुतखड्याचा त्रास होण्यामागची कारणे

अॅक्युपंक्चर (Acupuncture)

पित्ताशयात खडे झाल्यानंतर करण्यासारखा अगदी सोपा असा इलाज म्हणजे ‘अॅक्युपंक्चर’ या व्यायामप्रकारामध्ये तुमच्या शरीराचे ठराविक असे पॉईंट दाबले जातात. आपल्या शरीरात एकूण 44 असे अॅक्युपंक्चर पॉईंट आहेत जे दाबल्यानंतर पित्ताशयाचे कार्य सुरळीत सुरु होते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे पाँईट हाताळले जातात. त्यामुळे यामध्ये विविधता असू शकते. एकूण 44 पॉईंटपैकी काही जण ठराविक पाँईंटचा उपयोग करुन ही समस्या दूर करत असतील. हे करण्यासाठी तुम्हाला शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण लागतं जे तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला हवं. म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

योगा (Yoga)

योगा

Instagram

ADVERTISEMENT

योग हे देखील आरोग्याच्या अनेक तक्रारींसाठी फायदेशीर आहे. पोटासंदर्भात योगाचे अनेक प्रकार आहेत जे पचन कार्य सुलभ करण्यास मदत करतात. वज्रासन,भुजंगासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन,  शलभासन, सर्वांगासन, या आसनांमुळे पोटावर चांगलाच ताण पडतो. पोटावर ताण पडल्यामुळे पित्तरसाची निर्मिती ही योग्यपद्धतीने होते. ज्यांना पोटासंदर्भात किंवा पचनाशी निगडीत असे विकार असतात त्यांना ही काही योगासने करण्यास सांगितली जातात. या आसनांमुळे पोट आणि ओटीपोटावर चांगलाच ताण पडतो. पचनक्रियेमध्ये येणारा अडथळा, बद्धकोष्ठता हा त्रास देखील दूर होऊ शकतो. पित्ताशयात खडे तयार झाले असतील तर ते या काही आसनांमुळे नैसर्गिकपद्धतीने कमी होण्यास मदत मिळते. पित्तरसाची घनता कमी होऊन ते योग्यपद्धतीने अन्नाचे सेवन केल्यानंतर पचनसंस्थेत मिसळते. ज्यामुळे पचनाचे कार्य सुलभ होते. 

एरंडेल तेल (Castor Oil)

पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल देखील पिण्याचा सल्ला दिला जातो. एरंडेल तेल पिणे किंवा त्याचा वापर पोटासाठी करणे हा फार पूर्वीपासून करत असलेला इलाज आहे. एरंडेल तेलामुळे पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत मिळते. अनेकदा तेलकट-तूपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे असे पदार्थ पोटाला चिकटून राहतात. त्यामुळे पोटाशी निगडीत विकार सुरु होतात. बद्धकोष्ठता हा त्यापैकीच एक त्रास. पोटात असलेल्या अन्नाच्या पचनाचे कार्य बिघडले की, आपसुकच पित्ताशयाचे कार्य बिघडू लागते. अशावेळी एरंडेल तेलाचा उपयोग तुम्ही करु शकता. एरंडेल तेलात गरम रुमाल भिजवावा. हा टॉवेल ओटीपोटावर ठेवून द्यावा. त्यामुळे पित्ताशयाच्या कारणामुळे होणारी पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते.

इसबगोल (Plantango Seeds)

इसबगोल

Instagram

ADVERTISEMENT

आहारामध्ये बिघाड झाल्यामुळेच पित्ताशयातील खड्यांचा त्रास होऊ लागतो. अनेकदा डाएट केल्यामुळे पित्ताशय हे आकुंचन पावते. त्यामुळे पित्ताशयाची क्षमता ही कमी होऊ लागते. आहारात सतत बदल केल्यामुळे आणि पित्ताशयाचे आकुंचन-प्रसरण पावण्यामुळे शरीराला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. शरीरात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर मल:चे निसर्जन होणे फारच सोपे होते पण तसे नसेल तर मात्र बराच त्रास होते. इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

लायसिमाचिया वनस्पती (Gold Coin Grass)

जुन्या चायनीज पद्धतीनुसार ही वनस्पतीदेखील या आजारावर फारच फायदेशीर आहे. पित्ताशयातील खडे विरघळून आराम देण्याचे काम हे गवत करते. याला इंग्रजीमध्ये गोल्ड कॉईम ग्रास असेही म्हणतात. या झाडाला केशरी रंगाचे फूल लागते. जे दिसायला खूपच सुंदर असते. चायनीज पद्धतीमध्ये याचा काढा करुम मगच याचे सेवन केले जाते. असे म्हणतात की, पित्ताशयातील खड्यांचे निदान झाले की, सुरुवातीच्या काळातच याचे सेवन करायला हवे. म्हणजे हे खडे विरघळून जाण्यास ते मदत करतात. हल्ली बाजारात पावडर आणि लिक्वीड स्वरुपात हे औषध मिळते. तुम्ही त्याचे सेवन योग्य सल्ल्याने करु शकता.

मिल्क थिस्ल (Milk Thistle)

मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात.ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात असा दावा करण्यात आलेला आहे. अनेक मेडिकल अहवालांमध्ये या गोळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यकृताची स्वच्छता करण्यासाठी यांचा उपयोग अगदी सर्रास केला जातो असे म्हणतात या नुसार या गोळ्या पित्ताशयातील खडयांना मोकळे करुन त्यातून येणारा पाचक रस अन्नात सोडण्यास आणि पोटाचे कार्य योग्यपद्धतीने सुरु राहण्यास मदत करते.

सफरचंदाचा ज्यूस (Apple Juice)

सफरचंदाचा ज्यूस

ADVERTISEMENT

Instagram

कोणत्याही फळांचा रस हा शरीरासाठी चांगलाच असतो. शरीराला उर्जा देण्याचे काम फळांचा रस फार उत्तम पद्धतीने करतात. पण त्याचसोबत फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन C हे पित्ताशयासाठी फारच फायद्याचे असते. सफरचंदाचा रस हा या वर कमालीचा काम करतो. जर तुम्ही सफरचंदाचा रस प्याल तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे अम्लपित्तात परावर्तीत होते. ज्यामुळे पित्ताशयाच्या खड्याचा त्रास कमी होतो. सफरचंद हे सगळ्या फळांमध्ये आरोग्यदायी असं फळ म्हटलं जातं. सफरचंदामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यापैकीच एक फायदा हा पित्ताशयाला आराम देण्याचा असतो. सफरचंदाच्या ज्यूसव्यतिरिक्त तुम्ही संत्री, लिंबू, टोमॅटो यांचाही रस पिऊ शकता. तुम्हाला त्याचा नक्की फायदा जाणवेल.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. पित्ताशयातील खड्यांपासून नैसर्गिकपणे सुटका कशी मिळेल?

पित्ताशयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आहारात आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करणे फारच गरजेचे असते. तेलकट-तूपकट पदार्थ टाळून त्याऐवजी हेल्दी पदार्थ खाण्याकडे अधिक कल दिला की, पित्ताशयाचे कार्य अधिक सुरळीतपणे होण्यास मदत मिळते. याशिवाय योग्य व्यायामही तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवून देण्यास मदत करु शकते.

2. पित्ताशयातील खड्यांचा त्रास असेल तर अंडी खाता येतील का?

अंड हे आरोग्यासाठी चांगले असते. पण त्याचे अति सेवनही शरीरात फॅट वाढवू शकते. जर तुम्हाला पित्ताशयातील खड्यांचा त्रास असेल तर तुम्ही अंड्याचे सेवन हे बेताने करायला हवे. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. अंड्याच्या सेवनामुळे अन्न पचनास मदत होते.पण अति सेवनामुळे शरीरात फॅट वाढण्याची शक्यता जास्त असते.

3. लिंबाचा रस पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत करते का?

पाश्चात्य देशांनी केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल चाटल्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत होते. असे म्हणतात ज्यांना ऑपरेशन करायचे नसेल त्यांनी लिंबू रसाचे सेवन केले तर खडे विरघळण्यास मदत होते. पण योग्य सल्ल्यानंतर याचे सेवन करावे.

21 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT