ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
स्वयंपाकघरासाठी असे निवडा परफेक्ट स्टोरेज कंटेनर

स्वयंपाकघरासाठी असे निवडा परफेक्ट स्टोरेज कंटेनर

स्वयंपाक घरात धान्य आणि मसाले साठवण्यासाठी साठवणीचे डबे म्हणजेच स्टोरेज कंटेनर्स उपयोगी  पडतात. मात्र यासाठी योग्य कंटेनर्स निवडणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा फ्रीजमध्ये उरलेलं अन्न ठेवण्यासाठी तर कधी चिरलेल्या भाज्या, फळं ठेवण्यासाठी आपण असे कंटेनर वापरतो. किचन सेट करण्यापूर्वीच तुम्ही यासाठी योग्य कंटेनर खरेदी करायला हवेत. कारण जर तुमच्या किचनमध्ये योग्य स्टोरेज कंटेनर्स असतील तर तुमचा किचनही आकर्षक दिसतो. यासाठी जाणून घ्या किचनसाठी स्टोरेज कंटेनर्स खरेदी करताना काय काळजी घ्यावी. 

स्टोरेजनुसार कंटेनर्सची साईज निवडा

बाजारात आजकाल विविध मटेरिअल आणि साईजचे स्टोरेज कंटेनर्स मिळतात. मात्र यापैकी कोणती साईज विकत घ्यावी असा तुम्हाला प्रश्न  पडला असेल तर तुमच्या किचन कॅबिनेटमधील आकार आणि  फ्रिजमधली रिकामी जागा याचा अंदाज घ्या. कारण जर यासाठी तुम्ही योग्य आकाराचे डब्बे खरेदी केले तर तुमच्या किचनमध्ये जास्त साहित्य ठेवूनही ते नीटनेटके दिसते. वर्षभराचे धान्य साठवण्यासाठी दहा ते वीस किलोचे डब्बे घ्या, फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी दोनशे, शंभर आणि पन्नास  ग्रॅमचे डब्बे घ्या. रोजच्या वापरातील मसाले साठवण्यासाठी शंभर ते दोनशे ग्रॅमच्या कंटेनर्सची खरेदी करा. 

pexels

ADVERTISEMENT

काचेचे की प्लास्टिकचे कंटेनर्स

किचनसाठी तुम्ही काचेचे कंटेनर्स विकत घ्यावे की प्लास्टिकचे हे सर्वस्वी तुमच्या आवड आणि गरजेवर अवलंबून आहे. काचेच्या बरण्या ट्रान्सफरंट  असल्यामुळे त्यात ठेवलेले धान्य अथवा वस्तू तुम्हाला पटकन सापडतात. शिवाय काचेच्या बरण्यांमध्ये धान्य, मसाले जास्त दिवस टिकतात. मात्र काचेचं सामान सांभाळणं कठीण असतं. शिवाय त्यांची साफसफाई  सावधपणे करावी लागते. घरात लहान मुलं असतील तर काच तुटून त्यांना इजा होऊ शकते. प्लास्टिकचा अती वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जर प्लास्टिकचे डब्बे विकत घेणार असाल तर ते जास्त टिकाऊ आणि चांगल्या गुणवत्तेचे असतील याची काळजी घ्या. 

pexels

डिझाईन कशी असावी

आजकाल स्टोरेज कंटेनर्समध्ये खूप पर्याय मिळतात. ज्यामुळे तुम्हाला विविध डिझाईन यामध्ये निवडता येतात. जर तुमचे कंटेनर्स कमी जाडीचे असतील तर ते जास्त जागा घेत नाहीत. शिवाय योग्य डिझाईन निवडल्यास ते एकमेकांवर रचून ठेवता येतात. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि आवडीप्रमाणे किचन कंटेनर्सची डिझाईन निवडा.

ADVERTISEMENT

फ्रिजसाठी स्टोरेज कंटेनर्स

फ्रिजमध्ये ठेवण्यात येणारे साहित्य खूप दिवस टिकावे हा तुमचा हेतू असतो. मात्र यासाठी फिजमधले डब्बे निडताना ते हवा बंद असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या साहित्याचा गंध एकमेकांमध्ये मिसळला जाणार नाही. भाज्या साठवण्यासाठी मात्र हवेशीर कंटेनर्सची निवड करा. ज्यामुळे भाज्या ताज्या राहतील आणि सडणार नाहीत.  शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवताना  ते काचेच्या डब्यात ठेवा. ज्यामुळे प्लास्टिकचा  संपर्क झाल्यामुळे अन्न दुषित होणार नाही. 

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

मिक्सर अथवा फूड प्रोसेसर वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात, लवकर नाही होणार खराब

स्वयंपाकघरात असायलाच हव्यात या इलेक्ट्रॉनिक वस्तू

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

28 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT