ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
यासाठी साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन (World Book Day 2021)

यासाठी साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन (World Book Day 2021)

जगभरात २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून साजरा केला जातो. वर्षातील हा दिवस पुस्तकांना समर्पित करण्यात आलेला आहे. पुस्तके केवळ वाचनाचे प्रोत्साहन देत नाहीत तर जगण्याचा नवा दृष्टीकोणही देतात. अनेकांचे एकटेपण दूर करणारे ते सखेसोबती असतात. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच आहे. आज संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहे. अनेक देशांमध्ये सतत लॉकडाऊन करण्यात येत आहे. अशा भयंकर परिस्थितीत मनाला शांतता आणि  स्थिरता मिळण्यासाठी वाचनामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं ही एक चांगली गोष्ट आहे. यासाठीच जाणून घ्या जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम सोबतच या निमित्ताने वाचा उत्कृष्ट मराठी कादंबरी यादी (Best Marathi Novels Of All Time)

जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व (World Book Day Significance)

२३ एप्रिल हा दिवस लेखक आणि पुस्तकप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण संपूर्ण जगभरात हा दिवस पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन या नावाने ओळखला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी अधिकच अधोरेखीत होते. असं म्हणतात की, पुस्तके इतिहास आणि भविष्याला जोडणारा दुवा असतात. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यामागचा मुख्य उद्देशच हा आहे की जगभरातील लोकांना वाचनाचे महत्त्व पटावे आणि त्यांना नियमित वाचनाची गोडी लागावी. त्यामुळे भविष्याचा मार्ग दाखवणाऱ्या पुस्तकांचे महत्त्व सांगणाऱ्या या दिवसाचे जितके वर्णन करावे तितके थोडेच आहे. जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने जाणून घेऊया पु.ल. देशपांडे यांची पुस्तके आणि मराठी ऐतिहासिक कादंबरी

जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास (World Book Day History)

पुस्तक दिन जगभरात साजरा करण्यामागे अनेक कारणं आणि कथा सांगितल्या जातात. मीगुएल डी सरवेंटस नावाच्या प्रसिद्ध लेखकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्पेनमधील पुस्तकविक्रेत्यांनी १९२३ मध्ये २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन सुरू केला. कारण हा दिवस या लेखकाची पुण्यतिथी असते. त्याचप्रमाणे असंही सांगितलं जातं की, जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन साजरा करण्यासाठी सुरुवात १९९५ साली युनेस्कोने केली. कारण हा दिवस विल्यम शेक्सपिअर, मीगुएल डी सरवेंटस, जोसेफ प्ला आणि इंका गार्सिलोसो अशा प्रसिद्ध व्यक्तींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे पुस्तकवाचनाची आवड निर्मण होण्यासाठी युनेस्कोने हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला होता. सध्या हा दिवस जगभरातील 100 देशांमध्ये साजरा केला जातो. काही कारणात्सव इंग्लंड आणि आर्यलंडमध्ये हा दिवस 3 मार्चला साजरा होतो. प्रत्येक देशात हा दिवस साजरा करण्याची पद्धत निरनिराळी आहे. काही देशांमध्ये या दिवशी विनामुल्य पुस्तक विक्री केली जाते. तर काही देशांमध्ये यासाठी खास स्पर्धांचे आयोजन केले जाते. काही देशांमध्येतर या दिवशी खास वाचन मॅरोथॉन आयोजित केल्या जातात.लेखक, प्रकाशक, शिक्षक, वाचक, शैक्षणिक, खाजगी आणि सामाजिक संस्था, चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  याचप्रमाणे दरवर्षीसाठी पुस्तक दिनाची एक खास थीम ठरवली जाते. या खास दिवशी वाचा सर्वोत्कृष्ट मराठी रहस्यमय कादंबरी (Best Marathi Horror Novels)

काय आहे यावर्षीची थीम (World Book Day 2021 Theme)

जगभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा दिवस सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो. मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच  या वर्षीदेखील कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. म्हणूनच या वर्षी म्हणजे 2021 च्या जागतिक पुस्तक दिनाची थीम आहे ‘Share a Story’ म्हणजे एखादी कथा अथवा कहाणी शेअर करणे. या थीम अंतर्गत तुम्ही तुमची कथा शेअर करून लहान मुलांना आणि इतरांना प्रोत्साहन देऊ शकता. घरातच राहून तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत व्हिडिओ चॅटमध्ये अशा स्टोरीज शेअर करू शकता. सोशल मीडिया हा देखील यासाआठी एक उत्तम पर्याय ठरेल. थोडक्यात घरातच राहा आणि सुरक्षित जागतिक पुस्तक दिन साजरा करा. मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे (Best Novels & Books In Marathi) 

ADVERTISEMENT

You Might Also Like

World Book Day Quiz in English

World Book Day Activities in English

21 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT