आताचा काळ हा पुस्तकांचा राहिलेला नाही. म्हणजे फारच कमी जणांना पुस्तक वाचायला आवडतात. ज्यांना पुस्तक वाचायला आवडतात ते हल्ली E-Book स्वरुपातील पुस्तकं वाचतात. तुम्हाला वाचनाची आवड असेल किंवा नसेल पण मराठीतील दर्जेदार साहित्य तुम्ही नक्की वाचायला हवे. आम्ही तुमच्यासाठी मराठीतील काही दर्जेदार साहित्याची एक यादीच तयार केली आहे. यामध्ये आत्मचरित्र, कथा, कादंबरी अशा साहित्यांचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पुस्तकं वाचू शकता. हे साहित्य वाचल्यानंतर तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टि नक्कीच मिळेल.
मराठी साहित्यातील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकापासून आहे. कादंबरी हा प्रकार इंग्रजी राजवटीपासून आहे. मराठीतील पहिली कादंबरी म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती कादंबरी म्हणजे हरी केशवजी यांची इ.स. 1841 साली आलेली ‘यात्रिक्रमण’ नावाची कादंबरी. पण मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून बाबा पदमनजी यांच्या ‘यमुनापर्यटन’ कादंबरीचे नाव घेतले जाते. काळानुसार मराठी कादंबऱ्यामध्ये अनेक स्थित्यंतरे आली. समाजातील मुख्य घटना प्रकाशझोतात आणण्यासाठी कादंबरी लिहिल्या जाऊ लागल्या. अभिव्यक्त होण्याचा कादंबरी एक मार्ग बनला. साठोत्तरी कांदबऱ्यांनी मराठी साहित्याला वेगळीच दिशा दिली. त्यानंतर आलेल्या मराठी साहित्यात अनेक वेगळे विषय मांडले गेले. स्त्रीवादी साहित्यालाही या काळात चांगली प्रेरणा मिळाली आणि अनेक लेखिका मराठी साहित्याला मिळाल्या आणि यामध्ये एक समृद्ध असं स्त्रीवादी साहित्यही मराठी साहित्यात आहे.
मराठी साहित्याला अनेक लेखकांचे योगदान लाभले आहे. या लेखकांचा विचार केला तर ही यादी कधीच संपणार आहे. पण तरीही काही कादंबरीकारांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ना. स. रिसबूड, रा.भी. गुंजीकर, हरिभाऊ आपटे,नाथमाधव, ना.ह. आपटे, मामा वरेकर, वि. स. खांडेकर, बा.सी. मर्ढेकर, गो.नी. दांडेकर साठोत्तरीनंतरचे मधू मंगेश कर्णिक, भाऊ पाध्ये, भालंचद्र नेमाडे, अरुण साधू, जयवंत दळवी अशा काही लेखकांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. लेखिंकामध्ये गौरीं देशपांडे, शांता शेळके, दुर्गा भागवत, प्रिया भागवत, सानिया, मेघना पेठे ही काही नावे घ्यावी लागतील.
मराठीमध्ये उत्तम आणि दर्जेदार अशी आत्मचरित्रे आहेत. ही आत्मचरित्रे तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी देतील. तुम्ही कशापासून वाचनाची सुरुवात करु असा विचार करत असाल आणि तुम्हाला प्रेरणादायी असे काही वाचायचे असेल तर तुम्ही ही आत्मचरित्र नक्की वाचू शकता.
पुस्तकाचे लेखक (Book author): भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम आझाद
पुस्तकाचे सार (Description): भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम आझाद म्हणून प्रत्येक भारतीय अब्दुल कलाम आझाद यांना ओळखते. अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र असून त्यांनी त्यात त्यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्यांचे आत्मचरित्र केवळ त्यांची संघर्षकथा नसून येणाऱ्या कित्येक पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. यामधून मुलांना नक्कीच नव्या गोष्टी कळतील
पुस्तकाचे लेखक (Book author): लक्ष्मीबाई टिळक
पुस्तकाचे सार (Description): लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनाचा पारदर्शी जीवनपट मांडणारे असे आत्मचरित्र आहे. इ.स 1860 ते 1960 या कालावधीत तत्कालीन सामाजिक स्थिती, स्त्रियांचा समाजातील दर्जा, धर्मासंबंधीची मते तुम्हाला त्यांच्या आत्मचरित्रातून अनुभवता येतात.
पुस्तकाचे लेखक (Book author): विजया मेहता
पुस्तकाचे सार (Description): झिम्मा हे लेखिका विजया मेहता यांचे आत्मचरित्र लिहिले असून हे त्यांचे नुसतेच आत्मचरित्र नाही तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे. त्यांची अनेक नाटके गाजली. त्या काळातील रंगभूमीची स्थित्यंतरे तुम्हाला त्यांच्या या आत्मचरित्रात अनुभवता येतात.
पुस्तकाचे लेखक (Book author): आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
पुस्तकाचे सार (Description): आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे हे प्रसिद्ध आत्मचित्र असून आचार्य अत्रे यांची मुलगी मीना देशपांडे यांनी त्याचे वेगवेगळ्या खंडात रुपांतर केले असून नुकताच त्याचा 6 वा खंड देखील प्रकाशित करण्यात आला.
पुस्तकाचे लेखक (Book author): दया पवार
पुस्तकाचे सार (Description): लेखिका दया पवार यांचे आत्मकथन असून दलित साहित्यातील हे पहिले आत्मचरित्र आहे. त्यामुळे दलित साहित्यासाठी हे फार महत्वाचे आहे. या आत्मकथनाच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकाच्या अस्तित्वाची जाणीव होते. सामाजिक इतिहासाचे दर्शन या आत्मकथनातून होते.
पुस्तकाचे लेखक (Book author): किशोर शांताबाई काळे
पुस्तकाचे सार (Description): किशोर काळे यांचे गाजलेले आत्मकथन आहे. दुसऱ्यांना हीन ठरवणाऱ्या या समाजात समाजाशी संघर्ष करुन स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या एका मुलाची ही कहाणी आहे. वडील माहीत नसल्यामुळे हा मुलगा त्याच्या आईचे नाव लावतो. त्याची आई वाईट कामातून बाहेर पडते. पण तरीदेखील आयुष्याची परवड थांबत नाही. तिला संघर्ष करुन आयुष्य जगावे लागते. पण ती तिला हवं ते मिळवून देते.
पुस्तकाचे लेखक (Book author): लक्ष्मण माने
पुस्तकाचे सार (Description): लक्ष्मण माने यांचे हे आत्मचरित्र असून आयुष्यात आलेले प्रत्येक अनुभव त्यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात त्यांना आलेले अनुभव त्यांनी मांडले आहेत.
पुस्तकाचे लेखक (Book author): शाहीर साबळे
पुस्तकाचे सार (Description): महाराष्ट्राच्या इतिहासात शाहीर साबळे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांच्या पोवाड्याने शत्रूची आक्रमणे परतून लावण्यासाठी बळ दिले. अशा शिवशाहीरांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टी या आत्मचरित्रास मांडण्यात आल्या आहेत.
पुस्तकाचे लेखक (Book author): मोहनदास करमचंद गांधी (अनुवादित)
पुस्तकाचे सार (Description): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टी त्यांनी या त्यांच्या आत्मकथनात लिहून ठेवला आहे. तो काळ जगताना आणि स्वातंत्र्याची लढाई लढतानाचा तो अनुभव नक्कीच वाचायला हवा.
वाचा - साहित्य म्हटले की, पु.ल., जाणून घेऊया पु.ल. देशपांडे यांची पुस्तके
पुस्तकाचे लेखक (Book author): डॉ. श्रीराम लागू
पुस्तकाचे सार (Description): डॉ. श्रीराम लागू यांच्या नाट्यप्रवासाचा हा धावता आढावा आहे. जो तुम्हाला एक वेगळा अनुभनव नक्की देईल.
मराठी साहित्यामध्ये अशी अनेक पुस्तके आहेत. जी तुमचे आयुष्य बदलून टाकतात. तुमचा अनुभव समृद्ध करणारी अशी काही पुस्तके खास तुमच्यासाठी
पुस्तकाचे लेखक (Book author): अरुण साधू
पुस्तकाचे सार (Description): मुंबई अनेकांसाठी मायानगरी आहे. पण या मायानगरीत राहताना तेथील राजकारण, समाजकारण घडवणारी अशी ही कादंबरी आहे. ही कादंबरी एकदा वाचावी अशी आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): भाऊ पाध्ये
पुस्तकाचे सार (Description): महानगराच्या औद्योगिक युगात हरवत चाललेल्या एका तरुणाची ही कहाणी आहे. कुटुंबातील नाती कशी हरवत जातात हे कथानक या कादंबरीच्या मुळाशी आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): मधु मंगेश कर्णिक
पुस्तकाचे सार (Description): मधु मंगेश कर्णिकांची ही प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यांची ही कादंबरी झोपडपट्टीतील भयाण वास्तवाची ओळख आपल्याला करुन देते. प्रचंड गरिबी आणि गरिबीतून होणारे गुन्हे यामध्ये दाखवण्यात आले आहेत. एकीकडे महानगराची चमकधमक असताना दुसरीकडे महानगराचे भीषण वास्तवही ही कादंबरी घडवते.
पुस्तकाचे लेखक (Book author): मिलिंद बोकील
पुस्तकाचे सार (Description): मिलिंद बोकीलांची शाळा ही कादंबरी फारच प्रसिद्ध आहे. ही कादंबरी साधारण 1975 साली इयत्ता नववीत शिकणाऱ्या चार पौंगडावस्थेतील मुलांसोबत एका वर्षात घडणारी ही कथा आहे. जी एक वेगळा अनुभव देते.
मुंबईत राहणाऱ्या bollywood सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का
पुस्तकाचे लेखक (Book author): आनंद यादव
पुस्तकाचे सार (Description): तमाशातील नाच्याचे आयुष्य काय असते ही सांगणारी ही कथा आहे. एक साधा तरुण तमाशातील नाच्याची भूमिका करतो आणि त्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलते ते ही कथा सांगते.
पुस्तकाचे लेखक (Book author): भालचंद्र नेमाडे
पुस्तकाचे सार (Description): भालचंद्र नेमाडे यांची ही प्रसिद्ध कादंबरी आहे.ती त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी लिहिली. ही एका अशा तरुणाची आत्मकथा आहे. पांडुरंग सांगवीकर याचीही कथा असून कोसलाने कादंबरी विश्वाला एक वेगळी दिशा दिली.
पुस्तकाचे लेखक (Book author): योगिराज बागूल
पुस्तकाचे सार (Description): तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. या लोककलेने अनेकांना ओळख दिली. विठाबाई नारायणगावकर यांनी अगदी लहानवयापासून फडावर कला सादर करायला सुरुवात केली ते वयाच्या सत्तरीपर्यंत त्या नाचत होत्या. पण त्यांच्या आयुष्यातही अनेक चढ- उतार आले.
पुस्तकाचे लेखक (Book author): व्यंकटेश माडगुळकर
पुस्तकाचे सार (Description): बनगरवाडी ही कादंबरी प्रादेशिक कादंबऱ्यांमध्ये मोडते. बनगरवाडीतील अनुभवांचे योग्य कथन यामध्ये करण्यात आले आहे. स्वत: माडगुळकर या भागातील असल्यामुळे त्यांना याची जास्त समज असल्याचे दिसते.
पुस्तकाचे लेखक (Book author): मिलिंद बोकील
पुस्तकाचे सार (Description): गवत्या ही मिलिंद बोकील यांची कादंबरी आहे. सततच्या नोकरी बदलामुळे कंटाळलेला तरुण गावी येऊन स्थिरावतो. त्याचे तेथील प्रत्येक गोष्टीशी भावनिक नाते जुळते. हेच या कादंबरीतून दाखवण्यात आले आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): आनंद यादव
पुस्तकाचे सार (Description): झोंबी ही एक आत्मचरित्रपर कादंबरी आहे. झोंबी म्हणजे झोंबणे..एकाने दुसऱ्याशी झोंबणे. यामध्ये आनंद यादव यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा संघर्ष, दारिद्रय या सगळ्या गोष्टी यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
मराठी साहित्यामध्ये महिलांनी लिहलेल्या साहित्याचाही मोठा वाटा आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध असलेली अशी ही पुस्तके असून तुम्हाला जर अशी महिला केंद्री पुस्तके वाचायची असतील तर तुम्ही ही नक्कीच वाचू शकता.
पुस्तकाचे लेखक (Book author): गौरी देशपांडे
पुस्तकाचे सार (Description): स्त्री-पुरुष नात्यांमधील सूक्ष्म पदर गौरी देशपांडे यांनी त्यांच्या या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा कथासंग्रह वेगवेगळ्या अनुभव कथांनी समृद्ध आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): कविता महाजन
पुस्तकाचे सार (Description): एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती असा तिचा सुरु झालेला तिचा प्रवास. तिचे अनुभव. बाई म्हणून जीवन जगताना आलेल्या मर्यादा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): आशा बगे
पुस्तकाचे सार (Description): दर्पण म्हणजेच आरसा आयुष्य जगताना येणारे वेगवेगळे अनुभव या कथासंग्रहामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही हा कथासंग्रह वाचायलाच हवा.
पुस्तकाचे लेखक (Book author): आशा बगे
पुस्तकाचे सार (Description): स्त्री-पुरुष संबंधातील शोध हा न संपणारा असा आहे. हे नाते समजून घेताना अनेक गोष्टी आपल्याकडून निसटून जातात. याचाच शोध घेणारा असा हा आशा बगे यांचा कथासंग्रह आहे
पुस्तकाचे लेखक (Book author): प्रिया तेंडुलकर
पुस्तकाचे सार (Description): पंचतारांकित हॉटेलात काम करताना आलेला प्रिया तेंडुलकरचा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो. पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची इच्छा त्यामधील चॅलेंजेस हा सगळा अनुभव तुम्हाला यामध्ये वाचता येईल.
पुस्तकाचे लेखक (Book author): निर्मला देशपांडे
पुस्तकाचे सार (Description): विवाहोत्तर आयुष्य हे नेहमीच वेगळे असते. या कादंबरीतून अपर्णा आणि निशांत यांची विवाहोत्तर कहाणी सांगण्यात आली आहे. तु्म्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर तुम्ही ही कादंबरी वाचायला हवी.
पुस्तकाचे लेखक (Book author): गौरी देशपांडे
पुस्तकाचे सार (Description): गौरी देशपांडेंचा ही कादंबरी म्हणजे तुम्हाला एक वेगळाच अनुभव देणारी आहे. ललित, कथा यांचा यामध्ये समावेश आहे.
किवी (Kiwi) तुमच्या फिटनेस आणि त्वचेसाठी आहे वरदान, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
पुस्तकाचे लेखक (Book author): गौरी देशपांडे
पुस्तकाचे सार (Description): गौरी देशपांडे यांचे हा कथासंग्रह म्हणजे त्यांना सुचले त्याचे अनुभव आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या कथा वाचण्याची आवड असेल तर तुम्ही विंचुर्णीचे धडे नक्की वाचा.
पुस्तकाचे लेखक (Book author): शांता गोखले
पुस्तकाचे सार (Description): शांता गोखले यांनी लिहलेले हे पुस्तक तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतील. या कादंबरीची मुख्य नायिका रिटा वेलीणकर आहे. हे तुम्हाला कळलेच असेल.
पुस्तकाचे लेखक (Book author): प्रिया तेंडुलकर
पुस्तकाचे सार (Description): प्रिया तेंडुलकर यांचा हा कथासंग्रह आहे. तिहार जगमगत्या स्त्रियांच्या कथा असे याचे नाव असून स्त्री जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या कथा त्यांनी यामध्ये लिहिलेल्या आहेत.
रहस्यमयी साहित्यांचेही मराठी साहित्यात खूप असे योगदान आहे. जर तुम्हाला रहस्यमयी पुस्तक वाचायचे असतील. तर तुम्ही मराठी साहित्यातील रहस्यमयी पुस्तक वाचायला हवीत.
पुस्तकाचे लेखक (Book author): नारायण धारप
पुस्तकाचे सार (Description): नावाप्रमाणेच नारायण धारप यांच्या या गुढमय कादंबरीची कहाणी आहे. जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
पुस्तकाचे लेखक (Book author): चि. त्र्य. खानोलकर
पुस्तकाचे सार (Description): भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा शोध घेताना अनेक नवे पैलू या कादबंरीत उलगडण्यात आले आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): रमा पार्वतीकर
पुस्तकाचे सार (Description): आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेले गूढ या पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यामुळे काही घटना तुम्हाला तुमच्या आयुष्याशी समरुप करायला भाग पाडतात.
पुस्तकाचे लेखक (Book author): नारायण धारप
पुस्तकाचे सार (Description): अकस्मात नाहीशा होणाऱ्या व्यक्ती.. गूढतेचे वलय व अधिक गहिऱ्या करणाऱ्या अकल्पित घटना यामध्ये नारायण धारण यांनी मांडल्या आहेत.
पुस्तकाचे लेखक (Book author): रत्नाकर मतकरी
पुस्तकाचे सार (Description): खेकडा हा रत्नाकर मतकरी यांचा गूढ असा कथासंग्रह आहे.खेकडा म्हणजे दंश करणारा..अशाच रत्नाकर मतकरी यांच्या खेकडा मधील कथा मनावर दंश करतात. त्या काही काळासाठी तुम्हाला सुन्न करुन टाकतात.
पुस्तकाचे लेखक (Book author): रत्नाकर मतकरी
पुस्तकाचे सार (Description): गूढ कथा म्हटलं की, रत्नाकर मतकरी यांचेच नाव घेतले जाते. रत्नाकर मतकरी यांचा अंतर्बाह्य हा कथासंग्रह देखील आपल्याला रोखून धरतो.
महाराष्ट्राला एकूणच देशाला एक वेगळा इतिहास आहे इतिहासातील काही महत्वपूर्ण घटनांचा तुम्ही नक्कीच वेध घ्यायला हवा. अशा ऐतिहासिक पुस्तकांची माहिती खास तुमच्यासाठी
पुस्तकाचे लेखक (Book author): रणजित देसाई
पुस्तकाचे सार (Description): बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण पणाला लावून घोडखिंड लढवली आणि राजांचे प्राण वाचले. बाजीने स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा आणि पराक्रमाच्या सहाय्याने खिंडीची पावनखिंड बनवली. बाजीच्या देदिप्यमान देशभक्तीचे, अतुलनीय शौर्याचे, वीरश्रीपूर्ण चित्रण या कादंबरीत आढळते.
पुस्तकाचे लेखक (Book author): वि. स. वाळिंबे
पुस्तकाचे सार (Description):1933 ते 43 ही दहा वर्षे हिटलरची होती-एकट्या हिटलरची.विसाव्या शतकाने अनुभवलेल्या या विनाशक वादळाची ही चरितकहाणी आहे. इतर कोणापुढेही हिटलरचा पराक्रम हा फार मोठा होता.
पुस्तकाचे लेखक (Book author): शिवाजी सामंत
पुस्तकाचे सार (Description): संभाजीराजांचे हे स्फूर्तिदायक चरित्र असून लेखक शिवाजी सावंत यांच्या या पुस्तकानं मराठी मनाला वेड लावलं. १९७९ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. हे पुस्तक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): विश्वास पाटील
पुस्तकाचे सार (Description): पानिपतचं युद्ध ही महाराष्ट्राच्या काळजात गेली अडीचशे वर्ष रुतणारी ऐतिहासिक घटना. आणि या घटनेवरची 'पानिपत' ही विश्वास पाटील यांची गेली अडीचशे महिने लाखो वाचकांच्या हृदयांत घर केलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. त्यामुळेच ही कादंबरी तुम्ही वाचायला हवी.
पुस्तकाचे लेखक (Book author): ना.स. इनामदार
पुस्तकाचे सार (Description): ना. स. इनामदार यांची ही अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. मात्र, कादंबरीची मोहिनी वाचकांच्या मनावर आजतागायत कायम आहे. मराठी साम्राज्याची विजयपताका कायम राखणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि वादळ उठले. या वादळामुळे पेटलेल्या संघर्षातही प्रेमाची ज्योत कायम राहिली. इतिहासाचा हाच धागा पकडून इनामदार यांनी अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही कहाणी रंगविली आहे
पुस्तकाचे लेखक (Book author): रणजित देसाई
पुस्तकाचे सार (Description): महाराष्ट्राच्या इतिहासातील झगमगता तेजपुंज म्हणजे छत्रपती शिवाजी महारा..पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे. यामध्ये ती अत्यंत रोमहर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): प.स. देसाई
पुस्तकाचे सार (Description): 1857 साली जे देशात बंड झाले होते. नवीन कंपनी सरकारने जी राजसत्ता स्थापन केली. ती नष्ट करण्याच्या हेतुने शिपायांनी बंडाचा वणवा पेटवला.
पुस्तकाचे लेखक (Book author): वीणा गवाणकर
पुस्तकाचे सार (Description): नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं.
तुम्हाला रोमँटीक कादंबरी वाचण्याची इच्छा असेल तर मराठीत उत्तम प्रेमकथा ही आहे. काही प्रेमकथा या फार जुन्या काळातील आहे. तर काही अगदी आताच्या काळातील आहेत. त्याही तुम्ही वाचायला हव्यात
पुस्तकाचे लेखक (Book author): नितीन गणपत शिंदे
पुस्तकाचे सार (Description): एका शिक्षकाच्या विलक्षण प्रेमाची, संघर्षाची आणि समाज घडवण्याची,त्यागाची ही एक विलक्षण प्रेमकहाणी आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): गो.नी. दांडेकर
पुस्तकाचे सार (Description): तुम्हाला प्रेमाचा एक वेगळा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही उडोनी हंस चालला ही कादंबरी पाहायला हवी.
पुस्तकाचे लेखक (Book author): प्रा. धनंजय कोल्हे
पुस्तकाचे सार (Description):शिरी फरहाद आणि लैला मजनूप्रमाणेच ही कहाणी असून ही प्रेमकथा एक शोकान्तिका आहे.
पुस्तकाचे लेखक (Book author): गौरी साखरे
पुस्तकाचे सार (Description): ही एक वेगळी प्रेमकथा आहे.या कथेतील नायक हा समलिंगी नसतो. पण अशा प्रकारच्या अत्याचाराला तो बळी पडतो. तो स्त्रियांचा तिरस्कार करु लागतो.