ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
चोकर सेट जे वाढवतील तुमच्या गळ्याची शोभा

चोकर सेट जे वाढवतील तुमच्या गळ्याची शोभा

कमीत कमी दागिने हा सध्याचा ट्रेंड आहे. आता हा ट्रेंड आला असला तरी देखील खूप जणांना जास्तीचे दागिने घालायला मुळीच आवडत नाही. कमीत कमी दागिने घालायचे असतील पण तरीही तुम्हाला चांगले दिसायचे असेल तर तुम्ही नक्कीच चोकर सेट ट्राय करायला हवेत. हल्ली साडी असो किंवा ट्रेडिशन पंजाबी ड्रेस या सगळ्यावर हा चोकर सेट आवर्जून घातला जातो. असा एकतरी चोकर सेट तुमच्याकडे असायला हवा. इमिटेशन ज्वेलरीचा हा प्रकार अगदी सहज सगळीकडे उपलब्ध आहे. तुमच्या बजेटमध्ये मिळणाऱ्या दागिन्यांमध्ये अनेक वेगळे प्रकार आहेत. पण साधारण हे चोकर सेट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की राजस्थानची आठवण आल्यावाचून राहणार नही. जाणून घेऊया असेच काही चोकरसेट तुम्ही कुठून घेऊ शकता आणि स्टायलिंग कसे करु शकता याविषयी

प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने

फ्लोरल चोकर सेट 

सर्वसाधारणपणे नेकलेस म्हटला की, त्यामध्ये फुलांची डिझाईनही अगदी हमखास आली. जर तुम्हाला फ्लोरल डिझाईन आवडत असतील तर तुमच्यासाठी ही डिझाईन फारच सुंदर आहे. या सेटमध्ये तुम्हाला हाय नेकचा पर्याय मिळतो. जर तुमची मान लांब असेल तर अशांना अशा पद्धतीचे नेकलेस फार उठून दिसतात. पण हा असा हेवी नेकपीस घालताना घालणाऱ्याची मानंही तितकी उंच असायला हवी तरच हा चोकरसेट फार उठून दिसतो. यामध्ये तुम्हाला गोल्डनचे काम अधिक दिसून येते. त्यामुळे हा असा चोकरसेट साडीची शोभा नक्कीच वाढवतो. 

ADVERTISEMENT


मल्टी कलर चोकर सेट
प्रत्येक ड्रेसवर दागिना उठून दिसला तर पैशांची तर बचत होतेच. शिवाय असे नेकपीस अगदी कोणत्याही रंगाच्या आऊटफिटवर घालता येतात. सर्वसाधारणपणे अमेरिकन डायमंड, लाल, पिपळा आणि हिरव्या रंगाच्या खड्यांमध्ये हे हार गुंफले जातात. त्यामुळे अधिक सुंदर दिसतात. जर तुम्ही खूप दागिन्यांचे शौकीन नसाल तर तुम्हाला अशा पद्धतीने पैसे वाचवणारा चोकर सेट घेण्यास काहीच हरकत नाही. तुमच्या साडी किंवा ड्रेसवर अशापद्धतीने चोकरसेट फारच उठून दिसतात. तुम्हाला ऑनलाईनपद्धतीने हे चोकरसेट घेता येतील. 

कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका

चोकर सेट

Instagram

ADVERTISEMENT

पर्ल चोकर सेट
मोती हे कधीच फॅशनच्या बाहेर जात नाहीत. तुम्हाला अगदी कधीही आणि कोणत्याही प्रसंगी हे असे चोकर सेट आरामात घालता येतात. तुम्हीही अगदी हमखास हा पर्ल सेट खरेदी करावे असे असतात. मोत्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायची अगदी हमखास मिळू शकतात. बारीक मोती, मोठे मोती असे मोती तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता. इमिटेशन ज्वेलरीमध्ये हा प्रकार खूपच सुंदर प्रकारात मिळतो. त्यामुळे हे असे सेट तुम्ही नक्कीच घ्यायला हवेत.


कुंदन चोकर सेट
कुंदन हे तुमच्या कोणत्याही ज्वेलरीमध्ये अगदी उठून दिसणारा असा प्रकार आहे. कुंदन चोकर सेट हे फारच सुंदर आणि हटके डिझाईन्समध्ये असतात. तुम्हाला अगदी लाईट पॅटर्न पासून थोडे हेव्ही कुंदन असे प्रकार मिळू शकतात. खरे कुंदन सोन्यात जडवून घेतले तर ते थोडे महाग पडतील. पण इमिटेशनमध्ये घ्याल तर तुम्हाला ते नक्कीच आवडतील. हे कंदन सेटही तुम्हाला 1 हजार रुपयांपासून पुढे मिळतील. 


आता नक्की ट्राय करा हे वेगवेगळे चोकर सेट आणि दिसा रॉयल

लग्नात सोन्याहूनही अधिक सुंदर दिसतील दागिन्यांचे हे प्रकार

ADVERTISEMENT
05 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT