नवरी नटली… आज बाई सुपारी फुटली…. लग्नाची तयारी सुरु झाली की, नवरीचे दागदागिने घेण्याची वेळ येते. सोन्याचे दागिने नवरीसाठी अगदी हमखास केलेच जातात. पण आता सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टिफिशिअल अशा दागिन्यांचा ट्रेंड आहे. त्यातही गोल्ड प्लेटेट दागिन्यांपेक्षा ही सिलव्हर प्लेटेट दागिन्यांचा ट्रेंड आहे. या ट्रेंडमुळेच हल्ली बाजारात सगळीकडे असे दागिने सर्रास मिळू लागले आहेत. तुमची साडी असो वा लेहंगा तुमच्या कोणत्याही लग्नातील अटायरवर हे दागिने फारच चांगले दिसतात.
सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी (Jewellery Trends In Marathi)
सिल्वहर स्टडेट स्टोन सेट
स्टोनचे म्हणजेच अमेरिकम डायमंडचे सेट हे आपल्या कित्येकांना आवडतात. पण आता या स्टोनमध्ये तुम्हाला विविधता पाहायला मिळते. ही विविधता ही त्याच्या मागच्या कामावर असते. सिल्वहर प्लेटवर केलेले स्टोन्सचे हे काम दिसायला फारच सुंदर दिसते. त्यामुळे हे दागिने चमकले तरी देखील त्याला सोन्यासारखी चमक नसते. त्यामुळे हे दागिने लग्नातल्या कोणत्याही समारंभात छान उठून दिसतात. यातले हेव्ही सेट तुम्ही ट्राय केले तरी ते चांगले दिसतात. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या आऊटफिटनुसार याची निवड करु शकता.
सिलव्हर प्लेटेड ट्रेडिशनल वेअर
हल्ली साडींचा काठ हा गोल्डन नाही तर सिल्व्हर शेडमध्ये असतो. त्यामुळे अशावेळी काही खास दागिने आपण खरेदी करतो. सिल्व्हरमध्ये साज, ठुशी असे काही प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पण आता सिल्व्हर टोनमध्ये वेगवेगळे गळ्यातले आणि कानातले पाहायला मिळतात. हे असे दागिने रेग्युलर दागिन्यांपेक्षा अधिक चांगले दिसतात. सिल्व्हर प्लेटेड दागिने हे जड वाटत असले तरी हे नवीन प्रकारातील दागिने अजिबात जड नसतात. त्यामुळे तुम्हाला हे दागिने साडीवर ही घालता येतात. त्यामुळे हे दागिने दिसायला फारच सुंदर दिसतात.
मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी (Mahashtrian Mangalsutra Designs)
इंडो-वेस्टर्न ज्वेलरी
आता वर पाहिलेल्या ज्वेलरी या जरी थोड्या इंडो-वेस्टर्न प्रकारातल्या असल्या तरी देखील त्या खूप मोठ्या समारंभाना चांगल्या दिसतात. पण जर तुम्ही एखादा वेस्टर्न वेअर घातला असेल आणि त्यावर तुम्हाला थोडे लईटवेटेड दागिने हवे असतील तर तुम्ही थोडे इंडो-वेस्टर्न प्रकारातील दागिने घालू शकता. या दागिन्यांमध्ये तुम्हाला ब्रेसलेट, एखादी अंगठी किंवा कानातले सुंदर प्रकार घालता येतील. तुम्हाला या ज्वेलरीचा प्रकार कधीही घालता येईल.
लग्नानंतर घालायची असेल ‘जोडवी’, तर जाणून घ्या ट्रेंडिंग डिझाईन्स
अशी घ्या या दागिन्यांची काळजी
- जर तुम्ही अशाप्रकारतील दागिने घेतले असतील तर तुम्ही त्यांची काळजी घेणेही गरजेचे आहे. हे दागिने तुम्ही कापसामध्ये गुंडाळून ठेवा.
- हे दागिने घातल्यानंतर तुम्ही स्प्रे लावू नका. कारण त्यामुळे दागिन्यांचे रंग जाण्याची शक्यता असते.
- जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर तुम्ही दागिने वापरुन झाल्यानंतर हे दागिने पुसून वापरा. हे दागिने ठेवताना तुम्ही ते पुसून ठेवा त्यामुळे ते खराब होणार नाही.
- सिलव्हर प्लेटेड दागिने हे कायम तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. एअर टाईड डब्यात ठेवल्यामुळे हे दागिने चांगले राहतात.
आता अशा प्रकारातील दागिने नक्की खरेदी करा आणि खास समारंभांना वापरा.