ऑर्गेंझा साडीचा ट्रेंड, कशी करावी कॅरी

ऑर्गेंझा साडीचा ट्रेंड, कशी करावी कॅरी

साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही. प्रत्येक दिवशी साडीचा नवा नवा ट्रेंड येत असतो. असाच सध्या साडीचा नवा ट्रेंड आहे तो म्हणजे ऑर्गेंझा साडी (Organza Saree). सध्या बॉलीवूडमधील सेलिब्रिटीजमध्ये ही फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे. तसं तर ऑर्गेंझा खूप काळापासून  वापरात आहे. पण आजकाल ऑर्गेंझा साडीचा ट्रेंड खूपच जास्त दिसून येत आहे. अनेक कार्यक्रमांना सेलिब्रिटीज ऑर्गेंझा साडीला प्राधान्य देतात. अनेक मराठी सेलिब्रिटीजही या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतात. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर ऑर्गेंझा साडीमधील फोटो शेअर केले आहेत. तुम्हालाही ही साडी आवडत असेल आणि तुम्हाला आपल्या वॉर्डरोबमध्ये या साडीचा समावेश करून घ्यायला आहे. पण याची नक्की कशी स्टाईल करायची याची माहिती घेणेही गरजेचे आहे. ऑर्गेंंझा साडी नक्की कशी कॅरी करायची यासाठी काही फॅशन टिप्स (Fashion Tips) आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

अमृता खानविलकरचा लुक करा रिक्रिएट

अमृता खानविलकरचा हा ऑर्गेंझा साडीमधील लुक तुम्ही नक्कीच रिक्रिएट करू शकता. अत्यंत सुंदर अशी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे मिश्रण असणारी ही साडी अमृताचे सौंदर्य अधिक खुलवत आहेत. तुम्हाला जर स्वतःला स्टायलिश अंदाजात पाहायचं असेल तर तुम्हीही अशी साडी नक्कीच कॅरी करू शकता. यासह तुम्ही हवं तर डीप व्ही नेक ब्लाऊज (deep v neck blouse) अथवा स्लिव्हलेस ब्लाऊज (Sleevless blouse) घातला तर ही साडी अधिक उठावदार दिसेल. तुम्ही अशी ऑर्गेंझा साडी नेसून अधिक स्टायलिश दिसू शकता. 

ऑर्गेझा साडीसह कोणते दागिने घालावेत

ऑर्गेंझा साडी ही अत्यंत हलकी असते. त्यामुळे तुम्ही ही साडी नेसल्यानंतर खूप दागिने घालायची गरज भासत नाही. तुम्ही या साडीवर जर मोठे कानातले (earrings) घालणार असाल तर व्ही शेप ब्लाऊज घाला आणि गळ्यात अजिबात कोणताही दागिना घालू नका. तुम्हाला या साडीवर गोल्डन रंगाचे कानातले शोभून दिसतील. तुमच्या साडीच्या रंगाप्रमाणे तुम्ही कानातल्याची निवड करा. जर तुम्ही चोकर घातला तर मग कानातले घालण्याची गरज नाही. तुम्हाला कानातले हवेच असतील तर मग चोकर घातल्यास, तुम्ही कानात अगदी लहानसे टॉप्स घाला. त्यामुळे या साडीची शोभा अधिक वाढेल. 

फॅशन टिप - या गोष्टीची काळजी घ्या की, ऑर्गेंझा साडीसह तुम्ही अशा दागिन्यांची निवड करा ज्यामुळे तुमचे दागिने साडीमध्ये अडकणार नाहीत आणि दिसायलाही अत्यंत सुंदर दिसेल.

अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

ऑर्गेंझा साडीवर कसा कराल मेकअप

Make Up

Manish Malhotra Eye Advanced Makeup Kit by MyGlamm

INR 1,999 AT MyGlamm

ऑर्गेंझा साडी अत्यंत सुंदर आणि हलकी असते. तसंच यावर डिझाईन वर्कही जास्त नसतं. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला जाताना जर तुम्ही ही साडी नेसणार असाल तर तुम्ही मिनिमल मेकअपचा वापर करा. तुम्हाला एलिगंट लुक हवा असेल तर अति गडद मेकअप करू नका. तुम्हाला यासाठी आमच्या MyGlamm उत्पादनांचाही वापर करता येईल. काजळ, मस्कारा, लिपस्टिक याचा वापर करून तुम्ही हा मेकअप करू शकता. नैसर्गिक सुंदरता दाखविण्यासाठी केवळ मिनिमल मेकअप तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल. 

फॅशन टीप - ऑर्गेंझा साडीवर लाऊड अर्थात गडद मेकअप करू नका. पण तुम्ही या साडीवर गडद लिपस्टिकचा वापर करू शकता. पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही न्यूड लिपस्टिकचाही वापर करू शकता. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार - कशी नेसावी साडी

साडी करा पर्सनलाईज्ड

तुम्हाला ऑर्गेंझा साडी पर्सनलाईज्डदेखील करता येऊ शकते. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमचं पेटनेम अथवा तुमचं नाव तुमच्या साडीवर कोरून घेऊ शकता. तुम्हाला जर तशी आवडत असेल तर या साडीच्या पदरावर अथवा पदराच्या समोर तुम्ही तुमचं नाव लिहून घेऊ शकता. यामुळे साडीला वेगळा उठाव येतो. 

फॅशन टिप - तुम्हाला नाव नको असेल तर तुमची एखादी विशिष्ट तारीख अथवा एखादा तुम्हाला आावडणारा कोटही तुम्ही छापून घेऊ शकता. यामुळे साडीला वेगळा लुक येतो. 

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक