ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

गरमी आणि पावसाळ्याच्या दिवसात चेहऱ्याला घाम येणे अथवा चेहरा चिकट होणे ही समस्या अत्यंत कॉमन आहे. पण घाम येतो त्याचबरोबर त्याच्यावर माती साचणे आणि धूळ जमा होणे हेदेखील साहजिक आहे. यामुळे चेहरा अधिक खराब होऊ लागतो. कारण घामाला ही माती चिकटून राहते आणि चेहऱ्यावर त्याचा अधिक वाईट परिणाम होताना दिसून येतो. प्रत्येक ऋतुमध्ये ही समस्या दिसून येतेच. आपण आपल्या परीने वेगवेगळे प्रयत्न त्वचा चांगली राखण्यासाठी करत असतोच. पण तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी एक सोपा उपाय नक्कीच करू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या, ब्लॅकहेड्स आणि अन्य समस्या वाढू लागतात. त्यामुळे आपल्या बेड टाईम रूटिनमध्ये काकडीचा वापर तुम्ही नक्की करून घ्या.  काकडी (Cucumber for skin) ही आपल्या त्वचेसाठी वरदान आहे असं अनेक तज्ज्ञांनीही सांगितले आहे. याचा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी वापर केल्यास, तुमची त्वचा उत्तम राखण्यास मदत मिळते. याचा नक्की कसा वापर करायचा ते आपण पाहू. 

काकडीच्या रसाचे फेशियल टोनर (Facial toner of cucumber juice)

काकडीच्या रसाचे फेशियल टोनर (Facial toner of cucumber juice)

Shutterstock

रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण बाजारातील टोनरचा यासाठी वापर करतो. पण तुम्ही घरच्या घरी उत्तम असणारा टोनर अर्थात काकडीच्या रसाचा वापर करून पाहा. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 1 कप काकडीचा रस 
  • 1 कप ग्रीन टी 
  • 1 मोठा चमचा लिंबाचा रस 

वापरण्याची पद्धत 

  • सर्वात पहिल्यांदा काकडीचा रस काढून टाका. त्यासाठी तुम्ही काकडीची सालं काढा आणि मग कापून मिक्सरमधून वाटून घ्या आणि मग त्याचा रस गाळून घ्या 
  • आता एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात ग्रीन टी घाला. 1 उकळी आली की बंद करा आणि मग हे थंड करा. थंड झाल्यावर ग्रीन टी मध्ये तुम्ही काकडीचा रस मिक्स करून घ्या 
  • या मिश्रणात तुम्ही लिंबाचा रस मिक्स करा. तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी यामध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिक्स करा 
  • आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि रात्री झोपण्यापूर्वी टोनर म्हणून तुम्ही याचा चेहऱ्यावर उपयोग करा 

होणारा फायदा 

या फेशियल टोनरच्या वापराने तुमचा चेहरा कायम तजेलदार राहतो आणि चेहऱ्यावरील धूळ आणि माती निघण्यास मदत मिळते. तसंच हे केवळ रात्रीच नाही तर तुम्ही दिवसाच्या स्किन केअर रूटिनमध्येही वापरू शकता. चेहऱ्यावर सुरकुत्या न येण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

काकडीचा फेसपॅक (Cucumber Facepack)

काकडीचा फेसपॅक (Cucumber Facepack)

Freepik

अनेक फेसपॅकमध्ये काकडीचा वापर करण्यात येतो. तुम्ही काकडीचा फेसपॅक घरच्या घरी करूनही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

साहित्य

ADVERTISEMENT
  • 2 मोठे चमचे काकडीची पेस्ट 
  • 1 मोठा चमचा मुलतानी माती 
  • 1 लहान चमचा मिल्क क्रिम (तुमची त्वचा कोरडी असल्यास)

वापरण्याची पद्धत 

  • काकडीची साले काढून मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या
  • आता एका बाऊलमध्ये मुलतानी माती आणि काकडीची पेस्ट घ्या आणि मिक्स करा
  • तुमची त्वचा कोरडी असेल तर 1 चमचा दुधाची मलई अर्थात मिल्क क्रिम यामध्ये मिक्स करा. अन्यथा जी पेस्ट बनवली आहे ती तुम्ही वापरा 
  • ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा आणि साधारण 20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा 

होणारा फायदा 

हा फेसपॅक तुमच्या स्किन पोर्सच्या आकाराला कमी करतो आणि त्वचेमधील कसावा अर्थात त्वचा जर सैलसर झाली असेल तर त्यासाठी याचा उपयोग होतो. 

काकडीपासून तयार झालेले नाईट क्रिम

काकडीपासून तयार झालेले नाईट क्रिम

ADVERTISEMENT

Freepik

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारातील तयार नाईट क्रिमचा वापर करतो. त्यापेक्षा घरीच तयार केलेले नाईट क्रिम तुम्हाला अधिक फायदा मिळवून देते. 

साहित्य

  • अर्धा कप काकडीचा रस 
  • अर्धा कप कोरफड जेल 
  • 5 थेंब गुलाबपाणी 
  • 5 थेंब नारळाचे तेल 
  • 5 थेंब विटामिन ई तेल
  • 5 थेंब कडिलिंबाचे तेल 

वापरण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • काकडी न सोलता मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस गाळून घ्या 
  • या रसामध्ये कोरफड जेल मिक्स करा 
  • आता त्यात गुलाबपाणी, नारळाचे तेल, विटामिन ई ऑईल, कडिलिंबाचे तेल मिक्स करून व्यवस्थित पेस्ट करून घ्या 
    हे घरगुती नाईट क्रिम तुम्ही झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 

होणारा फायदा 

हे नाईट क्रिम चेहऱ्यावरील काळे डाग, हायपर पिगमेंटेशनची समस्या, फाईन लाईन्स आणि सैलसर त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करते. तसंच हे घरगुती नाईट क्रिम कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही वापरू शकता. 

याचा वापर कसा कराल – 

  • चेहरा स्वच्छ धुवा त्यानंतर चेहऱ्यावर टोनरचा वापर करा 
  • टोनर लावल्यानंतर फेसपॅक लावा 
  • 20 मिनिट्स पर्यंत चेहऱ्यावर तसंच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा 
  • त्यानंतर चेहरा आणि मानेवर नाईट क्रिम लावा आणि हलक्या हाताने मसाज करा 

उन्हाळ्यात 7 पद्धतीने काकडी वाढवते तुमच्या त्वचेचं सौंदर्य!

ADVERTISEMENT

त्वचेसाठी काकडीचे फायदे

त्वचेसाठी काकडीचे फायदे

Shutterstock

  • काकडीमध्ये विटामिन ए आणि सी दोन्ही असतात. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ही त्वचेला मॉईस्चराईज करण्यासह चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचे काम करतात 
  • तुमच्या त्वचेवर टॅनिंग असेल तर त्यावरही काकडी फायदेशीर ठरते. वास्तविक विटामिन सी चा चांगला स्रोत असल्यामुळे याचा चांगला फायदा मिळतो. तसंच यामध्ये स्किन लायटनिंग घटकही असतात
  • तुम्हालाही डार्क सर्कल्स (Dark Circles) ची समस्या असेल अथवा डोळ्यांच्या आजूबाजूला सूज असेल तर तुम्ही काकडीच्या फेस टोनरचा वापर करू शकता. काकडी अँटीइन्फ्लेमेटरी असते. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT