चेहरा है या चाँद खिलाँ है…. चंद्रासारखा नितळ, तेजस्वी आणि चमचमता चेहरा सगळ्यांनाच हवी असतो. त्यामध्ये स्त्री- पुरुष असा भेद अजिबात करुन चालणार नाही. कारण सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे आहे. आता फेशियलच घ्या ना त्वचेला रिलॅक्स करण्यासाठी फेशियल केले जाते. फेशिअल करण्याची ज्यांना सवय आहे त्यांना त्याबद्दल फार काही नाविण्य वाटत नाही. पण जे नव्यानेच फेशियल करण्याचा विचार करतात त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. घरी फेशिअल केले तर चालेल का?, प्रोफेशनल फेशिअलची गरज असते का? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर तुमच्या सगळ्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’
प्रोफेशनल फेशिअल कशाला करावे?
फेशिअल हे मुख्यत्वे त्वचा रिलॅक्स करण्याचे काम करत असते. ज्यावेळी तुम्ही बाहेर म्हणजेच एखाद्या पार्लरमध्ये किंवा सलॉनमध्ये फेशिअल करता अशावेळी तुम्हाला आराम मिळतो. फेशिअल करणाऱ्या व्यक्तिंनी त्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेतल्यामुळे त्याने फॉलो केलेल्या स्टेप्स या तुमचा त्वचा बघूनच फॉलो केलेल्या असतात. अगदी क्लिन्झिंगपासून ते मसाजपर्यंत सगळ्या स्टेप्स या उत्तम फॉलो केल्यामुळे तुम्हाला चांगला ग्लो मिळण्यास मदत मिळते.
एकदा फेशिअल केल्यानंतर सतत फेशिअल करावे लागते का?
फेशिअल हेे तुमची त्वचा रिलॅक्स करण्याचे काम करत असते. तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल अशावेळी तुम्ही फेशिअल केले तरी चालू शकते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा मेंटेन्स ठेवायचा असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा फेशिअल करण्यास काहीच हरकत नाही आणि जर तुम्हाला फेशिअल करणे जमणारच नसेल तरी देखील चालू शकते. फेशिअल एकदा केल्यानंतर ते सतत किंवा नियमित करायला हवे असा कोणताही नियम नाही.
फेशिअल केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का?
फेशिअलच्या पद्धती आता चांगल्याच अॅडव्हान्स झाल्या आहेत. आता खूप जण पिंपल्स फोडून किंवा दाबून काढण्याचा प्रयत्न करत नाही. उलट आहे तो पिंपल्स शक्य असेल तर क्लिन करुन त्वचा स्वच्छ करण्याचे काम केले जाते. पण तरीही काही जणांना फेशिअल किटमधील काही क्रिम्सचा त्रास होतो. ज्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पण जर तुम्ही एक्सपर्टना योग्य माहिती दिली तर ते तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेऊ शकतात.
हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)
घरी फेशिअल केले तर चालते का?
खूप जण घरी फेशिअल करण्यास प्राधान्य देतात. एखाद्या महिन्यात फक्त वरचेवर त्वचेची काळजी घेण्यासाठी फेशिअल किट घर आणून फेशिअल केले तर चालू शकेल. पण घरी फेशिअल करताना त्वचा रिलॅक्स होत नाही. सगळ्या स्टेप्स फॉलो करताना दमछाक होते. कधी कधी एखादी स्टेप्स आपल्याकडून जास्त होण्याची शक्यता असते. उदा. स्क्रब हे जास्त वेळासाठी करणे चांगले नाही. कारण त्यामुळे त्वचा ही अधिक नाजूक होण्याची शक्यता असते. जास्त वेळासाठी स्क्रब केल्यामुळे त्वचेवर लालिमा येते. त्याचा परिणाम त्वचा कोरडी होते.या शिवाय चेहऱ्याला वाफ घेण्याची गरज आहे की नाही, ती किती वेळासाठी घ्यावी? याची माहिती तुम्हाला असायला हवी.नाही तर त्याचे परिणाम होऊ शकतात.
घरी फेशिअल किती दिवसांनी केले तर चालेल ?
जर तुम्ही घरी फेशिअल किट आणला असेल तर तुम्ही किमान 15 दिवसांचे अंतर तरी ठेवावे. जास्ती वेळा फेशिअल करण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही फेशिअल गरज असल्यास करावे. तुम्ही आणलेले किट संपवण्याची घाई मुळीच करु नका. हल्ली चांगल्या दर्जाचे किट सहा महिन्यापेक्षा अधिक काळ टिकते.
फेशिअलला जाण्याआधी तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही तुमच्या शंकांचे नक्की निरसन करु