आपल्या शरीरावर ऋतूनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांचा नक्कीच परिणाम होत असतो. पावसाळा म्हणजे वर्षाऋतू. हा ऋतु श्रावण आणि भाद्रपद या मराठी महिन्यांचा असतो. सद्य परिस्थितीत वेगवेगळ्या कारणांमुळे ऋतूकाळसुद्धा मागे पुढे होताना दिसतो. आता नुकताच पावसाळा सुरु झाला आहे वातावरणातील सूर्याची उष्णता कमी होते व पाण्याचा अंश वाढत जातोय. हवेत थंडावा वाढतो तसेच शरीरातील वात वाढतो व पित्त जमा होण्यास सुरूवात होते. तसेच पचनाची शक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कमी व वातावरणातील जंतुसंसर्ग वाढल्याने आजार वाढतात. डॉ. वैशाली सावंत चव्हाण,आयुर्वेदाचार्य, वेदिक्युअर हेल्थकेअर अँड वेलनेस यांनी याबाबत आमच्याशी चर्चा केली आणि आरोग्य टिकविण्यासाठी पावसाळ्यात नक्की आवश्यक आहार काय हवा याबाबत सांगितले.
वजन कमी करण्यासाठी आहारात वापरा या पोळ्या, सोपी रेसिपी
कोणता आहार आहे योग्य?
Shutterstock
- या काळात आजारांपासून वाचण्यासाठी आहार हलका घ्यावा.
- ज्वारी, जव , नाचणी, गहू इ. धान्यांची भाकरी किंवा चपाती तुपाबरोबर घ्यावी. वेलींच्या भाज्या (दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, कोहळा) इ. आहारात समावेश असावा.
- चणा , वाटाणा, हरभरा, पावटा , राजमा, इ . कडधांन्यांचा वापर करू नये. मुग तसेच कमी प्रमाणात मटकी, मसूर, कुळीथ, इ. कडधान्ये शरीरातील वात न वाढविता सहज पचतात.
- फळांपैकी संत्री, मोसंबी, जांभूळ, सफरचंद, आंबा, अशी गोड आंबट रसांची फळे दिवसा खावीत.
- सकाळी कोमट पाणी निंबूबरोबर ग्लासभर घ्यावे. उपाशीपोटी मोठ्याप्रमाणात व थंड पाणी पिऊ नये. दिवसभर उकळवून गार झालेले किंवा कोमटच पाणी प्यावे. तसेच तुळशीपत्र टाकलेले व तुरटी फिरवलेलं पाणी प्यावे.
- सकाळी नाश्ता किंवा जेवण , भूकेच्या जाणिवेनुसार घ्यावे. फलाहार, दलिया, तसेच भाज्यांचे सुप इ. सुंठ, आले किंवा मिरी घालून घ्यावे.
- आहारात गोड, कडू, हलके पदार्थ खावेत.
- मुगाबरोबर किंवा जेष्ठमधाचे चूर्ण घालून दही घ्यावे. ताकात सुंठ, जिरे, चिमूटभर मिरी घालून दुपारी प्यावे. पुदिना, लसूण चटणीचा समावेश असावा.
- रात्रीचे जेवण शक्य तेवढे लवकर घ्यावे. जेवणानंतर हरडे चूर्ण ५ gm व सैंधव यांचे मिश्रण कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
शरीरातील वात नियंत्रित ठेवण्यासाठी औषधी तेलाने मसाज करावा तसेच बस्तीसारख्या पंचकर्माची मदत घ्यावी
आयुर्वेदानुसार फुफुसे म्हणजे वात व कफ दोघांचे ठिकाण
फुफ्फुसांचे आरोग्य टिकवण्यासाठी वात जास्त वाढून या ठिकाणी रुक्षता येऊ नये तसेच कफ जास्त वाढून ओलावा अधिक राहू नये याची काळजी घ्यावी लागते. फुफ्फुसांची ताकद वाढविण्यासाठी सर्वसमावेशक आहाराचा विचार करावा लागतो.
- तेल – बदाम तेल , सुर्यफुल तेल, किंवा शुद्ध गायीचे तूप तसेच फुफ्फुसांचा ओलावा सामान्य राहण्यासाठी सूर्यफुलाच्या बियांची चटणी खावी.
- धान्य – ज्वारी,बाजरी, मका, यांचा आहारातील तुपाबरोबर केलेला समावेश कफ व वातास नियंत्रित ठेऊन फुफ्फुसांचे आरोग्य सुधारेल. आहारात गहू तसेच भाताचा समावेश कमी असावा.
- मांसाहार – पचायला हलका असणारा मांसाहार घ्यावा. अंडी तसेच चिकन चा समावेश आहारात करावा.
- मसाले – आद्रक, लवंग, दालचिनी, मिरी, यांचा आहारातील माफक उपयोग कफाचे नियंत्रण करतोच आणि पचनशक्ती वाढवून रोगप्रतिकारशक्ती वाढवितो.
- उष्णजल – उकळवून थंड झालेले किंवा कोमट पाणी कफाचे नियंत्रण करून फुफ्फुसांना निरोगी ठेवते.
मधाशिवाय इतर गोड पदार्थ नियंत्रणात खावेत. - दूध व दुधाचे पदार्थ – हळद किंवा आद्रक घालून उकळलेले दूध पथ्यकर ठरते. सुंठ घातलेले ताक, गाईचे तूप चिमूटभर मिरी घालून इ. चा समावेश आहारात असावा.
- फळे – डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद, चेरी ए. फळांचा आहारात समावेश असावा. रात्री फलाहार, तसेच दुधाबरोबर फळांचे रस घेऊ नये. सर्वसमावेशक आहार फुफ्फुसांचे आरोग्य टिकवण्यासाठी फायदेशीर होतो.
आयुर्वेदातील आहार-विहार पालन आणि पंचकर्माच्या मदतीने शरीरातील दोषांचे नियंत्रण करून विविध आजारांपासून बचाव होईल आणि अखंड आरोग्य मिळेल.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांना योग्य पोषण मिळण्यासाठी हवा संतुलित आहार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक