मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांचे योग्य संगोपन करणे ही एक फार मोठी जबाबदारी आहे. एक आई आपल्या मुलांचा सांभाळ कोणाच्याही मदतीशिवाय एकटी करु शकते हे आतापर्यंत अनेकवेळा सिद्ध झालंय. अर्थातच, बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वबळावर आपल्या मुलांना फक्त मोठंच केलं नाही, तर त्यांना चांगलं घडवलं देखील आहे. काहीजणी तर आपली मुलं चांगली घडावी म्हणून आजही खूप मेहनत घेत आहेत.आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींच्या खाजगी जीवनाबाबत, त्यांच्या बालसंगोपनाबाबत सांगणार आहोत. या अशा सिंगल मदर्स आहेत ज्या पालकत्वाच्या जबाबदारीमध्ये आदर्श ठरल्या आहेत.
1. सुष्मिता सेन
बॉलीवूड ऍक्ट्रेस आणि माजी मिस यूनिवर्स असलेली सुष्मिता सेन हीने लग्न न करताच अनाथ आश्रमातून दोन मुलींना दत्तक घेतलं, आणि ती त्यांचं चांगलं संगोपन करत आहे,तिच्या मुलींवर तिचं खूप प्रेम आहे. तिच्या इंस्टा पोस्ट वरुन तिचं तिच्या मुलींवर असलेलं प्रेम सतत दिसून येतं.तिच्या मुलींची म्हणजेच रिनी आणि आलिजाची जबाबदारी ती मोठ्या कौशल्याने निभावतेयं. सुष्मिताने रिनीला 2000 साली तर अलिजाला 2010 साली दत्तक घेतलं होतं. तिचं तिच्या मुलींवर तिचं इतकं प्रेम आहे की त्यासाठी तिने स्वतःचं फिल्मी करियरही सोडलं आहे.
वाचा – आईसाठी भावनात्मक कविता (Heart Touching Poem On Mother In Marathi)
2. करिष्मा कपूर
नवऱ्याशी घटस्फोट घेतल्यानंतर करिष्मा कपूर तिच्या दोन्ही मुलांना एकटीच सांभाळतेयं. तिला असं वाटतं मुलांना वाढवण्यासाठी तिला अजून कोणाचीही गरज नाहीये. करिष्माच्या इंस्टाग्रामवरुनच आपल्याला जाणवतंच की ती तिच्या मुलांचा सांभाळ खूप छान पध्दतीने करतेयं.
3. नीना गुप्ता
नीना गुप्ता हिने अविवाहित राहून,सगळ्या समाजाच्या विरोधाला डावलून, तिचा पूर्व प्रेमी आणि खेळाडू विवियन रिचर्ड्स या दोघांनी त्यांच्या मुलीला, मसाबाला जन्म दिला. असं करुन तिने तमाम बॉलीवूडमध्ये स्वतःची एक स्ट्रॉन्ग इमेज बनवली.बॉलिवूड इंडस्ट्री वाले तिचं उदाहरण सगळ्यांना देऊ लागले आहेत. आज नीना गुप्ताची मुलगी, मसाबा गुप्ता फॅशनच्या दुनियेतलं मोठं नाव आहे.
4. कोंकणा सेन
कदाचित खूप कमी जणांना माहित असेल की बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अपर्णा सेन यांची मुलगी आणि ऍक्ट्रेस कोंकणा सेन ही सुध्दा एक सिंगल मदर आहे. कोंकणा सेनने बॉलीवूड ऍक्टर रणवीर शौरीशी लग्न केलं होतं. मात्र गरोदर असतानाच ते दोघं वेगळे झाले. पण असं असलं तरी कोंकणाने आपलं गरोदर असणं, आनंदान साजरं केलं.आता कोंकणाने बॉलीवुडमध्ये काम करण्यापेक्षा सिंगल मदर होऊन तिच्या मुलाला हारून शौरीला वाढवण्याचा मार्ग निवडला आहे.
5. अमृता सिंग
बॉलीवूड अॅक्टर सैफ अली खानशी घटस्फोट घेतल्यानंतर, एकेकाळी प्रसिध्द असलेली अभिनेत्री अमृता सिंगने आपल्या दोन्ही मुलांचा एकटीनेच सांभाळ केलायं.आता तर तिची मुलगी सारा अली खान देखील सिनेक्षेत्रात पदार्पण करतेय.
6. पूजा बेदी
बॉलीवूड आभिनेत्री आणि प्रसिध्द निवेदक, अभिनेता कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी ही सुध्दा एक सिंगल मदर आहे. पूजाने फरहान इब्राहिमशी लग्न केलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांच्या नात्यात फूट पडली. घटस्पोटानंतर पूजाने मुलांची जबाबदारी स्वतः घेतली आणि आता सिंगल मदर म्हणून ती तिची जबाबदारी लीलया सांभाळतेयं. ती एकटीच तिच्या मुलाचा आणि मुलीचं संगोपन करतेय.
7. सारिका
प्रसिध्द बॉलीवूड अॅक्ट्रेस सारिकाने 1985 साली अभिनेता कमल हासनशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा कालांतराने घटस्फोट झाला व त्यानंतर तिने एकटीनेच आपल्या दोन सुंदर मुलींना लहानाचं मोठं केलं. आता तिच्या दोन्ही मुलींनी, म्हणजेच श्रुती हासन आणि अक्षरा हासन यांनी बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली आहे. एका मुलाखतीमध्ये सारिकाने सांगितलं होतं की, तिच्यासाठी सिंगल मदर असणं खूप कठीण होतं. पण ज्या पध्दतीने सारिकाने आपल्या मुलींना मोठं केलं, त्यावरुन तिचं कौतुकच करायला हवं.
8. पूनम ढिल्लो
एकेकाळची अत्यंत प्रसिध्द आणि खूप सुंदर अशी अभिनेत्री पूनम ढिल्लो ही सुध्दा सिंगल मदर आहे. तिने बॉलीवूडमधल्या अशोक ठाकरियाशी 1988 मध्ये लग्न केलं होतं आणि 1997 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पूनम ढिल्लोने सक्षमपणे आपल्या दोन्ही मुलांचं, म्हणजेच मुलगी पालोमा आणि मुलगा अनमोल यांचं संगोपन केलं
9. माहिरा खान
माहिरा खान खरं तर पाकिस्तानी नटी आहे, पण तिने बॉलीवूडमध्येही काम केलंय. तिने फॉर्मर व्हीजे, अली अस्करी नावाच्या माणसाशी निकाह केला.लग्नानंतर त्या दोघांना एक गोंडस मुलगा झाला त्याच नाव अजलान. माहिराने एकदा सांगितलं होतं की तिचा मुलगाच तिची पहिली आणि शेवटची प्रायॉरिटी आहे आणि म्हणूनच तिने तिच्याजवळील बऱ्याच मोठ्या कामांवर पाणी सोडलं. तिने तिच्या तानुल्यासाठी केलेला हा त्याग दुर्लक्षित करुन कसा चालेल?
10. नीलिमा अजीम
भारतीय टेलीव्हिजन आणि बॉलीवूडमधली उत्तम कलाकार आणि प्रसिध्द बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरची आई, अभिनेता पंकज कपूरची पूर्वाश्रमीची पत्नी नीलिमा अजीम. हिला आजची पिढी फार कमी ओळखत असेल. पंकज कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने स्वकर्तुत्त्वावर शाहिदचा खूप चांगल्या पध्दतीने सांभाळ केला. हो तसं सांगायचं झालं तर तिने राजेश खट्टरशी दुसरं लग्न केलं आणि त्यांच्यापासून तिला दुसरा मुलगा ईशान खट्टर झाला. मात्र शाहीदला तिने कधीच काही कमी पडू दिलं नाही.
11. डिम्पल कपाडीया
बॉलीवूडची प्रसिध्द कलाकार डिंपल कपाडियानं वय लहान असतानाच त्या काळच्या टॉप स्टार राजेश खन्नाशी लग्न(1972) केलं होतं. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं. ती ट्विंकल आणि रिंकीची आई झाली. असं म्हटलं जातं राजेश खन्नानेच तिला चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडाले. पण तरिही डिंपलने त्यावेळी स्पष्ट केलं होतं की तिच्यासाठी मुलींसमोर करियर सेकंडरी असेल. राजेश खन्नाशी फारकत घेतल्यानंतर डिंपलने परत एकदा स्वतःच्या करिअरला सुरुवात केली आणि एकटीनेच मुलींचा सांभाळ केला. डिंपल कपाडियाची मुलगी ट्विंकल खन्ना आता बॉलीवूड स्टार अक्षय कुमारची पत्नी आणि प्रसिध्द इंटीरियर डिझाईनर आहे.