ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बॉलीवूडचे तिन्ही खान 2018 मध्ये ठरले फ्लॉप

बॉलीवूडचे तिन्ही खान 2018 मध्ये ठरले फ्लॉप

बॉलीवूडसाठी हे वर्ष म्हणजे अगदी रोलर कोस्टर होतं. नव्या आणि ताज्या दमाच्या अभिनेत्यांनी आपली चलती या वर्षी सुरु केली तर बॉलीवूडचे तिन्ही खान 2018 मध्ये अगदी फ्लॉप ठरले. आतापर्यंत गेले 25 वर्ष बॉलीवूडवर राज्य केलेल्या आमिर, शाहरूख आणि सलमानची जादू या वर्षी मात्र चालू शकली नाही. तिन्ही खान यावर्षी बॉक्स ऑफिसवर आणि अगदी चाहत्यांच्या मनावरही जादू करू शकले नाहीत हेच खरं आहे. यंदाचं वर्ष हे स्मॉल बजेट असलेल्या चित्रपटांसाठी खास ठरलं असंच म्हणावं लागेल. शिवाय राजकुमार राव, आयुषमान खुराना, विकी कौशल, कार्तिक आर्यन, इशान खट्टर, जान्हवी कपूर, सारा अली खान या नव्या आणि ताज्या दमाच्या अभिनेत्यांनी आपली वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर सोडली आहे. वेगळे विषय आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर या सर्व नव्या अभिनेत्यांनी चाहत्यांना त्यांची दखल घेणं भाग पडलं आहे. कोणत्या चित्रपटांचा गवगवा झाला मात्र बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत, कोणते चित्रपट फ्लॉप ठरले हे जाणून घेऊया.

झिरो

यावर्षीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आणि शाहरूख, कतरिना आणि अनुष्का ही त्रयी पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार म्हणून प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता होती. मात्र या चित्रपटाने चाहत्यांची खूपच निराशा केली. यावर्षीचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हणून या चित्रपटाचं नाव घेण्यात येत आहे. वेगळा प्रयोग, वेगळा विषय, कलाकार आणि पूर्ण टीमची प्रचंड मेहनत हे सगळं जरी असलं तरीही या सगळ्याची मांडणी अतिशय खराब ठरल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अजिबात चांगला प्रतिसाद मिळाला नाही. झिरो या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर झिरो नाव कोरलं असंच म्हणावं लागेल.

zero
ठग्ज ऑफ हिंदुस्तान

ADVERTISEMENT

आमिर खान आणि अमिताभ बच्चन अशी तगडी स्टारकास्ट आणि स्पेशल इफेक्ट्स असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाई तर केली मात्र, त्याच्या स्टोरीमुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमिर आणि अमिताभ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत होते. त्यामुळे या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तरीही हा चित्रपट तगडे कलाकार असूनही फ्लॉप ठरला. प्रेक्षकांना केवळ अभिनेतेच नाही तर स्टोरीदेखील आकर्षित करते हे प्रेक्षकांनी यातून दाखवून दिलं. या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी ही आमिरने स्वतः स्वीकारली.

thugs of hindostan
रेस ३

दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित होतात आणि बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवतात. मात्र हे वर्ष सलमानसाठीही वाईट ठरलं. रेस ३ ची बरीच चर्चा झाली होती. तगडी स्टारकास्ट आणि बरंच प्रमोशन या चित्रपटाचं करण्यात आलं होतं. मात्र हा चित्रपट यावर्षीचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. यातील संवादांची बरीच चर्चा झाली मात्र, त्याची बरीच टरही उडवण्यात आली होती. या चित्रपटाची बरीच खिल्ली उडवण्यात आली असली तरीही या चित्रपटाने 200 कोटी कमावले हा या चित्रपटाचा वेगळेपणा नक्कीच म्हणावा लागेल. सलमान खानच्या चाहत्यांची संख्या कमी नसल्यामुळे चित्रपट फ्लॉप ठरला असला तरीही त्याने चांगलीच कमाई केली. मात्र यावर्षी ईदला सलमान खानची जादू चालली नाही हेदेखील तितकंच खरं आहे.

race 3
फन्ने खान

ADVERTISEMENT

ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि राजकुमार राव अशी तगडी स्टारकास्ट आणि थोडा वेगळा विषय असं असूनही या चित्रपटाने कमाल दाखवली नाही. ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव ही जोडी अजिबात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली नाही. तसंच अनिल कपूरचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मात्र तरीही फन्ने खान बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अनिल कपूर आणि ऐश्वर्या बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत होते. मात्र त्यांची केमिस्ट्रीदेखील कमाल दाखवू शकली नाही आणि हादेखील यावर्षीच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीमध्ये टॉपवर आला.

fanneykhan %281%29
हेलिकॉप्टर इला

बराच गवगवा झालेला काजोलचा हेलिकॉप्टर इला तर कधी आला आणि कधी गेला हेदेखील कळलं नाही. मुलाच्या महाविद्यालयात प्रवेश घेणारी आई आणि त्याचा होणारा परिणाम असा वेगळा विषय असूनदेखील या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. काजोलला मोठ्या पडद्यावर पाहणं हे नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. मात्र असं असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला. आजच्या पिढीतील आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने जेमतेम 5 कोटीची कमाई केली. सध्या इतके कमी पैसे म्हणजे चित्रपटाने काहीच कमाई केली आहे असं वाटत नाही. चित्रपटगृहांमध्ये अजिबात हा चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही.

helicoptor ila
नमस्ते इंग्लंड

ADVERTISEMENT

बऱ्याच वर्षांनी अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा पुन्हा एकदा नमस्ते इंग्लंडमधून प्रेक्षकांसमोर आले. मात्र त्यांच्यातील केमिस्ट्री अजिबात चित्रपटासाठी चांगली ठरू शकली नाही. नमस्ते लंडनचा सिक्वेल म्हणून हा चित्रपट करण्यात आला होता. कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्या या चित्रपटाने अफलातून कमाल दाखवली होती. त्याचा विषय आणि गाणी दोन्ही प्रसिद्ध झाले होते. मात्र नमस्ते इंग्लंडच्या बाबतीत केवळ गाणी कमाल दाखवू शकली. त्याची स्टोरी प्रेक्षकांना भुरळ पाडू शकली नाही. इशकजादेनंतर पुन्हा एकदा परिणीती आणि अर्जुन नक्की काय कमाल दाखवणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र हा चित्रपटदेखील कधी आला आणि कधी गेला हे कळलंही नाही. केवळ 10 कोटी इतकीच कमाई हा चित्रपट करू शकला.

namaste england

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

26 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT