ADVERTISEMENT
home / मनोरंजन
नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास

नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास

चित्रपटांचा ट्रेंड आता बदलू लागला आहे. रोज रोजच्या लव्हस्टोरीपेक्षा आता काही तरी वेगळं लोकांना चित्रपटाकडून अपेक्षित असते. म्हणूनच आता इतिहासातील पाने उलगडून प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न चित्रपट निर्माते करु लागले आहेत. हिंदी- मराठी दोन्हीकडे इतिहासावर आधारीत चित्रपट तयार केले जात आहेत. २०१८मध्ये ‘पद्मावत’ हा सिनेमा आला. या सिनेमावरुन रणकंदानही माजले पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. त्यामुळे सत्य घटनांवर आधारीत चित्रपट, बायोपिक लोकांना अधिक आवडतात, हे साधारणपणे लक्षात येते. लोकांची हीच आवड लक्षात घेऊन २०१९मध्ये ही ५ चित्रपट इतिहासातील महत्वपूर्ण घटना आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. हे सिनेमे कोणते ते पाहूयात

मणिकर्णिका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला खास ऐतिहासिक टच

मणिकर्णिका

राणी लक्ष्मीबाईंचे योगदान हे देशासाठी अमूल्य असे आहे. मेरी झाशी नही दूंगी असे म्हणत ज्या ज्या राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांशी दोन हात केले त्या राणी लक्ष्मीबाईंची शूरगाथा सांगणारा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी’ सिनेमा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. कंगना रणौत या सिनेमामध्ये झाशीच्या राणीचे काम करत आहे. या रोलसाठी कंगनाने बरीच मेहनत घेतलेली आहे. नुसताच लुक नाही तर तलवार प्रशिक्षण, घोडे प्रशिक्षणदेखील तिने घेतले आहे.

ADVERTISEMENT

manikarnika %282%29

केसरी

खिलाडी अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा देखील २०१९ चे आकर्षण असणार आहे. धर्मा प्रोडक्शनचा हा सिनेमा असून या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे.या सिनेमात त्याच्यासोबत परिनिती चोप्रो देखील आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षयने या सिनेमातील त्याचा रिव्हील केला होता. आता या सिनेमाचे शुटींग संपले असून प्रेक्षकांना आणखी काही काळ या सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे. हा सिनेमा २१ मार्च रोजी रिलीज होणार आहे. सारागढीच्या युद्धावर आधारीत हा सिनेमा आहे. १२ सप्टेंबर १८९७ रोजी हे युद्ध झाले होते. ब्रिटीश  इंडियन आर्मी विरुद्ध अफगाणिस्तान असे हे युद्ध झाले. केवळ २१ शीखांनी १० हजार अफगाणींसोबत युद्ध केले होते. त्यांच्या शूराची गाथा संपूर्ण देशभर पसरली. त्यांचे हे योगदान आठवण करुन देणारा हा सिनेमा आहे.

टोटल धमालचा ट्रेलरही धमाकेदार

ADVERTISEMENT

kesari movie

तानाजी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील शूर योद्धा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत सिनेमादेखील येणार आहे.  अजय देवगण या सिनेमात तानाजी मालुसरेची भूमिका साकारणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात अजय देवगणने या सिनेमातील लुक शेअर करुन केली आहे. ओम राऊत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून हा सिनेमा हा सिनेमा बीग बजेट सिनेमा असणार आहे. या सिनेमातील पहिल्या पोस्टरमधून शूरवीर तानाजीचे दर्शन होत आहे. हा सिनेमा सप्टेंबरला रिलीज होणार असल्याच्या चर्चा आहेत.

गल्ली बॉय चित्रपटातील गाण्याचे ओरिजन व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का? 

ADVERTISEMENT

tanaji

तख्त

धर्मा प्रोडक्शनचा आणखी एक सिनेमा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे ‘तख्त’. हा सिनेमा मोघलांच्या काळातील असून दारा आणि औरंगजेबवर आधारीत ही कथा आहे. दारा म्हणजेच शहाजहानचा सगळ्यात मोठा मुलगा. त्याची दुसरी पत्नी मुमताज महलचा मुलगा. त्याची ही कथा असल्याचे करण जोहरने सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्लाऊद्दीन खिल्जी साकारणारा रणवीर सिंह यात दारा शुखोहची भूमिका साकारत आहे. आता त्याच्या कोणत्या कालखंडातील कथा मांडण्याचा प्रयत्न करण जोहर करणार आहे. हे सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतरच कळू शकेल. या सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे. रणवीर सिंहसोबत करीना कपूर खान, आलिया भट, विकी कौशल,भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूरदेखील असणार आहे. विशेष म्हणजे विकी कौशल या सिनेमात औरंगजेबाच्या भूमिका  साकारत आहे.

takht movie

ADVERTISEMENT

पानिपत

आता नावावरुनच हा चित्रपट पानिपतच्या लढाईवर आधारीत आहे हे तुम्हाला कळले असेलच. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून तिसऱ्या पानिपत युद्धाची ही कहाणी आहे. अर्जुन कपूर, संजय दत्त आणि किर्ती सनॉन दिसणार आहे. हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस म्हणजे ६ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.  अर्जुन कपूर यात सदाशिव भाऊ साकारतोय. तर संजय दत्त अहमद शहा अब्दाली या शिवाय किर्ती सनॉन पार्वती बाई, पद्ममिनी कोल्हापुरे गोपिका बाई, मोहनीश बेहल बालाजी बाजी राव साकारणार आहे.

panipat

(फोटो सौजन्य-Instagram)

ADVERTISEMENT
22 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT