ADVERTISEMENT
home / Mythology
2021 मध्ये व्यवसाय करायचा विचार करत असाल तर असं असेल तुमच्यासाठी हे वर्ष

2021 मध्ये व्यवसाय करायचा विचार करत असाल तर असं असेल तुमच्यासाठी हे वर्ष

2020 या वर्षाचा शेवट होण्यासाठी आता फक्त काहीच कालावधी राहिला आहे. या वर्षात अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले. काहींना याच वर्षाने नव्याने काम करण्याची एक वेगळी दृष्टी दिली. अनेकांनी घरात राहूनच कमाईचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले. पण आता दिवस बदलणार आहेत. नव्या वर्षात अनेकांना त्यांनी पाहिलेली स्वप्न नक्कीच पूर्ण करायची असतील. काहींसाठी पुढील वर्ष लग्न, कुटुंब यासाठी महत्वाचे असेल तर काहींसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून काहीतरी करण्यासाठी हे नवं वर्ष असेल. स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हे नवं वर्ष तुम्हाला कसं असणार आहे ते जाणून घेऊया. त्यानुसार तुम्हाला व्यवसाय करताना नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी हे देखील कळेल.

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

मेष :

मेष राशींच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत समाधानकारक असे हे वर्ष असणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करायचा ठरवला असेल तर लोकांशी मीटिंग करणे व्यवसायाबद्दल चर्चा करणे या सगळ्या गोष्टीला सुरुवात करा. कारण त्यातूनच तुम्हाला आत्मविश्वास आणि संधी मिळत जाणार आहे. सुरुवातीच्या काही काळात तुम्हाला नेमकं काय हवयं आणि कसं साध्य करायचं असे खूप प्रश्न असतील. बऱ्याच आयडिया असल्यामुळे नेमकं काय करावं हे कळणार नाही. पण हा तुमच्या व्यवसाय निवडीचाच एक भाग आहे समजून खचून जाऊ नका. ऑगस्ट 2021 नंतर तुम्हाला तुमच्या कामाची योग्य दिशा सापडेल. व्यवसाय चांगला सुरु होईपर्यंत ऑक्टोबर उजाडेल. त्यावेळी तुमच्यावर कामाचा इतका ताण असेल की, तुमची चीडचीड होईल. पण तुम्ही काम लिलया पार पाडाल आणि तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला चांगला मिळेल.

ADVERTISEMENT

वृषभ :

वर्षाच्या सुरुवातीला वृषभ राशींच्या व्यक्तींमध्ये एक नवचैतन्य दिसेल. व्यवसाय करण्यासाठीची त्यांची तगमग दिसेल. पण घाई करु नका. कारण खूप काही तरी करताना होणारी तुमची घाई पुढे तुम्हालाच त्रासदायक ठरु शकते. या वर्षी तुमचा व्यवसाय तेजीत चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जास्त व्यग्र असाल. यामुळे चीडचीड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला अपेक्षित असलेला पैसा यातून मिळेल. 15 ऑक्टोबरनंतर तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. अनेक नव्या आयडियाज पैसे अधिक कमावण्यासाठी येऊ शकतात. पण सारासार  विचार करुन या संदर्भातील निर्णय घेणे तुम्हाला फारच गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीची सकारात्म आणि नकारात्मक अशी दोन्ही बाजू जाणून घेऊन मगच निर्णय घ्यायचे आहे. व्यवसायाशी निगडीत सगळ्यांनी तुमचे संबंध हे चांगले राहणार आहेत.

जाणून घ्या, काच फुटणे शुभ की अशुभ?

मिथुन :

ADVERTISEMENT

मिथुन राशीच्या व्यक्ती ज्या व्यवसाय करु शकतात त्यांच्यासाठी हे वर्ष फारच चांगले असणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे यश तुमच्या पायाशी लोळण घालणार आहे. पण जराशा आनंदवार्तेमुळे हुरळून जाऊ नका. कारण पैशांच्या बाबतीत तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणताही व्यवहार करताना तो कसाही करु नका. समोरच्याला ती गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगा. त्यानंतरच ती डिल करा. काळ्या पैशांच्या बाबतीत फारच काळजीपूर्वक राहा. असे व्यवहार करताना फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरु केलेला व्यवसाय धुळीस मिळेल. बडी आसमी बनताना या गोष्टींकडे लक्ष देत हाव कमी करा.  जर तुम्ही या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर तुम्हाला व्यवसायात उत्तम संधी मिळणार आहे. जर तुम्हाला योग्य मेंटर मिळाला तर व्यवसाय फुलण्यास अधिक मदत मिळेल. 

कर्क:

Instagram

कर्क राशीच्या व्यक्तींनी जर बिझनेस करण्याचा विचार केला असेल तर तो विचार सध्या थांबवा. कारण  असलेल्या नोकरीसोबत जर तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर तुमची त्रेधातिरपिड उडण्याची शक्यता आहे. एकाचवेळी ऑफिस आणि बिझनेस असे काम करताना तुम्हाला कामाचा प्रचंड ताण येईल. कधी कधी दोन्ही काम तुमच्याकडून नक्कीच पूर्ण होईल पण त्यामध्येही शाश्वती आणि आरोग्य हे दावणीला लागेल. व्यवसायाचे मनसुबे आखून तुम्ही पैशांची बचत केली असेल तर त्याचाही फारसा उपयोग तुम्हाला होईल असे दिसत नाही. नव्या उद्योगाच्या फंद्यात तुम्ही यंदाच्या वर्षी पडू नका असेच तुमचे ग्रहमान सांगते. 

ADVERTISEMENT

सिंह :

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी व्यवसाय करताना 2021मध्ये बऱ्याच अंशी ओढाताण होणार आहे. तुमच्याकडे बिझनेससंदर्भात अनेक आयडियाज नक्की असतील. पण ते इतरांना समजावून सांगताना जर तुम्ही खूप आरडाओरड करत असाल तर त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडतील. जे तुमच्या व्यवसायासाठी फारच हानिकारक ठरेल. पहिले 6 महिने हे जरी तुम्हाला उत्साहाचे वाटले तरी जुलैनंतर एक वेगळीच मरगळ येण्याची शक्यता आहे. पण असे जरी झाले तरी अजिबात खचून जाऊ नका. तितक्यात निगोतीने काम करा.  मनापासून हातात आलेली सगळी काम पूर्ण करा. वर्षाच्या शेवटी तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. पण तो पर्यंत खचून जाऊ नका. 

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

कन्या :

ADVERTISEMENT

Instagram

कन्या राशीच्या व्यक्तींना बिझनेसमध्ये उत्तम संधी मिळणारे हे वर्ष आहे. तुमच्या अनेक कल्पना सत्यात उतरवता येणार आहे. पण यातून होणारी कमाई ही तुम्हाला समाधान देईलच असे नाही.  तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर पळता पळता तुमची दमछाक होईल. कामांचे तास वाढतील. हा त्रासही तुम्ही सहन कराल. तुमच्या अनुभवांचा तुम्हाला या वर्षात फारच फायदा होणार आहे. व्यवसायासाठी लागणारे सगळे कसब तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही माणसं जोडून ठेवाल. वर्षाच्या मध्यानंतर तुमची काम सुरळीत होतील. फक्त सगळ्या कामांमध्ये तुम्ही जातीने लक्ष देणे हे फारच गरजेचे आहे.

तूळ:

तूळ राशीच्या व्यक्ती या हिशोबात फार पक्क्या असतात. व्यवसाय करण्याचे कसब त्यांच्या अंगी जात्याचं असते. 2021मध्ये याच गुणाचा त्यांना अधिक फायदा होणार आहे. व्यवसायात त्यांना हमखास यश मिळणार आहे. पण हे यश एका रात्रीत मिळणार नाही. तर त्यासाठी त्यांना तशी मेहनतही घ्यावी लागणार आहे. मेहनतीनंतरच अपेक्षित असलेले यश मिळणार आहे. एखादा नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. घरबसल्या डोकं लावून आणि इंटरनेटवरुन संपर्क साधून तुम्हाला हा नवा व्यवसाय करता येणार आहे. करिअरच्या अनेक संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. पण तुम्ही कुठे काम नीट करु शकता. हा विचार करुन व्यवसायाची संधी निवडायची आहे. 

ADVERTISEMENT

वृश्चिक:

करिअरच्या दृष्टिकोनातून वृश्चिक राशीसाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. जर तुम्ही नवा व्यवसाय करायचा विचार केला असेल तर व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. त्यामुळे व्यवसाय या काळात सुरु करण्यास काहीच हरकत नाही. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी एखादा उत्तम पार्टनर तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरु होईल. पण व्यवसाय सुरु झाल्यानंतर व्यवहार स्पष्ट ठेवा.  तुम्ही काय करणार आहात? तुमची भूमिका काय ती पार्टनरला स्पष्ट करा. व्यवसायात पैसे गुंतवताना सतर्कता बाळगा.फसवणूक होणार नाही यासाठी आधीच चौकस राहा. या सगळ्यातून तरुन गेल्यानंतर तुम्हाला व्यवसायात हमखास यश मिळणार आहे. 

धनु:

व्यवसाय करु इच्छिणाऱ्या धनु राशींच्या व्यक्तींना सगळे काही सहज मिळणार नाही. त्यांना व्यवसायात बऱ्याच खचत्या खाव्या लागणार आहेत. व्यवसाय उभारेपर्यंत 2021 चे अर्धे वर्ष जाणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ हा जरुर लागणार आहे. तुमच्या व्यवसायासाठी सुरुवात करताना तुम्हाला एक्सपर्टची मदत मिळेल. तो तुम्हाला उत्तम पद्धतीने गाईडही करेल. पण सगळ्या गोष्टी फुकट येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागतो. त्यामुळे तुमचे गणित कोलमडेल. पण त्यातूनही तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि व्यवयास चालना मिळेल. पटकन फायद्याची अपेक्षा करु नका. थोडी मेहनत लागणार आहे. 

ADVERTISEMENT

मकर :

व्यवसाय असणाऱ्यांसाठी आणि व्यवसाय नव्याने करु इच्छिणाऱ्यांसाठी हे वर्ष फारच लाभदायक असणार आहे.  तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला ओळख मिळण्याची शक्यता आहे.  नव्याने व्यवसाय करणाऱ्यांचा व्यवसाय हा अगदी सर्वसाधारण असला. म्हणजे टाकाऊतून तयार झालेला असला तरी देखील त्याला परदेशातून मागणी मिळण्याची शक्यता आहे.  त्यामुळे परदेशातही तुमचा व्यवसाय पोहोचू शकतो. एखादी शाखा परदेशात प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. 2021 हे वर्ष तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही जे कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.  फक्त निवडीवर लक्ष द्या योग्य गोष्टीची निवड आणि त्याची दूरदृष्टी ठेवा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. 

कुंभ:

कुंंभ राशीच्या व्यक्ती या मेहनती असतात. त्यामुळे त्यांना बिझने करायला काहीच हरकत नाही. यंदाचे वर्ष तुम्हाला ही संधी नक्कीच उपलब्ध करुन देणार आहे. बिझनेसची सुरुवात करताना तुम्ही पार्टनरला घेऊन करत असाल तर तो त्याचे काम योग्यपद्धतीने करत आहे की नाही ते देखील पाहा. व्यवसायात तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष द्या आणि नेटाने काम करा. तुम्हाला परदेशातून ही काही करिअरच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याचाही विचार करा. पण सुरु केलेल्या व्यवसायाला फुलण्यासाठी काही काळ द्या. लोकांनी बोलताना जपून आणि मन दुखावणार नाही असे बोला. अधिकाधिक लोकं तुमच्याशी जोडली जातील. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

ADVERTISEMENT

मीन:

व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टिकोनातून मीन राशीसाठी हे वर्ष फारच स्पर्धात्मक असणार आहे .अनेक गोष्टी चॅलेंज बनून समोर येतील. त्यांना पार करणे तुमच्यासाठी थोडे कठीण असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीचा काही काळ हा तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध करुन देणारा असेल. तुमच्या मनात संभ्रमही निर्माण करेल. पण तुम्ही जी गोष्ट निवडाल त्यावर मेहनत खूपच करावी लागेल. कारण हे स्पर्धात्मक युग आहे यात तुमचा निभाव लागणे फारच गरजेचे आहे. कामांमध्ये तुम्ही व्यग्र राहाल. थोडासा ताण जाणवेल. पण तुमच्यासाठी हे वर्ष थोडे मिश्र असणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना सामोरे जायला तयार राहा. 

 

तर व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी असे असणार आहे त्यांचे नवे वर्ष म्हणजेच 2021!

ADVERTISEMENT
29 Dec 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT