ADVERTISEMENT
home / Weight Loss
वजन कमी करण्यासाठी आहारात वापरा या पोळ्या, सोपी रेसिपी

वजन कमी करण्यासाठी आहारात वापरा या पोळ्या, सोपी रेसिपी

 

 

दुपारचं जेवण असो अथवा रात्रीचं जेवण पोळीशिवाय आपलं जेवण पूर्ण होतच नाही. पोळी, भाजी, भात, आमटी हे सगळं तर आपल्याला जेवणात हवंच असतं. त्याशिवाय जेवण पूर्ण झालं असं वाटतंच नाही. सहसा सगळ्याच घरांमध्ये गव्हाची पोळी खाल्ली जाते. पण जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा पोळी अथवा भात बंद करा अशा अनेक सूचना आपल्याला ऐकू येत असतात. खरं तर पोळी खाल्ल्याने वजन वाढत नाही. पण तरीही तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर काही विशिष्ट पोळ्या अथवा रोटीचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करून घेतलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. अशाच काही पोळ्यांच्या रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्ही या पोळ्यांचा तुमच्या जेवणात नक्की समावेश करून घ्या. तुम्हाला वेगळी चवही मिळेल आणि वजन कमी होण्यासाठीही याचा फायदा करून घेता येईल.

सत्तूची पोळी (रोटी)

सत्तूची पोळी (रोटी)

Instagram

ADVERTISEMENT

शरीराला थंडावा देण्यासह वजन घटविण्यासाठी सत्तू अतिशय फायदेशीर ठरतो. तुम्ही जर तुमच्या जेवणात सत्तूच्या  पोळीचा समावेश करून घेतलात तर तुमचं  वजन लवकरच नियंत्रणात येण्यासाठी याचा फायदा होतो. सत्तूमध्ये  फायबर, लोह, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि सोडियमसह अनेक पोषक तत्व असतात. जे  शरीराला अत्यंत पोषक ठरतात आणि फायदेशीर ठरतात. सत्तूची रोटी अर्थात पोळी कशी बनवायची जाणून घेऊया.  

साहित्य 

  • 2 वाटी कणीक 
  • 1 वाटी सत्तूचे पीठ 
  • एक मोठा बारीक चिरलेला काांदा 
  • 1 मोठा चमचा आलं – लसूण बारीक चिरलेली 
  • 1 चमचा कोथिंबीर 
  • 1 लहान चमचा मोहरीचे तेल
  • दोन लहान हिरव्या मिरच्या बारीक चिरून 
  • चवीनुसार मीठ 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले सत्तूचे पीठ घ्या. त्यामध्ये कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, तेल, हिरवी मिरची आणि मीठ मिक्स करून मिश्रण तयार करून घ्या 
  • मग कणीक भिजवून घ्या
  • नंतर कणकेचा गोळा करून लाटून त्यात सत्तूचे मिश्रण भरा आणि मग पोळी लाटा 
  • गोळा नीट करून घ्या. जेणेकरून लाटताना फाटणार नाही
  • तव्यावर शेका. तुम्हाला हवं तर तुम्ही घरातील तूप वापरूनही ही पोळी शेकू शकता आणि मग भाजीसह खा 

गोल आणि मऊ पोळ्या (चपात्या) बनवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

ओट्सची पोळी

ओट्सची पोळी

Instagram

वजन कमी करण्यासाटी ओट्स अत्यंत गुणकारी म्हटले जाते. यामध्ये बिटाग्लुकेन नावाे  फायबर असते, जे भूक पटकन मिटवते आणि बराच काळ पोट भरलेले राहते. त्यामुळे सतत भूक लागत नाही. तसंच ओट्समध्ये चरबी कमी करण्याची क्षमताही असते. तुम्ही घरच्या घरी याची पोळीही करू शकता. 

साहित्य

ADVERTISEMENT
  • 2 कप ओट्स 
  • अर्धा कप गव्हाचे पीठ
  • एक कप गरम पाणी 
  • चवीनुसार मीठ 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले ओट्स मिक्सरमधून वाटून घ्या 
  • त्यानंतर गव्हाचे  पीठ आणि ओट्सचे तयार  झालेले पीठ मिक्स करा 
  • तुम्ही नुसत्या ओट्सची पोळीही करू शकता मात्र ती फुगणार नाही 
  • पाणी गरम करून हे मिक्स्चर भिजवा 
  • नेहमीच्या पोळीप्रमाणे गोळे करून पोळी लाटा आणि भाजा. तुम्हाला हवं तर तुम्ही तुपावरही भाजू शकता. तेलापेक्षा तूप कधीही शरीरासाठी पोषक ठरते

शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण (Benefits Of Stale Roti In Marathi)

सोया पोळी

सोया roti

Instagram

ADVERTISEMENT

सोयाची भाजी आपण ऐकली आहे. पण तुम्ही सोयाची पोळीही करू शकता. सोयामध्ये  विटामिन, प्रोटीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शिमय भरपूर प्रमाणात असते. लो कॅलरी असल्यामुळे वजन घटविण्यासाठी याची मदत मिळते. बाजारामध्ये सोया पीठ मिळतेच.  तुम्ही हे आणून घरच्या  घरी सोया पोळी करू शकता. 

साहित्य 

  • 1 वाटी कणीक 
  • 3 मोठे चमचे सोया पीठ 
  • 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
  • चवीनुसार मीठ 

बनविण्याची पद्धत

  • सर्वात पहिले सोया आणि गव्हाचे पीठ  एका बाऊलमध्ये घ्या आणि मग भिजवा. साधारण  अर्धा तास तसंच ठेवा 
  • त्यानंतर त्यात ऑलिव्ह ऑईल घालून पुन्हा पीठ व्यवस्थित करून घ्या
  • गोळे करून याच्या पोळ्या करा 
  • भाजीबरोबर या पोळ्या खाऊ शकता. तुपासह ही पोळी भाजल्यास, त्याचा स्वाद अप्रतिम येतो

रोज पोळी खात असाल तर जाणून घ्या किती आहे फायदेशीर

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT