जेव्हा कोणत्याही मुलीच्या सौंदर्याबद्दल बोललं जातं तेव्हा तिच्या केसांबद्दल नक्कीच चर्चा होते. जेव्हा तुम्ही तुमच्या केसांची स्टाईल (hairstyle in marathi) करण्यासाठी किंवा केस कापण्यासाठी पार्लर वा सलोनमध्ये जाता तेव्हा केवळ तुम्हाला किती लहान किंवा किती मोठे हवेत इतकंच जाणून घेणं पुरेसं नाही. कोणताही हेअरकट (Haircut) वा स्टाईल (hairstyle) करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा आकारसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, एवढंच नाही तर आपल्या केसांची आत्ताची स्थिती ओळखून केस कापले पाहिजे. असं केल्यामुळे तुम्ही केलेली हेअरस्टाईल तुम्हाला नक्की चांगली दिसेल. तुमचं कपाळ जर थोडं मोठं असेल तर जास्त मोठं वाटावं किंवा तुमचा चेहरा जास्त गोल दिसेल असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? आपल्या बेस्ट फिचर्सना सर्वांसमोर आणणं हेच खरं तर सुंदर दिसण्याचं सिक्रेट आहे. आपण या केसांची हेअरस्टाईल नक्की कशा करायच्या याबाबत जाणून घेऊया. तुम्ही घरच्या या हेअरस्टाईल (kesanchi hairstyle) करून तुमचा लुक अधिक आकर्षक करू शकता.
Table of Contents
- खोपा (Khopa)
- पार्टी हेअरस्टाईल (Party Hairstyle In Marathi)
- ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हेअरस्टाईल (Hairstyle For Working Women)
- फ्रंट पफ (Front Puff)
- वेडिंग हेअरस्टाईल (Wedding Hairstyle In Marathi)
- वेणी (Braids)
- पोनीटेल (Ponytail)
- अंबाडा हेअर स्टाईल (Bun)
- मोकळे केस (Open Hairstyle In Marathi)
- ट्विस्ट बॅक हेअरस्टाईल (Twist Back)
- वेट वेव्ही हेअरस्टाईल (Wet Wavy)
- हाफ ओपन ब्रेडेड बँग्ज (Half Open Braided Bangs)
- डिस्कनेक्शन स्टाईल (Disconnection Style)
- रिव्हर्स व्हेज स्टाईल (Reverse Veg Style)
- डिमॅजिक हेअरस्टाईल (Demagic Hairstyle In Marathi)
- कॉर्पोरेट बन स्टाईल (Corporate Bun Style)
- हाफ बन (Half Bun)
- फ्रेंच रोल (French Roll)
- फ्रेंच नॉट बन (French Knot Bun)
- स्लीक बन (Sleek Bun)
- साईड रोल बन (Side Roll Bun)
- मेस्सी बन (Messy Bun)
- हाय बन (High Bun)
- साईड पोनीटेल (Side Ponytail)
- कर्ली साईड पोनीटेल (Curly Side Ponytail)
- फिशटेल अर्थात खजूरवेणी (Fishtail)
- ट्विस्टिंग रोल (Twisting Roll)
- साईड ट्विस्ट रोल (Side Twist Roll)
- हाफ क्राऊन ब्रेड (Half Crown Braid)
- फ्लोरल ब्रेड (Floral Braid)
- रफल ब्रेड (Ruffle Braid)
खोपा (Khopa)
महाराष्ट्रीयन हेअरस्टाईल म्हटली की सर्वात पहिले डोळ्यासमोर येतो तो खोपा. नऊवारी साडीसाठी खोपा लुक अत्यंत परफेक्ट आहे. पण प्रत्येकाला ही हेअरस्टाईल येतेच असं नाही. महाराष्ट्रीयन नवरीची हेअर स्टाईल म्हणून खोपा नक्की कसा घालायचा ते जाणून घेऊया.
- तुमच्या केसांची जाड रबराने पोनीटेल घाला. त्यानंतर त्याच्या चारही बाजूने केसांना विंचरून वरून काळा बारीक रबर लावा
- नंतर खालच्या केसाचे उरलेले दोन भाग करा आणि एका बाजूचे केस गुंडाळून वरच्या बाजूला वळवून पूर्ण अंबाड्याला गुंडाळा आणि पिन अप करा आणि दुसऱ्या बाजूचे केसही तसेच गुंडाळी करून वर बांधा
- मध्ये जो खोप्यामध्ये खोल खड्डा दिसून येईल त्यात तुम्ही फूल अडकवा
पार्टी हेअरस्टाईल (Party Hairstyle In Marathi)
पार्टीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या हेअर स्टाईल्स या ट्रेंडी आणि जरा स्टायलिशच असायला हव्या. सध्या तर जास्त मुली पार्टीमध्ये जाण्यासाठी पार्लरमधूनच आपल्या केसांची स्टाईल बनवून जातात. मात्र पार्टीसाठी तुम्हाला स्वतःलाच हेअर स्टाईल (hairstyle in marathi) करायची असेल तर तुम्ही पटकन करता येणाऱ्या स्टाईल्स करायला हव्यात. कोणती पार्टी आहे त्यानुसार तुम्ही हेअरस्टाईल निवडावी. पटकन होणारी हेअरस्टाईल जाणून घ्या.
- तुमचे केस लांब असोत वा लहान ही हेअरस्टाईल तुम्ही पार्टीसाठी पटकन करू शकता. तुम्ही केसांचा एका बाजूने भांग पाडा
- दुसऱ्या बाजूच्या केसांच्या तीन लहानशा वेण्या घाला आणि त्या गुंडाळून त्याला एका बाजूला पिन अप करा. त्यावर एक लहानसे आर्टिफिशियल फूल लावा तुमची हेअरस्टाईल तयार
- अथवा तुम्ही केवळ तीन वेगवेगळ्या बटा घेऊन त्या फोल्ड करून पिनअप केल्या तरीही तुम्ही सुंदर दिसू शकता
ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हेअरस्टाईल (Hairstyle For Working Women)
ऑफिस ही अशी जागा आहे, जिथे तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता. तुम्ही ऑफिसध्ये प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे आहे, ते म्हणजे तुमचा लुक परफेक्ट असणं. तुमचा ड्रेस असो वा तुमची हेअरस्टाईल दोन्ही योग्य दिसायला हवं. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईलचा (hairstyle in marathi) प्रयोग करून बघायला हवा, ज्याने तुम्हाला ऑफिसमध्येसुद्धा वेगळं दिसता येईल. तसंच तुम्हालाही थोडं वेगळं वाटेल.
- ऑफिसमध्ये सतत कामात असल्यामुळे केस मोकळे सोडणं सहसा तुम्हाला शक्य होत नाही. पण तुम्ही अर्धे केस नक्कीच मोकळे सोडू शकता. त्यासाठी तुम्ही मधून भांग पाडा आणि डाव्या आणि उजव्या बाजूच्या बटा घेऊन मागच्या बाजूला पिन अप करा
- तुम्हाला पूर्ण केस बांधलेले हवे असतील तर तुम्ही साधासा अंबाडा वरच्या बाजूला घालू शकता अथवा थोडा खाली अंबाडा घालून हलकेसे केस वरच्या बाजूला ओढा. जेणेकरून तुम्ही अधिक सुंदर दिसाल
वाचा – घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल
फ्रंट पफ (Front Puff)
फ्रंट पफ डिझायनर लुकची सध्या चलती आहे. साईड व्हिक्टोरियन कर्ल्स, फ्रंट कर्ल ट्विस्टिंग सध्या ट्रेंडिंगमध्ये असून तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करून बघू शकता. पुढच्या बाजूला कास्केडिंग व्हेव्ह बनवणंदेखील बऱ्याच मुलींना आवडतं. तसंच याबरोबर क्राऊन एरियावर थोडं उंचवटा देऊन तुमच्या जाड चेहऱ्याला थोडा बारीक लुक देता येऊ शकतो. फ्रंट लुक डिझायनिंग करून क्राऊन एरियावर पफ बनवून त्याला उंच बनवू शकतो.
- तुमचे कपाळावरील केस तुम्ही उंचवटा येईल अशा तऱ्हेने सेट करून घ्या. त्यानंतर थोडा केसांचा भाग उंच करून मागे पिन लावा
- त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केस मोकळे सोडा अथवा खालच्या केसांची पोनीटेल, आंबाडा घालू शकता
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रंट पफ काढल्यानंतर मागच्या बाजूच्या केसांची वेणीही घालू शकता. तुमच्या केसांची लांबी किती आहे यावर हे अवलंबून आहे
वेडिंग हेअरस्टाईल (Wedding Hairstyle In Marathi)
प्रत्येक नवरीला गजरा शोभून दिसतो आणि तिच्या सुंदरतेला एक शोभा आणतो. लग्नामध्ये भारतीय नववधू दिसण्यासाठी गजरा हा अतिशय चांगला पर्याय आहे. गजऱ्यासह किंवा गजऱ्यासारख्या दिसणाऱ्या कोणत्याही दागिन्यासह लग्नामध्ये हेअरस्टाईल (hairstyle in marathi) करता येते. तुमचे केस लहान असल्यास, केसांना एक्स्टेंशन लावून वेणी घालून स्टाईल करता येते.
- सध्या ब्रेड ट्रेंड (वेणी) असल्यामुळे मोठ्या केसांसाठी बऱ्याच ब्रेड्स हेअरस्टाईल्स तुम्ही करू शकता.
- त्याबरोबरच साईड बनदेखील फॅशनमध्ये आहे, ज्यामध्ये कर्ल क्रिएट करून त्याला साईड बन म्हणून वापरू शकता अथवा कर्ल्स टियारा लुकमध्ये दाखवता येऊ शकते
- तुम्ही बाजूच्या केसांच्या बटा काढून त्याचे कर्ल करू शकता. हेअर कर्लरच्या सहाय्याने तुम्हाला हे करणे सहज शक्य आहे
वेणी (Braids)
डिझायनर वेणी अर्थात ब्रेडवाले हेअरस्टाईल्स सध्या फॅशनमध्ये ट्रेंडिंग आहेत. मॅसी ब्रेड, फिश टेल, कर्ल क्राऊन ब्रेड्स याला सध्या मागणी आहे.
- आता पारंपरिक वेणी न घालता, लहान केसांना एक्स्टेंशन लावून त्याला पुढच्या बाजूला वेणी घालून डिझाइन करण्याचा ट्रेंड चालू आहे
- याबरोबरच साईड बन अर्थात वेणीची फॅशनसुद्धा सध्या खूप चालू आहे. ज्यामध्ये कर्ल क्रिएट करून त्याला साईड बन म्हणून वापरू शकता अथवा कर्ल्स टियारा लुकमध्ये दाखवता येऊ शकते
- तुम्ही वेणीमध्ये खजूरवेणी, दोन वेण्या अशादेखील स्टाईल करू शकता
पोनीटेल (Ponytail)
पोनीटेल ही एक अतिशय सामान्य हेअरस्टाईल आहे, मात्र त्यामध्ये तुम्ही ट्विस्ट करून अतिशय सुंदर लुक मिळवू शकता. मसलन, ब्रेडेड पोनीटेल, कर्ली साईड पोनीटेल, फ्रिंज लो पोनीटेल, डबल पोनीटेल, हाय पोनीटेल या सर्व हेअरस्टाईल तुम्हाला करता येऊ शकतात.
- ब्रेडेड पोनीटेल बांधताना तुम्हाला अगदी साधी पोनीटेल बनवून त्यानंतर ब्रेड बनवायच असतात
- तर कर्ली साईड पोनीटेल घालणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला एका बाजूला पोनी घालावी लागते
- एकदम साधी पोनीटेल तुम्ही नियमित बाहेर जाताना घालू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुम्ही कोणत्या ठिकाणी जात आहात याबाबत लक्ष ठेवावे लागते. पोनीटेल घालताना तुम्ही फ्रंट फफ काढूनही पोनीटेल घालू शकता
अंबाडा हेअर स्टाईल (Bun)
ही अंबाडा हेअर स्टाईल (ambada hair style) आपल्या भारतीय सभ्यतेमध्ये साधारणतः महिलांकडून बनविण्याची खास पद्धत आहे. अंबाडा आता हेअरस्टाईलमध्ये गणला जातो. साडी नेसल्यावर सहसा अंबाडा (ambada hair style) करून त्यावर गजरा लावण्याची फॅशन आजही तितकीच ट्रेंडी आहे. अगदी सेलिब्रिटींनाही या फॅशनची भुरळ पडलेली आहे. अगदी सहजसोपी आणि पटकन होणारी स्टाईल म्हणजे अंबाडा हेअर स्टाईल (ambada hair style).
- केसांचा पोनीटेल घाला आणि त्यानंतर तुम्ही रबरमध्ये गोलाकार केस वळवून त्याचा अंबाडा घाला. ही सर्वात सोपी पद्धत आहे
- दुसरी पद्धत म्हणजे पोनीटेल घाला आणि पोनीटेलचे दोन भाग करून रबच्या वरच्या बाजूला केस वळवून आतामध्ये ते गोलाकार फिक्स करा. अंबाडा घालून झाला की, केस पिनअप करा. त्यामध्ये गजरा माळा
- तुम्हाला आधुनिक कपड्यांवर बन हेअरस्टाईल करायची असेल तर केसांचा भांग पाडा आणि दोन बाजूला दोन पोनीटेल बांधा. त्यानंतर कानाच्या बाजूला दोन्ही बाजूला तुम्ही अंबाडा घालू शकता
मोकळे केस (Open Hairstyle In Marathi)
हो हे खरं आहे की, मोकळ्या केसांच्याही तुम्ही बऱ्याच तऱ्हेने स्टाईल्स करू शकता, जे आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगत आहोत. अशा बऱ्याच हेअरस्टाईल्स असतात ज्या तुम्ही पिन्स लावून वा पिन्स न लावता अगदी सहजपणाने करू शकता. अशा हेअर स्टाईल्स अगदी सहजरित्या लगेच होतात. मोकळ्या केसांची स्टाईल नक्की काय करणार असा प्रश्नदेखील तुम्हाला पडला असेल. पण तुम्ही सहज जाताजाता स्टाईल करू शकता.
- मोकळे केस विंचरून भांग पाडा आणि दोन्ही बाजूला दोन बटा काढून त्या फोल्ड करून त्याला पिन्स लावा. ही स्टाईल सुंदर दिसते
- भांग एका बाजूला पाडून दुसऱ्या बाजूला केवळ लहानशा तीन वेण्यांनी पिन अप करा
ट्विस्ट बॅक हेअरस्टाईल (Twist Back)
ट्विस्ट बॅक हेअर स्टाईलसुद्धा तुमच्यासाठी परफेक्ट असू शकते.
- त्यासाठी तुम्ही तुमच्या केसांचे दोन भाग पाडायला हवेत. केसांच्या पुढच्या बाजूकडूनच त्यामध्ये ट्विस्ट बनवू शकता आणि चेहऱ्याच्या मागच्या बाजूला घेऊन नंतर टिकटॅक क्लिपने केस फिक्स करावे
- केस दुसऱ्या भागातही तशाच पद्धतीने घ्यावे आणि हा लुक तुम्हाला अतिशय एलिगंट लुक देतो
वेट वेव्ही हेअरस्टाईल (Wet Wavy)
मोकळ्या केसांच्या हेअरस्टाईल करताना तुम्हाला नक्की काय काय करता येते ते तुम्ही जाणून घ्या. यामध्ये वेट वेव्ही हेअरस्टाईलचाही समावेश आहे.
- त्यासाठी तुम्ही पुढच्या केसांमध्ये जेल लावून त्यांना व्यवस्थित सेट करून घ्यावे जेणेकरून पुढचे केस अजिबात चिकटलेले दिसणार नाहीत
- त्यानंतर एका लेंथमध्ये सर्वच केसांना जेल आणि पाणी लावून घ्यावे त्यानंतर कॅप रोलर लावून केसांना काही वेळेसाठी तसेच ठेवून द्यावे
- 1 ते 2 तासांनंतर या रोलर्सना काढून टाकावे. त्यानंतर तुमचे केस व्हेवी दिसतील आणि वेट लुक दिल्यामुळे केसांमध्ये चमक टिकून राहील आणि त्याचा रंगही बऱ्याच वेळापर्यंत टिकून राहिलेला दिसेल
हाफ ओपन ब्रेडेड बँग्ज (Half Open Braided Bangs)
बऱ्याचदा आपल्याला संपूर्ण मोकळे केस नको असतात. केस मोठे असतील तर त्याचा सांभाळ करायलाही त्रास होतो आणि नक्कीक कोणती हेअरस्टाईल करायची हादेखील विचार असतो. तसंच ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही हाफ ओपन ब्रेडेज बँग्ज ही हेअरस्टाईल करू शकता.
- ब्रेडेड बँग्जसह अर्धे मोकळे केस तुमच्या लुकला ग्लॅमरस टच देतात
- पुढच्या काही केसांना घेऊन वेणी घालावी आणि मागच्या बाजूला अर्ध्या केसांना घेऊन क्लच लावावा. या स्टाईलमुळे तुम्हाला एक नवा लुक मिळतो
डिस्कनेक्शन स्टाईल (Disconnection Style)
तुम्ही नाव वाचून नक्कीच थोडं वेगळं वाटलं असेल. पण ही स्टाईल बघून नक्कीच तुम्हाला बरं वाटेल.
- या स्टाईलमध्ये वरून केस लहान ठेवण्यात येतात ज्यामुळे कपाळावर बाऊन्स दिसून येतो आणि खाली केस जास्त ठेवण्यात येतात
- केसांच्या या मिस-मॅचमुळे या स्टाईलला डिस्कनेक्शन स्टाईल म्हटलं जातं
- ही हेअर स्टाईल सर्वांना चांगली दिसते आणि तुमच्या केसांच्या लेंथ व्यवस्थित ठेवून तुम्हाला ट्रेंडी लुक देते
रिव्हर्स व्हेज स्टाईल (Reverse Veg Style)
रिव्हर्स व्हेज स्टाईलमध्ये तुमचे केस सरळ असतील तर तुम्हाला ही स्टाईल अप्रतिम दिसू शकते. गायिका रिहानासारखी ही हेअर स्टाईल आहे ज्यामध्ये मागच्या बाजूला केस लहान तर पुढच्या बाजूला केस मोठे असतात. ही हेअर स्टाईल करून तुम्ही तरूण आणि बारीक दिसू शकता.
- या स्टाईलमध्ये तुम्हाला अगदी कानाच्या खालपर्यंत केस ठेवायचे असतात. पण इतर स्टाईलमधील केसांची लेंथ ही एकारेषेत असते. त्याप्रमाणे या स्टाईलमध्ये होत नाही
- तुमचे केस हे मागच्या बाजूला लहान ठेवायचे असतात तर त्याची लांबी पुढच्या बाजूला जास्त ठेवायची असते. तुमचा चेहरा उभा असेल तर ही स्टाईल तुम्हाला नक्कीच चांगली दिसेल
डिमॅजिक हेअरस्टाईल (Demagic Hairstyle In Marathi)
केस लांब ठेवून अथवा तुमचे केस लांब असतील आणि तुम्हाला जर कोणती हेअर स्टाईल करायची असेल तर तुम्ही 3 डी मॅजिक हेअर कट करू शकता.
- यामध्ये तुमचे वरील केस लहान, तर खाली केस मोठे असतात आणि मधले केस नेहमीच्या लेंथमध्ये असतात. यामध्ये अशा तीन प्रकारचे डायमेंशन दिसून येतात
- या कटमुळे मोठे केस मोठे आणि घनदाट दिसतात. ही स्टाईल तुम्हाला स्मार्ट लुक देते
- केसांचे टिप्स कलर्ड असल्यास, या हेअरकटची सुंदरता अजून उठून दिसते. ३ डी मॅजिक कटची जादू आधुनिक आणि पारंपरिक कपडे दोन्हीवर उठून दिसते
कॉर्पोरेट बन स्टाईल (Corporate Bun Style)
तुम्हाला तुमच्या लुकला क्लासी बनवयाचे असल्यास, बन हेअरस्टाईल हा उत्तम पर्याय आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही आऊटफिटवर कॅरी करू शकता.
- सर्वात पहिले तुम्हाला केसातील गुंता सोडवून त्याला जेल लावून नीट सेट करावे लागतील जेणेकरून ते सहजपणाने चिकटून राहतील
- त्यानंतर एका बाजूला पार्टिशन करून अर्थात भांग पाडून पुढून फिंगर कोंब करावा आणि सर्व केसांना मागे घेऊन अंबाडा बांधावा आणि त्यानंतर बॉब पिनमध्ये फिक्स करावे
- या अंबाड्याला हलकासा फॅशनेबल टच देऊन स्टायलिश एक्सेसरीजने त्याला सजवावे आणि मग कलरफुल पिन लावून सेट करावे
हाफ बन (Half Bun)
Half Bun Hairstyle Steps In Marathi
आजकाल हाफ बन हेअरस्टाईल ट्रेंडिंगमध्ये आहे. पटकन आणि कोणत्याही कपड्यांवर ही स्टाईल आकर्षक दिसते. विशेषतः तुमचे केस लांब असतील आणि तुम्हाला वनपिस घालायचा असेल तर ही हेअरस्टाईल खास तुमच्यासाठीच आहे.
- ही करण्यासाठी तुम्हाला केसांच्या मधला भाग घेऊन मागच्या बाजूला अंबाडा बांधायचा आहे आणि तुमचे बाकीचे केस तसेच मोकळे सोडून ठेवायचे आहेत
- ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला अजिबातच वेळ लागत नाही आणि जास्त अॅक्सेसरीजदेखील लागत नाहीत
फ्रेंच रोल (French Roll)
अनेक लग्नांमध्ये ही हेअरस्टाईल केलेली पाहायला मिळते. पण तुम्ही घरच्या कोणत्याही कार्यक्रमाला तयार होताना अगदी घरातही ही हेअरस्टाईल करून पाहू शकता. ऑफिसमध्ये काही खास मीटिंग असल्यास, ही हेअरस्टाईल करणे पुरेसे आहे.
- यासाठी तुम्हाला तुमच्या केसांना फक्त रॅप करायचे आहे आणि पिनअप करायचे आहे. यासाठी तुम्हाला सर्व केस एका बाजूला घेऊन कंगव्याने विंचरून एकत्र घ्यायचेत
- त्यानंतर खालून बॉबी पिन्स आणि रबर लावायचे आहेत. केसांना रबर लावण्याच्या जागी पकडून ठेवावे आणि मग कंगव्याने विंचरावे. आता ज्या बाजूने तुम्ही केसांना एकत्र केले आहे त्याच्या विरुद्ध बाजूला ट्विस्ट करायचे
- जसं तुम्ही केसांना डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला घेतले असल्यास, केसांना खालून घेत उजव्या बाजूवरून डाव्या बाजूला रोल करत आणावे. खालून रोल करून वरपर्यंत आणावे आणि मग केसांना बॉबी पिन्स लावून रोलमध्ये पिनअप करावे
फ्रेंच नॉट बन (French Knot Bun)
तुम्हाला मानेवर अजिबात मोकळे केस आवडत नसतील तर तुमच्यासाठीच ही हेअरस्टाईल आहे असं समजा. ही हेअरस्टाईल करणे अत्यंत सोपे आहे.
- केसांना डिव्हाईड करण्यासाठी सर्वात पहिले साईड पार्टिशन केले आहे आणि त्याबरोबरच इयर टू इयर पार्टिंग पण केले आहे. आता ज्या बाजूला जास्त केस असतील त्याबाजूचे केस घ्यावेत आणि मग फ्रेंच वेणी घालून बाजूने ते केस पाठी घ्यावेत
- दुसऱ्या बाजूला केसांना फ्रेंचसह मिसळून बाजूला आणावे आणि मग रोल्स बनवून ते एकत्र करावेत. मागे बनवलेली फ्रेंच नॉट चांगली दिसण्यासाठी ड्रेसला मॅचिंंग असणाऱ्या एक्सेसरीज लावाव्यात
- ही हेअर स्टाईल प्रत्येक पार्टीसाठी योग्य आहे कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने बांधल्यामुळे ही हेअरस्टाईल स्टायलिश दिसते
स्लीक बन (Sleek Bun)
वेट लुकसाठी केसांमध्ये हेअर स्टायलिंग उत्पादनाचा वापर करावा लागतो. खरं तर अशा प्रकारच्या लुकसाठी हेअर जेल सर्वात जास्त चांगलं असतं.
- आपल्या लुकला स्लीक स्टाईल देण्यासाठी केस अगदी व्यवस्थित बांधलेले असणं आणि ते सतत चेहऱ्यावर न येणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा केसांना नीट विंचरून घ्यावं आणि जेल लावून सेट करावं जेणेकरून ते सहजपणाने चिकटून राहतील
- त्यानंतर साईड पार्टिशन करून घ्यावं पुढून फिंगर कोंब करावं आणि मग सर्व केस मागे घेऊन त्याला बॉब पिनने फिक्स करावं
- या अंबाड्याला हलकासा फॅशनेबल टच देण्यासाठी त्यावर स्टायलिश एक्सेसरीज लावाव्यात अथवा कलरफुल पिन सेट करावी
साईड रोल बन (Side Roll Bun)
मोठ्या केसांसाठी ही हेअरस्टाईल खूपच चांगली आहे. कधीतरी मोठ्या केसांची नक्की काय फॅशन करावी हा प्रश्न असेल तर ही सोपी पद्धत नक्की करून पाहा.
- यामध्ये प्रत्येक केसाला कर्लिंग रॉडच्या मदतीने कर्ल करून घ्यावे मात्र कर्ल करण्यापूर्वी त्याआधी त्यात जेल लावून घ्यावे जेणेकरून कर्ल टिकून राहतील
- तुमचे केस पातळ (patal kesanchi hairstyle) असल्यास किंवा लहान असल्यास, आर्टिफिशियल वेणीचे रोल्सदेखील तुम्ही केसांना जोडू शकता. आता साईड पार्टिशन करून एका बाजूला केस घेऊन या कर्ल्सना तुम्ही ट्विस्ट करून आतील बाजूने चिकटवत जा
- फंकी लुकसाठी मधून कलरफुल हेअर एक्स्टेंशनचादेखील वापर करू शकता
मेस्सी बन (Messy Bun)
मेसी बनची हेअरस्टाईल पार्टी असो वा कँडल लाईट डिनर, प्रत्येक ठिकाणी चांगलीच दिसते. सर्वात चांगली बाब ही आहे की, तुम्हाला तुमच्या हेअरस्टाईल बनविण्यासाठी पार्लर जाण्याची गरज अजिबात भासत नाही. ही हेअरस्टाईल करणे खूपच सोपं आहे.
- तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या केसांचे कर्ल करण्याची गरज आहे
- त्यानंतर एक एक कर्ली लट घेऊन मागे त्याला पिनअप करावे. सर्व केसांना पिन अप केल्यानंतर एक्सेसरीजने त्यांना शोभा आणावी
- तुमचे केस पातळ (patal kesanchi hairstyle) असतील तर त्याला पहिल्यांदाच डोनट लावून घ्यावा म्हणजे तुम्हाला नंतर त्रास होणार नाही आणि केसही सुंदर दिसतील
हाय बन (High Bun)
कुठेही जाण्याची घाई असेल आणि वेस्टर्न आऊटफिट असेल तर तुम्ही ही सोपी आणि पटकन होणारी हाय बन हेअरस्टाईल करू शकता. केस लांब असो अथवा लहान अशो ही हेअरस्टाईल पटकन करता येते. ही हेअरस्टाईल अगदीच सामान्य आहे मात्र करण्यासाठी खूपच सोपी आणि कंम्फर्टेबल आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही साडीवर अथवा कोणत्याही पारंपरिक अथवा स्टायलिश लुकसाठी वापरू शकता.
- ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या केसांवर एक क्राऊन एरियावर अंबाडा बांधून पिनअप करायचं आहे
साईड पोनीटेल (Side Ponytail)
साध्या लुकसाठी ही हेअरस्टाईल चांगला पर्याय आहे. हो, साईड पोनीटेल तुमच्या साध्या लुकला अतिशय स्टायलिश बनवते. तुमचे केस जर नैसर्गिक कुरळे असतील, तर तुम्हाला एका बाजूला रबरबँड लावण्याची गरज आहे, जर तुमचे केस अगदी सरळ असतील तरत तुम्ही तुमच्या केसांना कलर करून घ्या.
- फ्रिंज लो पोनीटेल बनवण्यासाठी केसांचे दोन भाग पाडा त्यानंतर सर्वात पहिले खाली वेणी बांधा आणि मग इतर केसांच्या मदतीने क्राऊन बनवा
- केसांना फ्रिंज लुक देण्यासाठी बॅक कोंब करणं विसरू नका. अशा तऱ्हेने तुम्ही तुम्ही नवी स्टाईल करून लोकांकडून कौतुक मिळवू शकता
कर्ली साईड पोनीटेल (Curly Side Ponytail)
पोनीटेलच्या सर्व स्टाईल्समध्ये कर्ली साईड पोनीटेल बऱ्याच मुलींना आवडतं. कर्ली साईड पोनीटेल जीन्स टॉप अथवा सलवार – कमीज दोन्हीवर शोभून दिसतं.
- हे करण्यासाठी तुम्हाला तुमचे केस जर कुरळे नसतील तर कुरळे करून घ्यायला हवेत
- कर्ली साईड पोनीटेल बांधण्यासाठी केसांना बाजूला घेऊन वरून त्याला रबरबँड लावावा
- केसांवर हेअरस्प्रे करणं किंवा जेल लावणं विसरू नका कारण ही पोनीटेल स्लीक लुकमध्ये जास्त चांगली दिसते
फिशटेल अर्थात खजूरवेणी (Fishtail)
तुम्हाला तुमचे केस मोकळे ठेवायचे नसतील तर, फिशटेल हेअरस्टाईल तुमच्यासाठी योग्य आहे. ही हेअरस्टाईल दिसायला अगदी स्टायलिश दिसते. ही हेअरस्टाईल कोणत्याही ड्रेसवर उठून दिसते. आधुनिक असो वा भारतीय असो क्लासिक फिशटेल हेअरस्टाईल दिसायला खूपच देखणी असते.
- ही बांधण्यासाठी तुम्हाला तुमच्या केसांचे दोन भाग करावे लागतात. उजव्या बाजूने अतिशय पातळ लेअर घेऊन डाव्या बाजूच्या केसामध्ये मिसळावे. तसंच डाव्या बाजूने पातळ लेअर घेऊन उजव्या बाजूच्या बटेत ते केस मिसळावे. अशाच तऱ्हेने दोन्ही बाजूने करत वेणी घालत राहावी
- असं करता करता तुमची फिशटेल अर्थात खजूरवेणी तयार होईल. या वेणीला पुढच्या बाजूला ठेवून तुमच्या चेहऱ्याची शोभा तुम्ही अधिक वाढवू शकता. तुमचा चेहरा कोणत्याही आकाराचा असला तरीही ही स्टाईल तुम्हाला आकर्षकच दिसते
ट्विस्टिंग रोल (Twisting Roll)
फिशटेल अर्थात खजूर वेणी घालायला तर आम्ही तुम्हाला शिकवलंच आहे. ही हेअरस्टाईलही त्याच प्रकारची आहे. यामध्ये तुम्हा खजूरवेणी प्रमाणेच स्टेप्स करायच्या आहेत.
- तुम्ही तुमच्या केसांना पुढच्या बाजूने पार्टिंग करून मग उजव्या बाजूच्या केसांना ट्विस्ट करून मागे घेऊन या. त्यानंतर तुमच्या डाव्या बाजूच्या केसांनाही अशाच प्रकारे ट्विस्ट करून मागे आणा
- त्यानंतर दोन्ही बाजूंच्या केसांना एक-दुसऱ्यावर ट्विस्ट करून ट्विस्टिंग रोल वेणी घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास, दोन्हीच्या मध्ये दुसऱ्या रंगाचे हेअर एक्स्टेंशनदेखील तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे तुमचा लुक अजून चांगला दिसेल
साईड ट्विस्ट रोल (Side Twist Roll)
ट्विस्टिंग रोल तर आम्ही तुम्हाला सांगितला. एखाद्या लग्नात अथवा साखरपुड्यात तुम्ही नक्कीच ही हेअरस्टाईल करू शकता.
- सर्वात पहिल्यांदा प्रेसिंग करून केसांना स्ट्रेट लुक द्या आणि नंतर पुढच्या केसांना मधून घेऊन पफ बनवा. पफच्या चारही बाजूला दुसऱ्या रंंगाचे हेअर एक्स्टेंशन लावा
- हेअर एक्स्टेंशनला केसांच्या मध्ये घातल्यानंतर एका बाजूला ट्विस्टिंग रोल वेणी घाला. केसांना नंतर साईड पार्टिंग करून नंतर पुढच्या काही केसांना मोकळे ठेवून मानेवर एक मोठी पोनी घाला आणि नंतर सर्व केसांना कर्लिंग रॉडने कुरळे करून घ्या
- पुढच्या सोडलेल्या मोकळ्या केसांना ट्विस्ट करून मागून पिनअप करा. पोनीवर फेद अथवा तुमच्या आवडीचे हेअर एक्सेसरीज लावून घ्या
हाफ क्राऊन ब्रेड (Half Crown Braid)
हीदेखील अत्यंत सोपी हेअरस्टाईल असून तुम्ही घरच्या घरी कोणत्याही कार्यक्रमला करू शकता. अगदी कमी वेळात ही हेअरस्टाईल तुम्हाला करता येते.
- हाफ क्राऊन ब्रेड हेअरस्टाइल बनवण्यासाठी दोन्ही बाजूला वेणी घालून घ्यावी आणि त्यानंतर मागच्या बाजूला दोन्ही वेण्या घेऊन पिनअप करावे
- त्यानंतर तुम्ही पोनी घाला वा अंबाडा बांधा ही हेअरस्टाईल तुम्ही आधुनिक वा पारंपरिक दोन्ही वेशभूषांवर कॅरी करू शकता
फ्लोरल ब्रेड (Floral Braid)
अंबाडा बांधून त्यावर अशा प्रकारे गजरा लावावा की जेणेकरून तुमचा अंबाडा गजऱ्यासह कव्हर होईल. फ्लोरल ब्रेड तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी करू शकता.
- लक्षात ठेवा की, तुम्हाला जर बऱ्याच वेळेपर्यंत तुमचा गजरा तुमच्या अंबाड्यामध्ये टिकून राहायला हवा असेल तर, सर्वात पहिले केस बॉबी पिनसह नीट घट्ट बांधून घ्या
- त्यावर हेअरस्प्रे करावा. एका वेणीवर लावलेले बीट्स स्टाईल फ्लॉवर पुरेसे आहेत. त्यामुळे अॅट्रॅक्टिव्ह लुक येतो
रफल ब्रेड (Ruffle Braid)
साखरपुडा असेल अथवा कोणत्याही पार्टीसाठी ही हेअरस्टाईल तुम्हाला स्टायलिश लुक मिळवून देते. तुम्ही याच्या स्टेप्स व्यवस्थित जाणून घेतल्या तर तुम्हाला ही नक्कीच सहजपणाने करता येईल.
- केसांमध्ये फ्लेक्झिबल होल्ड स्प्रे लावून सर्व केसांना क्राऊन एरियाजवळ घेऊन यावं आणि मग पुढच्या बाजूने प्रेस करून पिनअप करावं. केसांना जेवढी उंची देता येईल द्यावी
- त्यानंतर मागच्या केसांचे दोन भाग करून घ्यावे. आता या दोन्ही भागांना दोन सेक्शनमध्ये करून वेणी बांधावी. एका भागाला दुसऱ्या भागामध्ये मिसळून वेणी पूर्ण करावी
- तशीच दुसरी वेणीदेखील बांधून घ्यावी. त्यावर नीट हेअरस्प्रे करावा जेणेकरून वेणी जास्त वेळ टिकून राहील. वेणीसह क्रिस-क्रॉसिंग स्टाईल गजरादेखील चांगला दिसतो
- तुम्हाला वाटत असेल तर ही स्टाईल तुम्ही तुमच्या ब्रायडल लुकसाठीदेखील वापरू शकता
तुम्हीही या टिप्स वाचून तुमच्या घरच्या कार्यक्रमांसाठी अशा हेअरस्टाईल करून बघू शकता. सोप्या आणि साध्या हेअरस्टाईल तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की शेअर करा.