Advertisement

फॅशन

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jan 3, 2019
फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses In Marathi)

Advertisement

सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. नवीन वर्ष आणि नवे सणही आता लवकरच सुरु होतील. मात्र सध्या लग्नाचा हंगाम धामधुमीत सुरु आहे. घरातल्या आणि रोजच्या जीवनातून नटण्यासवरण्यासाठी एक संधी मिळते. लग्नाच्या तारखेपासून कितीतरी महिने आधी कुटुंब आणि इतर मित्र – मैत्रिणींचे प्लॅनिंग सुरु होते. मुलाकडची लोकं खाण्यापिण्याची आणि पाहुण्यांच्या सरबराई करण्याची जबाबदरी उचलत असतात, तर मुली आपल्या वेडिंग ड्रेसेसमध्ये (Best wedding dresses) गुंतून जातात. नवरा आणि नवरीसह सगळेच जवळचे नातेवाईक आणि भाऊ, बहिण, मित्र मैत्रिणी लग्नाच्या सरबराई आणि तयारीमध्ये गुंतून जातात कारण हेच तर खरे लग्नामधील शान असतात. लग्नाच्या तयारीमध्ये अगदी पूर्ण झोकून देण्यात येतं. लग्नातील प्रत्येक फंक्शनसाठी आपला ड्रेस, मेकअप, फुटवेअर आणि अक्सेसरीज प्लॅन करण्यासाठी इतर लोकांनाही तितकाच वेळ लागतो, जितका वेळ नवरा आणि नवरीला लागतो. हळद असो, संगीत असो वा लग्नाचं रिसेप्शन आम्ही तुमच्यासाठी या प्रत्येक वेगळ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या आयडियाज आहेत, ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. फॅशन डिझाईनर अनिता डोंगरे (Anita Dongre), संयुक्ता नायर (Sanyukta Nair), डब्ल्यू (W) ब्रँड, अक्स क्लोदिंग्स (AKS Clothings) यांच्याकडून लेटेस्ट इंडियन फॅशन (fashion) ट्रेंडनुसार जाणून घेऊया आणि हे कपडे घालून तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही लग्नाच्या कार्यक्रमामध्ये अप्रतिम दिसू शकता.

बहिणीची फॅशन असेल खास

फॅशनमध्ये नवं काहीतरी

रंगांची उधळण

नव्या अंदाजातील साडी

वधूच्या बहिणीसाठी सर्वोत्कृष्ट 40 भारतीय वेडिंग ड्रेस (Best Wedding Dresses)

1. बहिणीची फॅशन असेल खास (Wedding Dress For Bride’s Sister)

ब्राइड व ग्रूम अर्थात वर आणि नववधूच्या जवळच्या नात्यातील लोकांचा प्रयत्न असतो की, प्रत्येक विधीला असे कपडे घालावते, जे ट्रेंडी तर असतीलच पण त्याचबरोबर अतिशय कम्फर्टेबलदेखील असतील.आजकाल लॉंग स्कर्ट आणि ब्लाऊजबरोबर कोटी घालण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये त्याच रंगाचे स्कर्ट आणि ब्लाऊज कॉन्ट्रान्स्ट कलरमध्ये कोटीबरोबर पेअर करण्यात येतात.

aditi-bhatia-festive-outfit

2. फॅशनमध्ये नवं काहीतरी (Latest Wedding Dresses)

लग्न किंवा कोणत्याही दुसऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पारंपरिक आऊटफिट घालायचे नसतील तर तुम्ही इंडो वेस्टर्न कपडे नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ‘ग्लोबल देसी’ चा हा ब्लू ड्रेस उत्कृष्ट पर्याय आहे. केवळ लग्नातच नाही तर सणांनादेखील अशा प्रकराचे कपडे तुम्ही नक्की घालू शकता.

anita-dongre-festive-outfit

Also Read Honeymoon Dresses In Marathi

3. ही गुलाबी हवा (Pink Dress)

जेव्हा इंडियन फॅशन ट्रेंडबद्दल बोललं जातं तेव्हा काही रंग असे असतात जे कधीच जुने होत नाहीत. कायम हे रंग फॅशनमध्ये असतात. कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत. भारतीय पारंपरिक सण आणि रितीरिवाजांमध्ये जितकं महत्त्व लाल रंगाला असतं, तितकंच महत्त्व गुलाबी अर्थात पिंक रंगालाही असतं.  अनित डोंगरेच्या म्हणण्यानुसार हा लाईट पिंक रंगाचा ड्रेस घातल्यास, तुम्ही खूपच छान दिसू शकाल.

anita-dongre-wedding-collection

4. रंगांची उधळण (Colourful Dresses)

आजकाल मोनोक्रोम फॅशन जास्त प्रमाणात दिसते. मात्र त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही रंगांपासून दूर राहाल. तुमच्या कलेक्शनमध्ये मल्टीकलर ड्रेस असायलाच हवा. अनिता हसनंदानीप्रमाणे अशा स्वरूपाचा मल्टीकलर ड्रेस घालून तुम्ही तुमच्या जवळच्या लग्नातील लेडीज संगीत गाजवत अधिक रॉकिंग बनवू शकता.

वाचा – 10 स्टायलिश ब्लाउज बॅक डिझाईन्स

anita-hassanandani-festival-collection

5. ग्लॅमरचा तडका (Glamorous Dresses)

भारतीय संस्कृतीमध्ये सणांसारख्या खास निमित्तावर नेहमीच पारंपरिक कपडे घालण्यावर भर दिला जातो. मात्र काही जणींना साडी अथवा सलवार सूट अशा कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही. तुमच्याबरोबरदेखील अशीच काही परिस्थिती असेल तर लेडीज संगीत, कॉकटेल पार्टीमध्ये दिव्यांका त्रिपाठीप्रमाणे ब्ल्यू शिअर लॉंग ड्रेस तुम्ही घालू शकता.

blue-gown-for-pre-wedding

6. सिंपल सोबरदेखील गरजेचे (Simple Dresses)

तुम्ही लग्नामध्ये अगदीच तडक-भडक कपडे घालण्याला प्राधान्य देत नसाल, तर असा ब्राऊन रंगाचा सेमी शरारा आऊटफिट तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे. हा सिंपल तर आहेच पण दिसायलादेखील अगदी सोबर आहे. लहान कुरतीसह असणाऱ्या या शरारासह दुपट्टा घालायलाच हवं असंही काही नाही.

brown-sharara-wedding-dress

7. नव्या अंदाजातील साडी (Designer Saree)

आजकाल साडी ड्रेपिंग फॅशनमध्येदेखील खूपच बदल झाले आहेत. डिझाईनर साडी नेसण्याची पद्धत ही इतर साध्या साड्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्ही जर तुमच्या पारंपरिक साड्यांबरोबर काही वेगळं ट्राय करण्याचा विचार करत असाल, तर आपल्या नेहमीच्या ब्लाऊजऐवजी क्रॉप टॉप घाला आणि कमरेवर एक बेल्ट बांधू शकता.

designer-saree-blouse

8. पारंपरिक फॅशनचा रंग (Traditional Dress)

भारतीय ड्रेसबरोबर बऱ्याचदा दुपट्टा घ्यावा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे जर लग्नातील घरची आणि बाहेरचीदेखील जबाबदारी असेल, तर असाच ड्रेस निवडा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल. आजकाल कुरत्यांची फॅशनही खूप बदलली आहे. तुम्हीदेखील असिमिट्रीकल कुरते लेगिंग, जेगिंग अथवा जीन्सबरोबर मॅच करून ट्रेंडी लुक देऊ शकता.

cool-wedding-outfit

9. स्टारप्रमाणे दिसू शकता (Look Like A Star)

लग्न आणि सणांच्यावेळी अशी वेळ असतेच जेव्हा तुम्हाला पूर्ण तऱ्हेने पारंपरिकरित्या नटायचं आणि सजायचं असतं. एखाद्या दिवशी तुमचा मूड असेल तर अशा प्रकरची निळी लेहंगा आणि चोळी तुम्ही घालू शकता. लेहंग्यावर असलेल्या नेट (शिअर) मुळे आऊटफिटवरील चमक उठावदार दिसते.

blue-wedding-outfit-dress

10. खास कारागिरी (Special Workmanship)

आपला लुक बॅलन्स्ड ठेवण्यासाठी अपर वा लोअर वेअरमधील कोणती तरी एक बाजू हलकी ठेवायला हवी याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुमचा लेहंगा भरजरी असेल तर तुमचा ब्लाऊज हलका ठेवा आणि कुरता जड असले तर लाँग स्कर्ट हा हलका असायला हवा.

colorful-fashion-wedding-wear

11. साडीचा अनोखा अंदाज (Unique Style Of Saree)

आजकाल प्लेन साडीची फॅशन आहे. तुमचं लग्न झालं नसेल आणि तुम्हाला तुमचा लुक अगदी सिंपल आणि साधा ठेवायचा असेल तर ट्रेंडी ब्लाऊजसह कोणत्याही रंगाची प्लेन साडी नेसू शकता. अशावेळी ब्लाऊजच्या डिझाईनची नीट विचार करा. अशावेळी ब्लाऊजच्या डिझाईनची व्यवस्थित काळजी घ्या. लो कट ब्लाऊज किंवा ऑफ शोल्डर ब्लाऊज अशावेळी जास्त चांगले दिसतात.

ethnic-fashion-for-wedding

12. इंडो- वेस्टर्न साडी (Indo Western Saree)

तुम्हाला जर असं वाटत असेल की, साडी म्हणजे पेटीकोट हवा, त्यावर साडी गुंडाळायची आणि पदर ओढून घ्यायचा. तर हे नक्कीच चुकीचं आहे. वास्तविक फॅशन अप-टू-डे राहण्यासाठी साडी नेसण्याची पद्धतीत अतिशय वेगळा बदल करायला हवा. यामध्ये क्रॉप टॉप आणि पँटबरोबर दुपट्टा असलेल्या साडीचा लुक देण्यात येतो.

designer-saree-wedding-dress-women-fashion

13. फेअरीटेल फिलिंग (Fairytail Filling)

लग्नाच्या कार्यक्रमात थीमप्रमाणे जर तुम्हाला मजा करायची असेल तर फेअरीटेल थीमबाबत तुमचं मत काय आहे? परीसारखं तयार होऊन सर्वांवर जादू करावी हे प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं. तुम्हीसुद्धा जर असा काही विचार करत असाल, तर लाईट ब्ल्यू रंगाच्या या आऊटफिटमध्ये तुमचं स्वप्नं नक्कीच पूर्ण होऊ शकतं.

cool-wedding-dress

14. कॉकटेल ड्रेस (Cocktail Dresses)

बऱ्याच घरांमध्ये लग्नापूर्वी कॉकटेल पार्टीचंदेखील आयोजन करण्यात येत असतं. आता तर हा नवा ट्रेंड झाला आहे. बऱ्याचदा कॉकटेल पार्टीमध्ये येणारे पाहुणे हे काळ्या रंगाचे कपडे घालण्यालाच प्राधान्य देत असतात. मात्र तुम्हाला जर सध्याच्या ट्रेंडनुसार कपडे घालायचे असतील, तर अशा प्रकारचा गोल्डन फुल लेन्थ ड्रेस तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

golden-cocktail-dress

15. अप्रतिम लुक (Awesome Look)

जेनिफर विंगेटच्या एथनिक फॅशनची नेहमीच चर्चा होत असते. तुम्हीदेखील एखाद्या पार्टीमध्ये जाणार असाल, तर सिल्कची कुर्ती आणि शरारा अथवा प्लाजो घालून एखाद्या नेटच्या ओढणीसह घाला. तुमच्या ओढणीवर गोल्डन अथवा सिल्व्हर रंगाचं वर्क असल्यास, कोणत्याही आऊटफिटवर हे नक्की चांगलं दिसेल.

guest-indian-wedding-dress

16. चांद सा रोशन चेहरा (Face Like Moon)

लग्नाचे कार्यक्रम हे साधारण आठवडाभर चालूच असतात. अशावेळी प्रत्येक दिवशी कपडे डिझाईन करणं थोडं कठीण होतं. तुम्ही एका दिवशी जर डार्क ड्रेस घातलात तर दुसऱ्या दिवशी हलक्या रंगाचे कपडे वापरू शकता. लाईट ब्ल्यू रंगाचा हा वेडिंग ड्रेस जवळच्या कोणत्याही नातेवाईकाच्या लग्नात शोभून दिसेल.

grey-lehenga-choli

17. नाचण्याचा उत्साह (Dresses For Ladies Sangeet)

गोष्ट लग्नाची असो वा एखाद्या सणाची…धूमधडाका तर झालाच पाहिजे. लग्नाच्या जबाबदारीबरोबरच मस्ती करण्याची संधी जर तुम्हाला गमवायची नसेल तर अस्मिता सूदचा कोणताही ड्रेस तुम्ही निवडू शकता. अशा कार्यक्रमांसाठी असे ड्रेस अतिशय कम्फर्टेबल आणि स्टायलिश आहेत.

guest-wedding-dress-idea

18. 50 शेड्स ऑफ ग्रे (50 Shades Of Grey)

ग्रे अर्थात करडा हा असा एक रंग आहे, ज्याच्या वेगवेगळ्या शेड्स या वेगळ्यावेगळ्या वेळी तुम्ही घालू शकता. तुम्हालासुद्धा हा रंग आवडत असेल, तर ग्रे रंगाचा क्रॉपटॉप आणि पँट सूट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्याबरोबर थोडा हेव्ही वर्क असणारा दुपट्टा घेतल्यास, तुमच्या लुकला एथनिक स्वरूपही येतं.

guest-wedding-fashion-dress-idea

19. सोनेरी रूप (Golden Look)

कोणत्याही कार्यक्रमाला गोल्डन अर्थात सोनेरी रंगाचे कपडे घालण्याची लोकांना क्रेझ असते. आपली बहीण, मित्र, आत्या, मावशी कोणाच्याही लग्नामध्ये जर लोकांची नजर तुमच्यावर असावी असं तुम्हाला वाटत असेल तर गोल्डन रंगाचा आऊटफिट घालण्याबद्दल तुमचं काय मत आहे? यामध्ये शरारा प्लेन ठेवला असून दुपट्टा आणि कुर्तीवर करण्यात आलेले वर्क सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे.

golden-wedding-dress

20. सूर्याची चमक (Brightness Of Sun)

हळद हा सर्वात मोठा विधी आपल्याकडील लग्नांमध्ये असतो. नवरा आणि नवरीसह बाकी सर्व नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणीदेखील पिवळ्या रंगाचा आऊटफिट घालण्यावर भर देतात. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये जर थीम ठरवली असेल तर सनकिस्ड पिवळा लेहंगा क्रॉपटॉप तुमच्या लुकला अजून चांगला उठाव आणू शकतात.

haldi-wedding-fashion-dress

21. ओढणी नाही, तर क्रेपची फॅशन (Capree Fashion) 

एखाद्या सणासाठी जर तुम्ही शॉपिंगसाठी मार्केटमध्ये फॅशन डिझाईनर स्टोर्समध्ये चक्कर मारली असेल तर तुम्हाला नक्की कळलं असेल की, जास्तीत जास्त इंडो वेस्टर्न आऊटफिट्सना पारंपरिक लुक देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी ओढणीच्या जागी आऊटफिट्ससह लाँग क्रेपदेखील कॅरी करण्यात येतात.

indian-fashion

22. लाल दुपट्टा… मखमल का (Red Scarf)

अगदी हलक्या आणि पेस्टल रंगाच्या फॅशनसह लाल हा नेहमीच सदाबहार रंग म्हणून पाहिला जातो. लग्नाच्या हंगामात तर कधीच लाल रंग चुकीचा ठरत नाही. लाल रंगाचं वैशिष्ट्य आहे की, हा प्रत्येक स्किनटोनवर चांगला दिसतो. वेडिंग ड्रेस म्हणून तर लाल रंगाचा लेहंगा नेहमीच अप्रतिम शोभून दिसतो.

indian-wedding-dress %282%29

23. शालू हिरवा पाचूनी मढवा (Fry The Shalu Green Panchu)

हिरवा रंग हा शांती आणि सौम्यतेचं प्रतीक मानलं जातं. हिरव्या रंगाचा हा शरारा सेट हिना खानला अगदी शोभून दिसत आहे. तुम्हालाही असा सेट नक्कीच शोभून दिसेल. हे आऊटफिट अर्थात ही कुर्ती आणि शरारा अतिशय वजनाला हलका आहे आणि त्यामुळेच थोडी जड ओढणी यावर घेतली तर अधिक उठावदार दिसेल. मेंदीच्या कार्यक्रमामध्ये असे आऊटफिट तुम्ही घालू शकता.

indian-wedding-dress-fashion

24. हळदीचे रितीरिवाज (Haldi Dresses For Women)

तुम्ही जर नवरा अथवा नववधूचे जवळचे मित्र असाल तर तुम्हाला चिडवण्यासाठी त्यांची मावशी, आत्या, काकू हे सर्वजण तुम्हालादेखील हळद लावू शकतात. हळदीच्या कार्यक्रमात फोटो आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जर अगदी खास दिसायचं असेल तर, असा पिवळा लाँग स्कर्ट आणि गोल्डन ब्लाऊज घालायला काहीच हरकत नाही.

haldi-outfit-indian-wedding

25. इंडो- वेस्टर्नचा सध्या बोलबाला (Indo Western Dresses)

निळ्या रंगाची ही साडी अशा पद्धतीने नेसण्यात आली आहे की, चालताना वा नाचताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसंच याला अगदी आधुनिक लुक देण्यासाठी साडीबरोबर कॉलरवाला ब्लाऊज वापरण्यात आला आहे.

indo-western-fashion-women

26. सर्व काही रंगाचा खेळ (Everything’s A Colour Game)

दोन रंगांच्या साडीची फॅशन अजूनही सुरु आहे. अशा प्रकारची साडी नेसताना दोन्ही रंगांशी मिळता जुळता असा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घालायला हवा.

hot-saree-look-for-wedding

27. पार्टीमधील आकर्षण तुम्हीच (You Are The Attraction Of The Party)

बऱ्याच मुली आपल्या आऊटफिटसह आपल्या दागिन्यांकडेही विशेष लक्ष देतात. तुम्ही पण त्यातील एक असाल, तर हा डार्क पिंक अर्थात राणी रंगाच्या लेहंग्यामध्ये तुम्ही तुमचा शाही लुक दाखवू शकता आणि अशा लुकमुळे पार्टीमधील तुम्हीच सर्वात मोठं आकर्षण असाल.

indian-wedding-dress

28. रॉयल अंदाज (Royal Estimates)

काही आऊटफिट्स असे असतात, ज्यामध्ये काहीच नवं नसतं पण तरीही दिसायला ते अगदी रॉयल दिसतात. या आऊटफिटमध्ये आतला गाऊन अतिशय प्लेन आहे मात्र क्रेपवर करण्यात आलेल्या कलाकुसरीमुळे या आऊटफिटचा लुक अगदी रॉयल दिसत आहे.

indian-wedding-fashion

29. हलका रंगही दिसतो सुंदर (Light Colours Look Beautiful)

दोन रंगांची साडी असेल तर गरजेचं नाही की, तुम्ही अगदी गडद रंगच निवडायला हवा. यामध्ये हलका रंगही अतिशय सुंदर दिसतो. दिया मिर्झाचा हा अंदाज कोणालाही आकर्षित करण्यासाठी अप्रतिम आहे.

indian-saree-wedding-function

30. फॅशन का है जलवा (Fashion)

तुम्हाला एकदम प्लेन आऊटफिट घालण्याची इच्छा असेल तर, त्यासाठी तुम्हाला थोडे जड दिसणारे दागिने घालायला हवेत. अशा तऱ्हेच्या आऊटफिट्ससाठी शोभून दिसणं हे सर्वस्वी दागिन्यांवर अवलंबून असतं.

indo-western-outfit

31. कार्यक्रमात फक्त तुम्हीच चमकणार (You Will Shine At The Event)

तुम्ही एखाद्या दाक्षिणात्य लग्नामध्ये जात असाल तर, त्यांच्या पद्धतीनेच तयार होण्याचा प्रयत्न करा. केशरी रंगाच्या अशा साडीवर गजरा लावायला विसरू नका.

indian-reception-look

32. शरारा- शरारा … (Sharara dresses)

फॅशन डिझाईनरच्या म्हणण्यानुसार, यावर्षीदेखील पेस्टल रंग ट्रेंडमध्ये आहेत. पेस्टल रंगाचं वैशिष्ट्य आहे की, कोणत्याही ब्राईट रंगाबरोबर हे अतिशय सुंदर दिसतं. विश्वास वाटत नसेल तर तुम्हीदेखील हा लुक पाहा.

indo-western-wedding-dress

33. मेंदीच्या पानावर (Special Mehndi Dresses)

मेंदीच्या कार्यक्रमात मुली सहसा मेंदी कलरचे आऊटफिट घालण्याला प्राधान्य देतात. तुमच्या या खास दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी तुम्ही वेगळं काहीतरी शोधत असाल, तर हिना खानच्या या शरारा सेटवरून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.

haldi-dress-wedding-fashion

34. वेडिंग ड्रेसची चलती (Moving Wedding Dresses)

जेव्हा वेडिंग ड्रेसबद्दल बोलायचं असतं तेव्हा सिल्व्हर गाऊन हा कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाही. अशा प्रकारच्या फ्लोई गाऊनमध्ये तुमचा लुक अधिक उठून दिसेल.

long-dress-wedding-dress

35. कॅलिडो कुरत्याची वेगळीच शान (Kalido Kurtis Has A Different Look)

एथनिक फॅशन ब्रँडमध्ये डब्ल्यू (W) ब्रँडची काही वेगळीच शान आहे. या फॅशन डिझाईनरच्या सांगण्यानुसार, एखाद्या कार्यक्रमाचं आकर्षण बनण्यासाठी ब्राईट रंगाचे कॅलिडो कुरते तुम्ही घालून त्यावर प्लाझो आणि स्कार्फ घेऊ शकता.

kaleido-kurta-wedding-fashion

36. एथनिकमध्ये कांजीवरम उत्कृष्ट (Kanjivaram Excelled In Ethnic)

कांजीवरम साडीशिवाय कोणतंही साडीचं कलेक्शन कधीच पूर्ण होत नाही. कांजीवरम नसेल तर अगदी अपूर्ण वाटतं. या केशरी कांजीवरम साडीबरोबर गडद रंगाचा ब्लाऊज आणि हिरव्या आणि सोनरी रंगाचे दागिने अतिशय सुंदर दिसत आहेत.

kanjivaram-wedding-saree

37. जिपसूटची फॅशन (Fashion Of Jetsuit)

तुम्ही जर एखादा नवा आऊटफिट ट्राय करू इच्छित असाल, तर W ब्रँडचा हा जिपसूट खास तुमच्यासाठी बनवण्यात आला आहे. फॅशन हवी असूनही कम्फर्टेबल असण्याशी तडतोड न करणाऱ्या मुलींसाठी हा खास जिपसूट आहे. वायब्रंट रंगाचा हा जिपसूट पारंपरिकता आणि आधुनिकता याचं अप्रतिम मिश्रण आहे.

wedding-fashion-outfit

38. उफ! क्या अदा है 

काळा हा असा एक रंग आहे, जो पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही आऊटफिटवर उठून दिसतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही दुसऱ्या रंगाबरोबर हा रंग अगदी सहज मॅच होतो. काळ्या आणि केशरी रंगांचा हा अस्मिदा सूदचा गाऊन अप्रतिम दिसत आहे.

traditional-wedding-fashion

39. क्लासी आणि एलिगंट (Classy And Elegant)

लग्न आणि सणाच्या निमित्ताने बऱ्याचदा मुली साडी नेसतात. तुम्हालासुद्धा कोणत्या कार्यक्रमामध्ये साडी नेसायची असेल, तर पारंपरिक असूनही क्लासी दिसण्यासाठी, हिना खानने नेसलेल्या या मल्टीकलर साडीचा पर्याय तुमच्यासाठी अप्रतिम पर्याय ठरू शकतो.

saree-traditional-dress

40. स्टाइलमध्ये राहायचं (Stay In Style)

‘दिल ही तो है’ फेम योगिता बिहानी ही अभिनयात अप्रतिम असून अतिशय फॅशनेबल आहे. तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक आऊटफिटऐवजी काही आधुनिक स्वरुपाचं आऊटफिट घालणार असाल, तर योगिताचा हा लाल आऊटफिट नक्की ट्राय करा. कम्फर्ट आणि स्टाईलशी मिळता – जुळता हा आऊटफिट तुम्हाला नक्कीच आवडेल.

western-wedding-dress-fashion

41. थंडीत असलेला लग्नाचा सीझन (Winter Dresses For Women)

थंडीमध्ये लग्नाला जायचं म्हणजे खूपच मेहनतीचं काम. थंडीपासून वाचायचंही असतं आणि आपल्या फॅशनमध्येही कोणती कमतरता आलेली आपल्याला चालणार नसते.

Velvet Choli and Lehenga by AKS Clothings 

तुम्हीदेखील थंडीत कोणाच्या लग्नाची तयारी करत असाल, तर अक्स क्लोदिंग्जच्या गोल्ड प्रिंट कलेक्शनमधील (AKS Clothings) हे ड्रेस पाहू शकता.

Wedding-Collection-by-AKS-Clothings 

Gold   White Collection of AKS Clothings.

तुम्ही या लग्नाच्या सीझनमध्ये धमाल करायला तयार आहात का? 

हेदेखील वाचा – 

नवरीसाठी खास ‘बजेट’मधील ५० भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स

हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील

लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल