ADVERTISEMENT
home / Care
केसांना तूप लावल्याने होतात ‘अफलातून’ फायदे

केसांना तूप लावल्याने होतात ‘अफलातून’ फायदे

आतापर्यंत आपण सर्वांनीच केसांना तेल लावण्याचे फायदे आणि उपयोग नक्कीच ऐकले आहेत. पण केसांना तूप लावल्याचं कधी ऐकलं आहे का? हो खरं आहे. आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये तुपाचा समावेश करतो. पण त्याबरोबरच तुमच्या केसांनाही तूप लावल्याने त्याला अधिक फायदा मिळतो. खरं तर मऊ, मुलायम आणि सुंदर घनदाट केसांसाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तूप खरंतर प्रत्येकाच्या घरात असतं. पण त्याचा केवळ खाण्यासाठी आपण उपयोग करतो. याचे होतात अफलातून फायदा. केसांना अनेक फायदे मिळण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. पाहूया तूपाचे काय आहेत केसांसाठी विविध फायदे – 

1. दुहेरी केसांवरील रामबाण उपचार

Shutterstock

बऱ्याच जणांना दुहेरी केस अर्थात स्प्लिट एन्ड्सची समस्या असते. सहसा केसांना फाटे फुटतात ते केसांच्या खालच्या बाजूंना असतात. केस दुहेरी झाल्यानंतर ते अतिशय खराब दिसतात. त्याशिवाय केसांची वाढही थांबते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुपाने मसाज केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. जर तुम्ही काही दिवस नियमित केसांचा मसाज तुपाने केला तर तुमची ही समस्या नाहीशी होईल. 

ADVERTISEMENT

2. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी करावा वापर

Shutterstock

कोंडा हीदेखील केसांच्या बाबतीतील महत्त्वाची समस्या असते. आपल्या केसांंमध्ये जेव्हा कोंडा होतो तेव्हा केसांच्या मुळामध्ये तूप लावा आणि तुम्ही व्यवस्थित मसाज करा. तुपामुळे तुमच्या डोक्यावरील त्वचा अजिबात कोरडी राहात नाही. त्वचा कोरडी राहिली तर कोंड्याचा त्रास अधिक प्रमाणात होतो. पण जर त्वचा कोरडी राहिलीच नाही तर कोंड्याचा त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुम्ही किमान आठवड्यातून एकदा तरी तुपाने केसांच्या मुळापासून मसाज करा. याचा तुम्हाला फायदा मिळेल. 

कोंडा असण्याची असतील 5 कारणं तर करा ‘हे’ सोपे उपाय

ADVERTISEMENT

3. केसांचा विकास व्यवस्थित होण्यासाठी

Shutterstock

बऱ्याचदा केस एका ठराविक इंचापर्यंत वाढतात. त्याचा पुढे विकासच होत नाही. त्याची अर्थातच वेगवेगळी कारणं असतात. पण जर तुमच्या केसांचा विकास नीट होत नसेल आणि तुम्हाला घनदाट आणि लांबसडक केस हवे असतील तर तुम्ही केसांना तुपाने मालिश करा. तसंच त्यामध्ये आवळा आणि कांद्याचा रसही मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या केसांचा चांगला विकास करून देण्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्ही किमान 15 दिवसाने एकदा तरी करायला हवं. त्यामुळे तुम्हाला केसांना चांगला परिणाम दिसून येईल. 

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय

ADVERTISEMENT

4. कंडिशनरचा वापर करण्यासाठी

Shutterstock

आपण सतत वेगळे कंडिशनर बदलत असतो.  पण नैसर्गिक कंडिशनर म्हणून तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तूप आपल्या केसांना मऊ आणि मुलायम बनवतं. तसंच तुमच्या केसांमध्ये अधिक गुंता असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलसह तूप मिक्स करून केसांना लावा. यामुळे तुमचे केस अधिक मुलायम होतात.  केसातील गुंता नाहीसा होण्यास मदत होते. तूप हे केसांसाठी एक उत्तम कंडिशनर आहे. 

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

5. केसांची चमक वाढवण्यासाठी

Shutterstock

चमकदार आणि लांब केस कोणाला आवडत नाहीत? पण त्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्याची काळजी घेण्यासाठी अथवा केसांची चमक आणण्यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तर त्यासाठी तूप केसांना लावणं हा उत्तम उपाय आहे. कितीही निस्तेज आणि वाईट केस असतील तरीही तूप लावल्याने तुमच्या केसांना अधिक चमक येते. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकदा नक्की हा उपाय करून पाहा. कदाचित तुम्हाला तूप लावणं योग्य वाटत नसेल. तुपाची किंमत जास्त वाटत असेल तर किमान महिन्यातून एकदा तरी तुमच्या केसांवर हा उपाय करून पाहा.  तुम्हाला नक्कीच याचे चांगले परिणाम दिसून येतील. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

19 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT