ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

तुमच्याबरोबर असं कधी घडलं आहे की, अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला एखाद्या मीटिंगला जायचं आहे किंवा अचानक पार्टीला जायचं आहे आणि कपडे बदलताना अचानक जाणवलं की, तुम्हाला जो ड्रेस घालायचा आहे त्यासाठी योग्य अशी ब्रा तुमच्याजवळ नाहीच. अथवा कधी असं झालं आहे का? तुमच्याकडे असलेल्या ड्रेसमध्ये योग्य ब्रा न घातल्यामुळे तुमचा पूर्ण लुक बिघडला आहे. अर्थात हे प्रत्येक महिलेबरोबर कधी ना कधीतरी नक्कीच घडलं असलं यात वाद नाही. हे सर्वच महिला मान्य करतील. योग्य ब्रा नसेल तर तुमचा कितीही चांगला लुक असू दे तो नक्कीच खराब होतो. त्यामुळे तुमच्याकडे नक्की कोणती ब्रा असायला हवी याची एक यादीच आम्ही बनवली आहे. ड्रेसनुसार कोणती ब्रा तुमचा लुक अधिक ग्रेसफुल बनवते आणि आत्मविश्वास वाढवू शकते हे जाणून घेऊया –

1. टी-शर्ट ब्रा

Types of Bra- TShirt Bra

ही ब्रा प्रत्येक महिलेसाठी विशेष स्वरूपात आवश्यक आहे आणि ही ब्रा कोणाकडे नाही असं असूच नये. ही ब्रा सगळ्या महिलांजवळ असतेच आणि असायलाच हवी. ही ब्रा तुम्हाला एक क्लीन लुक देते. विशेषतः जेव्हा तुम्ही एखादा पातळ कपडा घालता अथवा कोणताही फिटेड कपडे घालता तेव्हा ही ब्रा तुमच्या लुकसाठी योग्य ठरते. रोजच्या वापरासाठी ही ब्रा योग्य आहे. पण या ब्रा मध्येदेखील तुम्ही सुती अर्थात कॉटनची ब्रा घेणं योग्य आहे. ही ब्रा मिळणं अजिबात कठीण नाही. वेगवेगळ्या रंगाची आणि प्रिंट्सची ब्रा तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळते. इतकंच नाही तर काही ठिकाणी इनरवेअर्सची खास मार्केट्स आहेत तिथेही तुम्हाला या ब्रा मिळू शकतात.

किंमत – रू. 200 पासून पुढे

ADVERTISEMENT

2. बॅकलेस ब्रा

Types of Bra- Backless

तुम्ही कोणताही गाऊन अथवा घागरा चोळी घालणार असलात तर बॅकलेस ब्रा हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुमच्या ड्रेसचा गळा मागून डीप असेल अथवा नेटसारखे कापड असेल तर अशी ब्रा घालावी. वास्तविक बऱ्याच ब्रा ची स्ट्रेप्स काढून टाकता येते. पण त्यापेक्षा सिलिकॉन स्टीक ऑन असेल तर जास्त चांगलं. तुम्हाला कपड्यांमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि शिवाय कपड्यांमधून स्ट्रीप्स दिसत आहे की नाही या गोष्टीचा ताणही राहात नाही.

किंमत – रू. 700 पासून पुढे

3. स्ट्रेप्लेस ब्रा

Types of Bra- Strapless Bra

ADVERTISEMENT

तुम्हाला नेहमी halter अथवा off-shoulder टॉप घालायला आवडत असेल तर तुम्ही या ब्रा चा वापर करायला हवा. ही ब्रा तुमच्याकडे असायलाच हवी. कारण अशा वेळी स्ट्रीप्स दाखवणं आवडत नाही. तेव्हा अशी ब्रा घालणं सोयीस्कर ठरतं. पण ही खरेदी करत असताना नेहमी या ब्रा ची internal gel strip आहे की नाही आणि ब्रा च्या बाजूच्या भागावर (side panels) तार अथवा प्लास्टिक (wire or plastic reinforced) च्या पाठिंब्याने मजबूत आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.  या ब्रा ची साईड आणि मागील पट्टी मोठी असायला वही कारण तुमची ब्रा योग्य ठिकाणी टिकून राहू शकेल आणि तुम्हाला योग्य फिटिंग देईल.

किंमत – रू. 400 पासून पुढे

4. कन्व्हर्टेबल ब्रा

Types of Bra- Convertible Bra

ही ब्रा महिलांसाठी खूपच आवश्यक ब्रा आहे. कारण ही तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने घालू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार याचे स्ट्रीप्स तुम्हाला अडजस्ट करता येतात. हॉल्टर, रेसर बॅक अथवा स्ट्रेप्लेस या तऱ्हेच्या या ब्रा असतात. तुम्हाला वेगवेगळ्या ड्रेसमध्ये ही एकच ब्रा वापरता येते. ही ब्रा तुम्ही न्यूट्रल रंगामध्ये खरेदी करू शकता आणि जमलं तर यामध्ये न्यूड रंग (त्वचेसारखा रंग) वापरा, त्यामुळे तुम्हाला जास्त उपयोग करता येईल.

ADVERTISEMENT

किंमत – रू. 700 पासून पुढे

5. स्पोर्ट्स ब्रा

Types of Bra- Sports Bra

तुम्ही जिमला जात असाल आणि वर्कआऊट करत असाल तर स्पोर्टस ब्रा देखील आवश्यक आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसात इतर ब्रा मुळे तुमच्या स्तनांखाली चट्टे उमटतात. त्यामुळे अशा परिस्थितीत स्पोर्ट्स ब्रा वापरणं योग्य आहे. ही ब्रा तुमच्या स्तनांना चांगला सपोर्ट तर देतेच शिवाय घामामुळे तुमच्या स्तनांखाली होणाऱ्या इन्फोक्शनपासून बचाव करते. व्यायाम करताना ही ब्रा योग्य आहे कारण आपण चालतो, धावतो त्यामुळे स्तनांचा आकार इतर ब्रा च्या तुलनेमध्ये व्यवस्थित राखायला मदत होते. शिवाय व्यायाम करताना स्तन जास्त प्रमाणात हलतात त्यामुळे ते दिसायलाही खराब दिसतं. जे स्पोर्ट्स ब्रा मध्ये दिसून येत नाही.

किंमत – रू. 1000 पासून पुढे

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची

पहा.. साडी किंवा पार्टी ड्रेससाठी टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन्स

ADVERTISEMENT

तुमचे इनरवेअर्स ‘एक्सपायर्ड’ झाले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा

19 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT