ADVERTISEMENT
home / Fitness
शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित करा 5 व्यायाम प्रकार

शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित करा 5 व्यायाम प्रकार

सध्याच्या कोरोनाकाळात (corona virus) सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणे आणि शरीराला व्यवस्थित निरोगी ठेवणे. यासाठी आपल्याला अनेक व्यायाम प्रकार माहीत असतात पण ते करायचा आपण कंटाळा करतो. विटाबायोटिक्स येथील फिटनेस अँड न्यूट्रिशन तज्ज्ञ, उपाध्यक्ष रोहीत शेलाटकर यांनी आपल्या वाचकांसाठी काही सोप्या आणि 5 व्यायाम प्रकाराबद्दल सांगितले आहे. हे व्यायाम प्रकार तुम्ही नियमित केल्यास, तुम्ही तुमचे शरीर या काळातही निरोगी ठेऊ शकता. या व्यायामांचा रोज तुम्ही उपयोग करून घ्यायला हवा. इतर हेव्ही वर्कआऊट तुम्ही नाही केले तरीही चालेल. पण हे सोपे पाच व्यायाय तुम्हाला नक्कीच शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. कोणते हे पाच व्यायामाचे प्रकार आहेत आणि त्याचा कसा वापर करून घ्यायचा ते या लेखाद्वारे जाणून घ्या. 

सूर्यनमस्कार (Suryanamsakar)

सूर्यनमस्कार (Suryanamsakar)

Shutterstock

सूर्यनमस्कार म्हणजे सर्वोत्तम आसन समजण्यात येते. शरीराचा प्रत्येक अवयव आणि सांधे मजबूत करण्यसाठी सूर्यनमस्काराचा उपयोग होतो. तसंच मधुमेह असल्यास, रक्तातील साखरेची पातळी कमी आणण्यासाठी, मेटाबॉलिजम सुधारण्यासाठी आणि रक्तप्रवाह उत्तम करण्यासाठीही सूर्यनमस्काराचा अधिक चांगला उपयोग होतो. याव्यतिरिक्त सूर्यनमस्कार हा तुमच्या त्वचेसाठी आणि महिलांची मासिक पाळी नियमित करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. त्यामुळे केवळ कोविड काळातच नाही तर तुम्ही नियमित किमान 12 सूर्यनमस्कार रोज घालायला हवेत. तुमचे शरीर तंदुरूस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. इतकंच नाही तर तुमचा श्वास अधिक बळकट करण्यासाठीही याचा फायदा होतो. 

ADVERTISEMENT

सूर्यनमस्काराचे फायदे आणि पद्धती (Surya Namaskar Benefits In Marathi)

पुश अप्स (Push Ups)

पुश अप्स (Push Ups)

Shutterstock

आपल्या शरीराचा वरचा भाग अधिक बळकट करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने मारण्यात आलेले पुश अप्स नक्कीच फायदेशीर ठरतात. तुमच्या खांद्यासाठी आणि तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला मजबूती आणण्याचे काम पुशअप्स करते. दिवसभरात तुम्ही काही पुशअप्सचे प्रमाण सेट केलेत तरी तुम्हाला याचा फायदा होतो. शरीराला बळकटी आणण्यासाठी सर्वात सोपा आणि अप्रतिम मार्ग म्हणजे पुश अप्स या व्यायाम प्रकार. तसंच पुशअप्स तुम्हाला कुठेही करता येतात. त्यासाठी तुम्हाला फक्त जिममध्ये जाण्याचीच आवश्यकता आहे असं अजिबात नाही. तसंच यासाठी कोणत्याही मशीन्सचीही तुम्हाला गरज भासत नाही.  

ADVERTISEMENT

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

स्क्वाट्स (Squats)

स्क्वाट्स (Squats)

Gifs

शरीराचा वरचा भाग आणि खालचा भाग यांना एकत्रित निरोगी ठेवण्याचे काम स्क्वाट्स या व्यायामाने करता येते. तुमच्या मांड्या, नितंब, लोअर बॅक, पाठ या सगळ्याची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी तुम्ही दिवसभरात किमान दहा स्क्वाट्स मारायला हव्यात. यामुळे तुमच्या शरीराला चांगला व्यायाम मिळतो आणि त्याशिवाय तुमचे पोटही सुटत नाहीत. याची काळजी तुम्हाला घेता येतो. तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे व्यायाम प्रकार नक्कीच आवश्यक आहेत.

ADVERTISEMENT

जंपिंग जॅक्स (Jumping Jacks)

जंपिंग जॅक्स (Jumping Jacks)

Freepik

अनेक कार्डिओ व्यायामानुसार जंपिंग जॅक्स हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. यामुळे हृदयाचे ठोके उत्तम राहतात. तसंच रक्तप्रवाह वाढतो आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर या व्यायामाने तो त्रास कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय हृदयरोग कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीपासून तुम्हाला दूर राखण्यास मदत मिळते. 

दंड टोन्ड करण्यासाठी जीममध्ये करा हे 5 व्यायाम, दिसेल फरक

ADVERTISEMENT

प्लँक्स (Planks)

प्लँक्स (Planks)

Shutterstock

प्लॅंक्स हा अतिशय साधा पण अत्यंत परिणामकारक असा व्यायामाचा प्रकार आहे. संपूर्ण शरीराची बळकटी राखण्यसाठी हा व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतो. शरीराचा मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वाटा हा प्लँक्स व्यायामाचा असतो. नियमित प्लँक्स आणि अगदी साईड प्लँक्स केल्यास, तुमच्या शरीराला निरोगी राखण्यास नक्कीच मदत होते. त्याशिवाय तुमच्या शरीराचे मेटाबॉलिजम वाढून प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत मिळते. 

त्यामुळे तुम्ही नियमित या सोप्या पाच व्यायाम प्रकारांना आपल्या आयुष्यात स्थान द्या आणि निरोगी राहा!

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT