सूर्यनमस्काराचे फायदे आणि पद्धती (Surya Namaskar Benefits In Marathi)

Benefits Of Surya Namaskar In Marathi

जर तुम्ही रोज सूर्य नमस्कार करत असाल तर फिट राहण्यासोबत तुमचे अनेक आजारही दूर होतील. जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर रोज कमीत कमी 10 वेळा सूर्य नमस्कार केल्यास तुमचं वजन कमी होईल. कारण सूर्यनमस्काराचे एक नाही अनेक फायदे आहेत. रोज सूर्य नमस्कार केल्यास मनाची एकाग्रता वाढते. तसंच शरीराची लवचिकता वाढते, त्वचा उजळते, हाडं मजबूत होतात, पचनशक्ती वाढते आणि डोक्यातील तणावही दूर होतो. सूर्यनमस्काराचे फायदे (surya namaskar benefits in marathi) अनेक आहेत. सूर्यनमस्कार कसा करायचा त्याच्याबद्दलही सर्व माहिती, सूर्य नमस्कार चे प्रकार तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत.  सूर्यनमस्काराच्या काही स्टेप्स असतात त्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखात मिळेल आणि  याचा नियमित तुम्ही वापर केल्यास,  तुम्हाला वजन कमी होण्यासही फायदा मिळेल.

Table of Contents

  सूर्य नमस्कार म्हणजे नक्की काय? (What Is Surya Namaskar In Marathi)

  Instagram

  सूर्य नमस्कार हे दोन शब्द म्हणजे सूर्यासाठी करण्यात आलेली प्रार्थना असा सहज अर्थ आहे. अनादी काळापासून लोक सकाळी लवकर उठून सूर्याची प्रार्थना करतात आणि सूर्य नमस्कार योगाने दिवसाची सुरूवात केली तर शरीरासाठी आणि मनासाठी हे चांगले ठरते असे मानले जाते. या सूर्य नमस्कार योगची प्रक्रिया साधारण 12 चरणांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये करावं लागतं. या 12 योगासनांच्या क्रियेला सूर्य नमस्कार असे म्हणतात.  सूर्यनमस्काराचे फायदे अनेक आहेत. तुम्हाला तुमची शरीरयष्टी जर चांगली राखायची असेल तर तुम्हाला नित्यनियमाने सूर्य नमस्कार करायला हवेत. सूर्यनमस्काराचे काय फायदे आहेत आपण पाहूया.चांगल्या दिवसाची सुरुवात सू्र्योदय कोट्स ने करुन तुमचा दिवस आनंदी करा

  सूर्यनमस्काराचे फायदे (Benefits of Surya Namaskar In Marathi)

  सूर्यनमस्काराचे फायदे शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने होतात. त्याचे नक्की काय फायदे आहेत हे आपण पाहूया.

  शरीराची प्रक्रिया सुधारते (Body Function)

  जसं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की सूर्य नमस्कार एक असे योगासन आहे ज्यामध्ये क्रमबद्ध 12 योगासने करण्यात येतात. या आसनांच्या क्रियेमुळे शरीरातील प्रत्येक भागावर प्रभाव पडतो. तसंच योग प्रक्रियेदरम्यान प्रत्येक पायरीवर श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या आतड्यांचीही क्रियाशीलता वाढते आणि शरीर प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. आतड्याच्या कार्यक्षमतेसाठी याचा चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा चांगला होतो आणि अनेक आजारांपासून दूर राहतो.  

  वजन घटविण्यासाठी योग्य (Weight Loss)

  Surya Namaskar Benefits In Marathi

  इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगद्वारे देण्यात आलेल्या शोधाप्रमाणे सूर्यनमस्कारामुळे हृदय स्वास्थ्य आणि श्वसनासंबंधी विकार दूर होतात. तसंच यामुळे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्काराचे फायदा होतो. योग्य प्रक्रियेसह रोज सूर्य नमस्कार घातले तर वजन कमी होण्याची शक्यता असते. मात्र यामध्ये नियमितपणा ठेवायला हवा.

  श्वसनाच्या दबावात सुधारणा (Respiratory Pressure)

  रेस्पिरेटरी प्रेशर अर्थात श्वसन दबावाचा सरळ संबंध हा आतड्यांच्या कार्यक्षमतेशी जोडला जातो. पण सूर्यनमस्काराच्या या वेगवेगळ्या आसनांमुळे श्वासाची प्रक्रिया मुख्य भूमिका निभावते. त्यामुळे श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होते. तसंच हे सुधारल्यामुळे श्वासासंबंधित विकारही होत नाहीत आणि रेस्पिरेटरी प्रेशर योग्य  राहते. त्यामुळे सूर्यनमस्काराचा असा फायदा शरीराला मिळतो. 

  मासिक पाळी होते नियमित (Regular MC)

  सूर्य नमस्कार चे फायदे मराठी

  कित्येक महिलांना पाळी नियमित न होण्याचा त्रास होतो. पण तुम्ही नियमित सूर्यनमस्कार केल्यास तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. अनियमित पाळी समस्या असेल तर त्यासह थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी, चिडचिडेपणा हे सर्व एकत्र येतं आणि या सर्वावरील एकच उपाय आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार.  मासिक पाळी नियमित आणण्यासाठी सूर्यनमस्काराच्या आसनांचा फायदा होतो. 

  मांसपेशींमध्ये सुधारणा (Nerves)

  सूर्य नमस्कारातील अनेक योगांमुळे शरीराला अधिक मजबूती मिळते. तसंच शरीराशी संबंधित मांसपेशीमध्येदेखील सुधारणा आणण्याचे काम यातील अनेक योग करतात. याचा सकारात्मक प्रभाव शरीरावर पडतो. तसंच मांसपेशीची गतीविधी वाढवून त्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा फायदा होतो.

  तणावापासून मुक्ती (Stress Free)

  सध्या आपल्याकडे अनेक जणांना तणावापासून मुक्ततेची जास्त गरज भासते. सतत काम आणि घरच्या ताणामुळे अनेक आजार आपण ओढवून घेत असतो. सूर्य नमस्काराच्या योगमुळे ध्यानधारणाही होते आणि त्यामुळे मन एकाग्र करण्यास शक्ती मिळते. त्यामुळे तणावापासून मुक्ती देण्यास याचा फायदा मिळतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते आणि तुमची दृष्टीही सकारात्मक होण्यास मदत मिळते. 

  त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर (For Skin and Hair)

  केस आणि त्वचा खराब होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण ठरते ते म्हणजे चिंता आणि तणाव. मन शांत राखण्यासाठी सूर्य नमस्काराचा प्रयोग करण्यात येतो. ही प्रक्रिया तुम्हाला शांत करते आणि त्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांच्या वाढीतही सुधारणा होते. मुळात चिंता आणि तणावमुक्त झाल्यानंतर अन्य कोणतेही आजार आपल्या आजूबाजूला फिरकत नाहीत हा याचा सर्वात मोठा फायदा आहे.

  सूर्यनमस्कार कसा करायचा (Surya Namaskar Steps In Marathi)

  Surya Namaskar Steps In Marathi

  भारतात सूर्यनमस्काराची परंपरा अनेक पिढ्यांपासून सूरू आहे आणि योगासनांमध्ये याला सर्वोत्कृष्ट मानलं जातं. पण अनेकांना सूर्यनमस्काराचे फायदे माहीत नाहीत. त्यामुळे जाडेपणामुळे वैतागलेली लोकं योगा सोडून जिम आणि साईड ईफेक्ट्स होणाऱ्या औषधांचा वापर करतात. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही रोज सूर्य नमस्कार केले तर तुम्ही फिट तर राहताच पण अनेक आजारांपासूनही दूर राहता. जर वेटलॉस करायचा असेल तर रोज कमीतकमी 10 वेळा सूर्य नमस्कार करा आणि वजन कमी करा. करून पाहा हे सोपे 12 सूर्यनमस्कार.

  स्टेप 1 - प्रणाम आसन

  Shutterstock

  सर्वात आधी दोन्ही हात जोडून (नमस्कारच्या पोझिशनमध्ये) सरळ उभे राहा. आपलं पूर्ण वजन दोन्ही पायांवर समानपणे ठेवून आणि खांदे सैल सोडा.

  स्टेप 2 - हस्तउत्तानासन

  Surya Namaskar Fayde In Marathi

  आता दुसऱ्या स्टेपमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वर उचला. दोन्ही हाता कानाच्या दिशेने मागे नेत कमरेकडे वाकवा. या दरम्यान पूर्ण शरीर दोन्ही टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत सर्व अंग वरच्या दिशेकडे स्ट्रेच करायचा प्रयत्न करा.

  स्टेप 3 - हस्तपाद आसन

  Surya Namaskar Benefits In Marathi

  आता तिसऱ्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडत हात सरळ ठेवत आणि पुढे वाका. दोन्ही हातांना पायाच्या उजव्या आणि डाव्या बाजून जमिनीला टच करायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा या दरम्यान पाठीचा कणा सरळ असला पाहिजे.

  स्टेप 4 - अश्व संचालन आसन

  Surya Namaskar Steps In Marathi

  आता चौथ्या स्टेपमध्ये श्वास घेताना जेवढं शक्य असेल तेवढं आपला उजवा पाय मागच्या बाजूला न्या. मग उजवा गुडघ्याला जमिनीवर ठेवत आणि नजर वर आकाशाकडे ठेवा. या दरम्यान प्रयत्न करा की, तुमचा डावा पाय दोन्ही हाताच्यामध्ये असेल.

  स्टेप 5 - दंडासन

  सूर्यनमस्काराचे फायदे

  आता पाचव्या स्टेपमध्ये दीर्घ श्वास घेत डावा पाय पाठीमागे घेत आणि पूर्ण शरीर सरळ रेषेत ठेवा. या दरम्यान तुमचे हात जमिनाला लंबाकार असले पाहिजेत.

  स्टेप 6 - अष्टांगासन

  सूर्य नमस्कार चे फायदे मराठी

  आता पुढच्या स्टेपमध्ये आरामात दोन्ही गुडघे जमीनीवर आणा आणि श्वास बाहेर सोडा. आपलं शरीर जमिनीपासून उचलत शरीर पुढे सरकवा. या दरम्यान तुमची छाती आणि हनुवटी जमिनीला टच करेल. पण लक्षात ठेवा की, या परिस्थितीत तुमचं पोट जमिनीला लागता कामा नये.

  स्टेप 7 - भुजंगासन

  Surya Namaskar Benefits In Marathi

  आता सातव्या स्टेपमध्ये श्वास घेत आपल्या शरीराचा वरील भाग मानेच्या बाजून पाठी करत उठा. असं करताना थोड्या वेळासाठी याच स्थितीत थांबा आणि खांदे कानांपासून दूर नजर आकाशाच्या दिशेने ठेवा.

  स्टेप 8 - पर्वतासन

  Surya Namaskar Steps In Marathi

  आता आठव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडत पाठीचा मणका आणि पार्श्वभाग वर उचलायचा प्रयत्न करा. छाती खाली वाकवून उलट्या व्ही चा आकार करा.

  स्टेप 9 - अश्वसंचालनासन

  Surya Namaskar Fayde In Marathi

  आता नवव्या स्टेपमध्ये श्वास घेत उचवा पाय दोन्ही हातांच्या मधोमध घ्या आणि डाव्या गुडघा जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करा. या दरम्यान नजर वर ठेवा आणि स्ट्रेचिंगचा अनुभव घ्या.

  स्टेप 10 - हस्तपाद आसन

  Surya Namaskar Steps In Marathi

  आता दहाव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडा आणि सोडताना डावा पाय पुढे घ्या आणि हाताचे तळवे जमिनीवरच राहू द्या. हळूहळू दोन्ही गुडघ्यांना सरळ करा.

  स्टेप 11 - हस्तउत्तानासन

  Surya Namaskar Steps In Marathi

  आता अकराव्या स्टेपमध्ये श्वास घ्या आणि पाठीच्या मणक्याला हळूहळू वर घ्या आणि हातांना वरच्या बाजून मागे न्या. या दरम्यान पार्श्वभागाला पुढच्या बाजूला करायचा प्रयत्न करा.

  स्टेप 12 - ताडासन

  Surya Namaskar Steps In Marathi

  आता बाराव्या स्टेपमध्ये श्वास बाहेर सोडा आणि सोडताना शरीर सरळ करा, मग हात खाली घ्या. या दरम्यान एकचित्त होऊन शरीरात होणारी हालचाल जाणवायचा प्रयत्न करा.

  सूर्य नमस्काराची सुरूवात करणाऱ्यांसाठी टिप्स (Useful Tips For Surya Namaskar In Marathi)

  तुम्ही पहिल्यांदाच सूर्य नमस्कार करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी लक्षात न ठेवल्यास, तुम्हाला चुकीचे सूर्य नमस्कार केल्यास, त्रास होऊ शकतो अशा गोष्टी खालीलप्रमाणे आहेत - 

  • सूर्य नमस्कार नेहमी सूर्योदयाच्या आधी सूर्य उगविण्याच्या दिशेला करावा 
  • तसंच या गोष्टीची काळजी घ्या की प्रत्येक चरण करताना त्याच ऊर्जेसह आणि त्याच उत्साहाने करायला हवा.  मरगळ ठेऊ नका 
  • तसंच प्रत्येक स्टेप करताना ती नक्की कशी करायची हे बारकाईने शिकून  घ्या. तात्पुरते करू नका. तसंच सूर्यनमस्कार घाईघाईमध्ये करू नका 
  • श्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया कशी आहे याकडे लक्ष द्या
  • मागे मान नेण्याच्या  आणि पाय पसरण्याची आणि हात पुढे करण्याची या सगळ्या प्रक्रिया हळूवार करा.  कोणत्याही  भागाला झटका बसणार नाही याची काळजी घ्या. तसंच आपल्या क्षमतेनुसार या प्रक्रिया करा
  • मांसपेशींवर अधिक जोर देऊ नका. पूर्ण प्रयत्न करून नमस्कार करा
  • सुरुवातीला तुम्ही प्रशिक्षकांची मदत घेतल्यास उत्तम

  सूर्यनमस्कार करताना घ्यायची काळजी (Precautions To Take While Doing Surya Namaskar)

  सूर्य नमस्कार करताना काही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा उलट त्रास होऊ शकतो.  काही व्यक्तींना सूर्यनस्कार न करणं योग्य. त्यापैकी या काही गोष्टी आहेत - 

  • गर्भवती महिलांनी सूर्यनमस्कार करू नयेत 
  • हार्निया आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनीही सूर्य नमस्कारापासून दूर राहावे 
  • कंबर दुखत असल्यास तुम्ही नियमित सूर्य नमस्कार करायला हवेत 
  • मासिक पाळी चालू असताना सूर्य नमस्कार न करण्याचा सल्ला महिलांना दिला जातो. यामुळे रक्तस्राव जास्त होण्याची शक्यता असते म्हणून करू नये

  प्रश्नोत्तरे (FAQ's)

  1. सूर्य नमस्काराचा महत्वाचा फायदा कोणता?

  शरीर सुदृढ राहते हा सर्वात मोठा सूर्यनमस्काराचा फायदा आहे. त्याशिवाय तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासाठीही याची मदत मिळते आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढून कोणताही आजार तुम्हाला पटकन होत नाही.

  2. सूर्यनमस्कार नियमित केल्याने काही त्रास होत नाही ना?

  वास्तविक सूर्यनमस्कार नियमित करायला हवेत.  हा एक उत्तम योग प्रकार असून तुम्हाला मनःशांती टिकवायला आणि तणावमुक्त जगायला फायदेशीर ठरतो.  त्यामुळे नियमित लवकर उठून तुम्ही सूर्यनमस्कार घातले तर त्याचा काय फायदा होतो ते तुम्हाला स्वतःला जाणवेल.

  3. सूर्य नमस्काराच्या मुद्रा नीट न केल्यास काही त्रास होतो का?

  सूर्य नमस्कार हा एक योगाभ्यास आहे आणि त्याच्या मुद्रा या तुमच्या शरीराला योग्य अशाच करण्यात आलेल्या आहेत.  त्यामुळे तुम्ही चुकीच्या केल्यास, तुम्हाला त्रास होऊ शकतो.  शक्यतो सुरूवातीला प्रशिक्षकांची मदत घ्यावी आणि मग शिकल्यानंतर रोज स्वतः व्यवस्थित त्याचा अभ्यास करून तुमच्या शरीरासाठी फायदा करून घ्यावा.

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक