लग्नाचा लुक म्हटला की, आपल्याला नेहमी नवरी ही दागिन्यांनी नटलेली असते असंच वाटतं. पण सगळ्याच मुलींना हा भरजरी दागिन्यांचा लुक आवडतो असं नाही. लग्नासाठी तुम्ही मिनिमल दागिन्यांसह नवरीचा (Wedding look of Bride) लुक करू शकता. अगदी मिनिमल दागिन्यांसह (Minimal Ornaments) आणि मिनिमल मेकअपसह तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता. नवरीची स्टाईल करताना तुम्ही काही गोष्टींचा विचार करायला हवा. बऱ्याचदा नवरीच्या लुकचे मुख्य केंद्र असते ते म्हणजे दागिने. पण तुम्ही भरजरी दागिने न घालता अगदी नाजूक दागिन्यांचाही वापर करू शकता. नवरीने लग्नात अधिक ग्लॅमरस, क्लासिक दिसण्यासाठी नक्कीच अशा दागिन्यांचा वापर करावा. भरजरी दागिन्यांच्या सेट्सपेक्षा तुम्ही तुमच्या लग्नामध्ये नाजूक आणि अप्रतिम आकर्षक दागिन्यांचा वापरही करू शकता. काही टिप्स आम्ही घेतल्या आहेत दस्सानी ब्रदर्सचे भागीदार, दिलीप दस्सानी यांच्याकडून.
चोकरचा करा वापर
भरजरी आणि जड नेकलेसची जागा आता नाजूक आणि आकर्षक दागिन्यांनी घेतली आहे. नेहमीच्या सोन्याच्या आणि चांदीच्या भरजरी दागिने सांभाळणे नवरीलाही कठीण जाते. त्यापेक्षा लग्नात तुम्ही तुमच्या लेहंगा आणि साडीप्रमाणे (कांजीवरम साडी अथवा पैठणी साडी) चोकर्सचा पर्याय निवडावा. तुम्ही हिऱ्यांचा अथवा स्टोन ज्वेलरीचा वापर करावा. त्याशिवाय तुम्ही कुंदन चोकर्सचा वापर करू शकता. तुमचा लेहंगा अथवा साडी गडद रंगाची असेल तर तुम्ही चोकर्सचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्हाला अधिक दागिन्यांचा वापर करण्याची गरज नाही. तुमच्या संगीत अथवा मेहंदीसाठीही तुम्ही याचा वापर करू शकता.
कानातल्यांनी करा लुक आकर्षक!
हळदीसाठी नेकलेस घालणं कदाचित तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे हळदीसाठी नवरीने नेकलेस न घालता केवळ कानातल्यांवर लक्ष केंद्रीत केले तरीही तुमचा लुक अधिक आकर्षक दिसू शकतो. आधुनिक डिझाईन्स असणारे कानातले तुमचा लुक पूर्ण करण्यास मदत करू शकतात. मोठे कानातले असतील तर तुम्हाला नेकलेसची गरजही भासत नाही. क्रिस्टल कट जेमस्टोन अथवा स्टोन्सच्या कानातल्यांमुळे तुमच्या लुकची शोभा वाढेल.
ब्रेसलेट भरून काढेल बांगड्यांची कमतरता
बांगड्यांनी हात भरायला जर तुम्हाला नवरी म्हणून आवडत नसेल तर तुम्ही तुमचा लुक पार्टी रिसेप्शनसाठी अथवा कॉकटेल पार्टीसाठी ब्रेसलेट घालून पूर्ण करू शकता. हल्ली हिरव्या अथवा अन्य बांगड्या घालण्याचे बंधन नसते. त्यामुळे तुम्ही रिसेप्शनसाठी नवरी म्हणून याचा वापर करू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळे स्टोन्स यामध्ये वापरून याला स्पेशल टच देऊ शकता.
वापरा आई अथवा आजीचे दागिने
नव्या नवलाईमध्ये आपण जुन्या दागिन्यांचा साज आणि थाट विसरूनच जातो. पण तुम्हाला अधिक सुंदर आणि आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या लग्नात नवरी म्हणून तुमच्या आईचे अथवा आजीचे जुन्या डिझाईनचे दागिने हे तुमच्या साडीवर खूपच आकर्षक दिसतील. त्याशिवाय ते अत्यंत मौल्यवान असतील. तसंच तुमच्या आयुष्यभरासाठी आठवण म्हणून हे दागिने कायम राहतील. तुमचे हे दागिने अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतील.
मांगटिका आवडतो का?
मांगटिका अर्थात बिंदी तुम्हाला आवडते का? तुम्हाला मिनिमल लुक हवा असेल तर तुम्ही नेकलेस न घालता, कानातले आणि मांगटिका या दोन दागिन्यांचा वापर करावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतो. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील वेडिंग ग्लो (Wedding Glow) यामुळे अधिक उठून दिसतो. तुम्ही जर पेस्टल आऊटफिट्स घालणार असाल तर त्यावर रंगबेरंगी मांगटिका अधिक सुंदर दिसतो.
या सोप्या आयडियाजचा वापर करून तुम्ही तुमच्या लग्नात अत्यंत सुंदर दिसू शकता आणि भरजरी आणि जड दागिने घालून त्रास करून घेण्याची अजिबातच गरज नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक