ADVERTISEMENT
home / Fitness
घरी बसून मांड्या झाल्या असतील जाड तर फक्त 5 मिनिटं करा हा व्यायाम

घरी बसून मांड्या झाल्या असतील जाड तर फक्त 5 मिनिटं करा हा व्यायाम

साधारण महिन्यापासून आपण सगळेच घरीच आहोत. अनेकांचे घरी राहून काम सुरु आहे. घराबाहेर पडायचे नाही म्हटल्यावर घरचे काम- ऑफिसचे काम असे घरातल्या घरातच आपण सध्या आहोत. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आपण जास्तीत जास्त वेळ बसून काम करत आहोत. अशावेळी महिलांना वजन वाढीचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. महिलांमध्ये शरीराचे वाढलेले वजन हे नितंब आणि मांड्यांमध्ये दिसून येते. या मांड्या जास्त वाढल्या की, तुम्हाला चालताना याचा त्रास होतो. घरी बसून तुमच्याही मांड्या अशात जाड दिसू लागल्या असतील तर तुम्ही फक्त दिवसातील 5 मिनिटं काढा आणि आम्ही सांगतो तो सोपा व्यायाम करा. अगदी गाणी ऐकत ऐकतही तुम्हाला हा व्यायाम करता येईल. शिका मांडीची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

अगदी आठवडाभरात असे कमी करा मांडी आणि नितंबावरील फॅट

प्ली स्कॉट्स ( Plie squats)

Plie squats

shutterstock

ADVERTISEMENT

 दोन पायांमध्ये अंतर घ्या. पायाचे समोरच्या दिशेला असून द्या. कमरेवर हात ठेवून तुम्हाला स्कॉट्सप्रमाणे खाली बसायचे आहे. असे करताना तुम्हाला पूर्ण खाली बसायचे नाही. तर तुमच्या नितंबावर आणि मांड्यावर ताण येईल एवढे बसायचे आहे. असे करताना तुम्हाला कंबरेच्या खाली ताण येणेही अगदी स्वाभाविक आहे. सगळ्यात आधी 10  प्ली स्कॉट्सने सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही हे स्कॉट्स वाढवू शकता. पण जर तुम्हाला हा व्यायाम करुन काहीच बदल जाणवत नसेल याचा अर्थ तुमच्या शरीराला याची सवय झाली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यायामप्रकार एक दिवस आड करा. 

प्ली स्कॉट्चा वेगळा प्रकार (High intensity plie squats)

High intensity plie squats

shutterstock

आता हा प्रकार प्ली स्कॉट्सचाच एक प्रकार आहे. तुम्हाला अगदी तसेच तुमच्या पायांमध्ये अंतर घ्यायचे आहे. आता तुम्हाला नमस्कार करुन अगदी खाली बसायचे आहे. पायांमध्ये जितके जास्त अंतर घ्याल तितकाच तुम्हाला याचा परिणाम जाणवेल. आता खाली बसताना तुम्हाला अगदी थोडे थोडे स्वत:ला वर उचलायचे आहे. असे करताना तुम्हाला मांड्याचा आत आलेला ताण अगदी सहजच जाणवेल. तुम्हाला जितका वेळ स्वत:ला असे रोखून धरणे शक्य आहे. तितके तुम्ही करा. हा व्यायाम तुमच्या मांड्यावरील अतिरिक्त मासं नक्कीक कमी करते.

ADVERTISEMENT

 

लेग सीझर (Leg scissor)

Leg scissor

shutterstock

आता जर तुम्ही फारच आळशी असाल तर तुम्ही झोपून हा व्यायाम करु शकता. तुम्हाला तुमची पाठ टेकवायची आहे. पाय 90 अंशावर वर उचलून तुम्हाला ते आत बाहेर करायचे आहे. तुम्ही तुमचा पाय जितका स्ट्रेज करु शकता तितका तुम्हाला करायचा आहे.  यामुळेही तुमच्या मांड्याच्या आत ताण आलेला तुम्हाला जाणवेल. 

ADVERTISEMENT

प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

स्पॉट जॉगिंग (Spot jogging)

आता तुम्हाला जर बाहेर जाणे शक्य नसेल तर तुम्ही एकाच ठिकाणी उभे राहून स्पॉट जॉगिंग अगदी आरामात करु शकता. स्पॉट जॉगिंग हा एक प्रकारे कार्डिओ व्यायाम प्रकार आहे. यामुळेही तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि तुमच्या मांड्यांवरील अतिरिक्त फॅटही कमी होते. 

आता घरच्या घरी एकाच जागी राहून तुम्ही हे व्यायाम करु शकता आणि तुमच्या मांड्यावरील अतिरिक्त फॅट कमी करु शकता. 

   तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर (Dressing Tips In Marathi)

ADVERTISEMENT
15 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT