ADVERTISEMENT
home / फॅशन
उन्हाळ्यात हे 5 कपडे तुम्हाला ठेवतील कुल आणि ट्रेंडी

उन्हाळ्यात हे 5 कपडे तुम्हाला ठेवतील कुल आणि ट्रेंडी

उन्हाळ्यात काय घालू  आणि काय नको असं होऊन जातं. रोजच कॉटनचे कपडे घालायचे म्हणजे इस्त्री आली. बरं सगळेच कॉटनचे कपडे ट्रेंडी लुक देतील असेही नाही.आता उन्हाळ्यात तुम्हाला तुमच्या फॅशनला कोणत्याच कारणाने ब्रेक लावायचा नसेल तर आम्ही तुम्हाला आज कपडयांचे 5 असे पर्याय देणार आहोत.ज्या कपड्यांना फार इस्त्री करण्याची गरज नाही. शिवाय तुम्हाला तुमचा लुक देखील कुठेही कॉम्प्रोमाईज करावा लागणार नाही.

वेगवेगळ्या 5 प्रकारात नेसा साडी 

  •  सेक्सी मॅक्सी ड्रेस (Sexy maxi dress)

summerdress 1

सध्या मॅक्सी ड्रेसची खूप चलती आहे. कॉटन, होजिअरी अशा दोन्ही मटेरिअलमध्ये हे ड्रेस मिळतात. हा ड्रेस म्हणजे एक प्रकारचा थ्री फोर्थ लेंथ किंवा फुल लेंथचा लुझ गाऊन. गेल्या वर्षी हा प्रकार बाजारात खूप आला असला तरी यंदा त्याची अधिक चलती पाहायला मिळत आहे. यात व्हरायटी देखील आहे. कॉलर नेक, थ्री फोर्थ हॅण्ड आणि कमरेकडे अधिक बारीक चुण्या आणि त्यावर छान असा बारीक बेल्ट अशा प्रकारातले मॅक्सी ड्रेस तुम्हाला इंडो- वेस्टर्न लुक देतात. या शिवाय स्लीवलेस, सिंग्लेट, ऑफ शोल्डर अशा प्रकारांमध्येही हे मॅक्सी ड्रेस उपलब्ध आहेत. शिवाय यामध्ये इतके सुंदर आणि ब्राईट रंग यात असतात की, तुम्हाला ते आवडल्यावाचून राहणार नाही.

ADVERTISEMENT

शिवाय तुमच्या बजेटमध्ये हे ड्रेस येतात. अगदी 1000 रुपयांच्या आत तुम्हाला हे ड्रेस मिळू शकतात.

आता तुम्ही त्यावर हेअरस्टाईलच्या बाबतीत साशंक असाल तर तुम्ही लुझ वेणी, हाय पोनी, सागरचोटी असे काही प्रकार चांगले वाटू शकतात. याशिवाय तुम्ही कानात झुमके घालू शकता आणि पायात कोल्हापुरी किंवा मोजडी घालून मस्त लुक मिळवू शकता.

जर तुम्हाला तुमच्या कमी उंचीमुळे हा ड्रेस कसा वापरु असे वाटत असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही थोड्या कमी लेंथचे मॅक्सी ड्रेस घ्यायला काहीच हरकत नाही.

वाचा – समर टॉपचं कलेक्शन

ADVERTISEMENT
  •  वाईड लेग पँटस आणि क्रॉप टॉप (wide leg pants and crop top)  

    summerdress 2 

तुम्ही रोज जीन्स घालून कंटाळला असाल तर तुम्ही हा एक पर्याय उन्हाळ्यात वापरुन पाहू शकता तो म्हणजे वाईड लेग पँटस आणि क्रॉप टॉपचा.  या पँटस कॉटन मटेरिअलमध्ये नाही तर होजिअरी आणि मिक्स मटेरिअलमध्ये मिळतात. यांना इस्त्री करावी लागत नाही.

यावर तुम्ही क्रॉप टॉप घालू शकता.

जर तुम्ही प्रिंटेट किंवा लायनिंगच्या पँट घेणार असाल तर त्यावर प्लेन क्रॉप टॉप घ्या.

यातही तुम्हाला कमी उंचीमुळे ही पँट कशी घालू असे वाटत असेल तर  तुम्ही थोड्या कमी घेर असलेल्या कमी उंचींच्या पँट घेऊ शकता.

ADVERTISEMENT

तुमच्या वॉर्डरोबमध्ये डेनिमचे हे प्रकार असायलाच हवे. 

  •  लखनवी कुडते (Laknavi kurta)

summerdress 3

Also Read About 12 Different Dress Pattern You Can Make From Old Saree In Marathi

जर तुम्हाला वेस्टर्न आऊटफिटमध्ये फार रस नसेल तर तुम्ही लखनवी कुडते वापरु शकता. हा पण त्याला इस्त्री करण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा. छान वेगवेगळ्या रंगाचे लखनवी कुडते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये घ्या. जीन्स आणि टिपिकल पायजम्याऐवजी तुम्ही लेगिंग्ज किंवा होजिअरी टाईटस वापरु शकता त्या खूप कम्फर्टेबल वाटतात.

ADVERTISEMENT

हे तुम्हाला अगदीच साधे वाटत असेल तर लखनवी कुडत्यांवर तुम्ही ऑक्सडाईज  कानातले आणि गळ्यातले घालू शकता. त्यावर छान सिल्व्हर कोल्हापुरी चांगल्या दिसतात.

  •  डेनिम स्कर्ट (Denim skirt)

    summerdress 4

जर तुम्हाला आणखी छान मोकळ- ढाकळं घालायची इच्छा असेल तर हल्ली डेनिमचे पातळ स्कर्ट आले आहेत. हे स्कर्ट ए लाईन स्कर्टसारखे असतात. यावर तुम्ही छान प्लेन टिशर्ट घातलं आणि ते टक इन केलं तर छान दिसू शकेल.

त्याला थोडा आणखी चांगला लुक देण्यासाठी तुम्ही त्यावर व्हाईट कलरचे स्निकर्स घालू शकता.

उंची कमी असली म्हणून काय झाले?तुम्हीही करु शकता फॅशन फॉलो करा या टीप्स

ADVERTISEMENT
  •  एलाईन ड्रेस (Aline dress)

summerdress 5
उन्हाळ्यात तुम्हाला ट्रेंडी दिसण्यासाठी एलाईन प्रकारातील ड्रेस घालू शकता. ए लाईन ड्रेस अगदी कोणत्याही दिवशी कधीही घालण्यासारखे असतात.

कम्फर्टेबल असल्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात हे ड्रेस सुपर कुल तर ठेवतात. शिवाय ट्रेंडीसुद्धा

 *आज आम्ही तुम्हाला 5 असे प्रकार सांगितले जे तुम्ही ऑफिस, कॉलेज, एखादा कार्यक्रम अशा कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रसंगी तुम्ही हे कपडे वापरु शकता आणि उन्हाळ्यातही तुमची फॅशन सुरु ठेवू शकता

(फोटो सौजन्य- Instagram)

ADVERTISEMENT

देखील वाचा – 

तुमच्या वॉर्डरोबसाठी ट्रेंडी क्रॉप टॉप्स – Trendy Crop Top Designs (2020)

10 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT