ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
beauty tips

थंडीत त्वचेला येत असेल खाज आणि होत असेल लालसर तर वापरा सोप्या टिप्स

थंडीमध्ये आपल्या सगळ्यांनाच त्वचा कोरडी पडण्याचा आणि त्वचेला खाज येण्याचा त्रास होत असतो. थंडीच्या दिवसात त्वचा अधिक संवेदनशील होते. त्यामुळे लालसर होणे आणि त्वचेला खाज येणे या समस्या होतातच. त्वचा लासर होणे, त्वचेवर काही ठिकाणी क्रॅक्स येणे, त्वचेवर खाज येणे या थंडीच्या दिवसात अत्यंत सामान्य समस्या आहेत. त्यामुळे थंडीच्या दिवसात त्वचेला खाज येत असेल अथवा त्वचा लालसर होत असेल तर वापरा सोप्या टिप्स. आपल्या त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स. 

मॉईस्चराईजर कधी लावाल?

थंडीच्या दिवसात तुम्हाला वेगळ्या मॉईस्चराईजरची गरज भासते आणि काही व्यक्तींच्या त्वचेसाठी केवळ ग्लिसरीन, विटामिन ई, कोल्ड क्रिम अशा गोष्टींचा जास्त परिणाम होतो. 

मॉईस्चराईज करण्याची योग्य पद्धत – 

  • आंघोळ केल्यानंतर तुम्ही त्वरीत त्वचेवर मॉईस्चईजर लावा. तुम्ही अगदी कोरड्या त्वचेवर लावले तर हे नीट अब्जॉर्ब होऊ शकत नाही आणि स्किन सेल्समध्ये मॉईस्चर लॉक होऊ शकत नाहीत
  • तुम्ही तुमचे फेस ऑईल आणि बॉडी ऑईल दोन्ही नीट तपासून घ्या. हे दोन्ही एकच असू शकतात. काही लोकांना वाटते की, वॉटर बेस्ड ऑईल्स त्यांच्या त्वचेला अधिक कोरडे करतात. मात्र असे अजिबात नाही 
  • तुम्हाला नैसर्गिक आणि कोल्ड प्रेस्ड ऑईल निवडणे अधिक चांगले ठरते 

आंघोळ करताना या गोष्टींकडे लक्ष द्या 

बाहेर थंडी असल्यावर नेहमीच तुम्हाला अधिक गरम पाण्याने आंघोळ करण्याची इच्छा असते. पण हे त्वचेसाठी योग्य नाही. जास्त गरम पाण्याने जर आंघोळ केली तर त्वचा अधिक कोरडी होती. त्यामुळे त्वचेवरील एसेन्शियल ऑईल निघून जाते. तुमची त्वचा अधिक लालसर आणि खाज येण्याजोगी यामुळे होते हे लक्षात घ्या. कोमट पाण्याने आंघोळ करणे अधिक चांगले आहे. 

योग्य हायड्रेशन हवे 

अधिकतम लोकांचे म्हणणे असते की, थंडीमध्ये त्यांना कमी तहान लागते आणि हे खरंदेखील आहे. उन्हाळ्याच्या दिवसांपेक्षा कमी प्रमाणात थंडीच्या दिवसात पाणी प्यायले जाते. पण याचा अर्थ असा नाही की, आपल्या त्वचेला हायड्रेशन नको. थंडीमध्ये हवादेखील कोरडी होते आणि त्वचेमधून आपण मॉईस्चर नाही घेऊ शकत. अशामध्ये पाणी पिणे अधिक गरजेचे असते. पाणीच आपल्या त्वचेचे हायड्रेशन योग्य राखण्यास मदत करते. 

ADVERTISEMENT

थंडीमध्ये कपड्यांची घ्या काळजी 

त्वचेला खाज येण्याचे मुख्य कारण म्हणजे थंडीमधील कपडे. थंडीच्या वेळी कपड्यांमुळे अंगाला घर्षण होते आणि त्यामुळे त्वचेवर खाज जास्त प्रमाणात येते. आपल्या वॉर्डरोबमधून असे कपडे तुम्हाला बाजूला ठेवावे लागतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला खाज येते. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी नैसर्गिक, श्वास घेता येतील असे कपडे घालणे योग्य ठरते. तुम्ही असे कपडे घाला ज्याने तुमची त्वचा अधिक मुलायम होईल आणि कमी संवेदनशील राहील. त्वचेसाठी नेहमीच मुलायम कपडे वापरावे. 

व्यायाम आणि मसाज 

थंडीत तुम्ही सकाळी उठून व्यायाम करणे तसं तर कठीणच काम आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही हे सर्व सोडून द्याल. व्यायामामुळे तुम्हाला आरोग्य निरोगी ठेवणे अधिक सोपे जाते तसंच यामुळे रक्तप्रवाह वाढतो. यामुळे आपली त्वचा अधिक चांगली होते आणि त्वचेवर लालसरपणा येणे आणि खाज येणे अशी समस्या होत नाही. 

या गोष्टींची घ्या काळजी 

  • ओले कपडे जास्त वेळ घालू नका आणि घामाने भिजलेले कपडेही जास्त वेळ अंगावर ठेऊ नका. लवकरात लवकर बदला 
  • तुम्हाला शरीरात अधिक कोरडेपणा जाणवत असेल तर नियमित ऑईल मसाज करत जा
  • तुमच्या शरीराला एखादी गोष्ट सूट होत नसेल तर वेळीच बदला. थंडीत आपली त्वचा अधिक संवेदनशील होते त्यामुळे केमिकलयुक्त उत्पादनाचा वापर तुमची समस्या वाढवू शकते. याबाबत काळजी घ्या 
  • तुमची त्वचा सतत जळजळत असेल तर डॉक्टरांना वेळीच संपर्क साधा. कारण कदाचित त्वचेला अलर्जी झाली असेल अथवा त्वचेवर रॅश येत असतील तर वेळीच काळजी घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT