ADVERTISEMENT
home / Weight Loss
सर्किट व्यायाम आणि योगा करुन करा पोट कमी

सर्किट व्यायाम आणि योगा करुन करा पोट कमी

पोट कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही केल्या पोट कमी होत नाही ही जर तुमची तक्रार असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट असा उपाय आम्ही शोधून काढला आहे. सर्किटपद्धतीने व्यायाम करुन तुम्हाला तुमचे पोट कमी करता येऊ शकते. हा व्यायाम म्हणजे हाय डेन्सिटी असा व्यायाम असून साधारण 30 मिनिटं जरी तुम्ही हा व्यायाम केला तरी देखील तुमची चांगली दमछाक होऊ शकते. चला जाणून घेऊया हा सर्किट व्यायाम नेमका आहे तरी काय?

व्यायामानंतर कधीही खाऊ नका हे पदार्थ सुटेल पोट

करा वॉर्म अप 

कोणत्याही व्यायामाची सुरुवात करण्याआधी तुम्हाला शरीर मोकळे करायचे असते. त्यालाच आपण वॉर्म अप असे म्हणतो.वॉर्म अप करण्यासाठी तुम्हाला हात- मान आणि पायांचा व्यायाम करायचा असेल. एका जागी उभे राहून तुम्हाला थोडी रनिंग करायची आहे. त्यानंतर जंपिग जॅक्स करायचे आहे. त्यानंतर स्टँडिंग मार्च करुन तुम्हाला शरीर मोकळे करायचे आहे. या पद्धतीने वॉर्म अप झाल्यानंतरच तुम्हाला कोणताही व्यायाम करायला घ्यायचा आहे.आता पुढे काही मॉर्डन व्यायाम आणि योगा करायला घ्यायचा आहे. 

ADVERTISEMENT

त्रिकोणासन

कंबरेच्या आजुबाजूची चरबी घालवण्यासाठी त्रिकोणासन हे अगदी उत्तम असे आसन आहे. या आसनामध्ये तुमच्या कंबरेवर ताण येतो. यामध्ये गुडगे दुमडून चालत नाही. तुमचा पाय जितका सरळ असेल तितके या आसनामध्ये तुमच्या पोटावर ताण येते. त्रिकोणासन हे आसन तुम्ही साधारण 30 सेंकदासाठी पकडून ठेवा. त्यानंतरच तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल.त्यामुळे त्रिकोणासन तुम्ही अगदी रोज करा. 

पोट जड झाल्यासारखे वाटत असेल तर प्या हे पाचक ड्रिंक्स

क्रंचेस 

पोटासाठी असलेला आणखी एक व्यायाम म्हणजे क्रंचेस. हा व्यायाम तुम्हाला उभ्या उभ्या करता येतो. त्यामुळे पोटावर चांगलाच ताण येतो. हा व्यायाम करताना तुम्हाला दोन पायात अंतर घेऊन उभे राहा. हात डोक्यामागे ठेवून त्यानंतर तुम्हाला पोटातून क्रिसक्रॉस वाकायचे आहे. असे तुम्हाला जितके जमेल तितके करायला काहीच हरकत नाही. हा व्यायाम प्रकार हा अगदी कोणालाही करणे शक्य असते. 

ADVERTISEMENT

साईड्स 

पोटासाठी असलेला आणखी एक व्यायाम म्हणजे साईड्स. हा व्यायाम प्रकारही तुम्हाला वजनाच्या मदतीने किंवा वजन नसल्यास असाच करता येतो.  दोन पायात अंतर घेऊन तुम्हाला एका बाजूला वाकायचे आहे. असे दोन्ही वाकून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे.  त्यामुळे तुमच्या कंबरेवर चांगलाच ताण येतो. इतकेच नाही तर हा ताण तुम्हाला तुमच्या पाठीवरही जाणवून लागतो. 

व्यायामाचे हे सर्किट तुम्हाला करत राहायचे आहे. तुमचा स्टॅमिना जेवढा असेल तेवढा वेळ तुम्हाला ही सायकल रिपीट करायची आहे. त्यामुळे तुमच्या पोटात आणि कंबरेत तुम्हाला फरक झालेला नक्कीच जाणवेल .

हे पदार्थ खाणं टाळलंत तर आपोआप कमी होईल पोट

ADVERTISEMENT
12 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT