भारतात सर्वाधिक पदार्थ जर काही खाल्ला जात असेल तर तो आहे डाळ – भात अर्थात आमटी भात (Dal Rice). प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने डाळ भात बनविण्यात येतो. पण रोज एकाच पद्धतीने आमटी अर्थात डाळ खाऊन नक्कीच तुम्हाला कंटाळा येत असेल. तुम्हाला रोज वेगवेगळ्या पद्धतीची अथवा विभिन्न प्रकारच्या आमटी अधिक चविष्ट बनवायची असेल तर आम्ही तुम्हाला 5 सोप्या टिप्स या लेखातून देणार आहोत. रोज डाळ भात खाताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने ट्विस्ट करून नक्कीच त्याला वेगळी चव देऊ शकता. तुम्हाला रोज डाळ भात खायला आवडत असेल तर 5 वेगळ्या हॅक्स तुम्ही वापरून पाहा.
1. डाळीला द्या लसणीचा तडका
बऱ्याचशी घरांमध्ये डाळ अथवा आमटी बनवताना लसणीची फोडणी देण्यात येतेच. लसणीची फोडणी ही डाळीला चव आणण्याचा अतिशय सोपा उपाय आङे. पण तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अजून एका पद्धतीने तुमच्या डाळीला फोडणी देऊ शकता.
- डाळ शिजवताना तुम्ही त्यात 2 पाकळ्या लसूण, 1 कापलेली हिरवी मिरची आणि चिमूटभर हिंग घाला
- तसंच त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आणि मीठ मिक्स करा
- असं केल्यामुळे तुमच्या डाळीला लसणीचा एक वेगळा स्वाद प्राप्त होतो आणि हिंगाचाही वास लागतो. त्यामुळे लसणीची फोडणी वरून द्यायची गरज भासत नाही आणि अतिरिक्त तेलही पोटात जात नाही. जेणेकरून वजन न वाढण्यासाठी याचा फायदा मिळतो
- ही आमटी तयार झाल्यावर यात 1 चमचा तूप मिक्स करा आणि याचा चविष्ट स्वाद घ्या
2. फोडणीला द्या वेगळा ट्विस्ट
प्रत्येक डाळीचा स्वतःचा असा स्वाद असतोच. पण त्याचबरोबर त्याला देण्यात येणाऱ्या फोडणीचाही स्वाद असतो. तुम्ही नेहमी त्याच त्याच पद्धतीने फोडणी देत असाल तर जरा थांबा. आमटी बनवताना तुम्ही वेगवेगळ्या फोडणीच्या पद्धतीचा वापर करा. एखाद्या दिवशी जिरे, दुसऱ्या दिवशी मोहरी, तिसऱ्या दिवशी कडपत्ता, मेथीचे दाणे, लाल मिरची अथवा हिरवी मिरची याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून फोडणी द्या. या पदार्थांच्या फोडणीनुसार त्याचा स्वाद बदलतो. तेलापेक्षा तुपाचा वापर केल्यास, अधिक चांगले. चव अधिक चांगली लागते.
3. भात होईल मोकळा
तुम्हाला मोकळा भात हवा असेल आणि जास्त स्टार्च नको असेल अर्थात तांदळाच्या पाण्याचा अतिरिक्त साठा नको असेल तर तुम्ही या खालील टिप्स नक्की फॉलो करा. यामुळे भाताचा खाताना घासही लागणार नाही
- तांदूळ व्यवस्थित धुवा
- उघड्या भांड्यात बाहेर भात शिजवणार असाल तर त्यात सारखा चमचा ढवळू नका
- तांदूळ शिजवताना त्यात तेलाचे दोन थेंब घाला. या दोन थेंबामुळे तुमचा भात अधिक मोकळा होता. तसंच तांदूळ जाडा असेल तर तेलामुळे चिकटत नाही
4. भाताला येईल वेगळा स्वाद
तुम्हाला भाताला वेगळा स्वाद हवा असेल तर तुम्ही तांदूळ धुवा आणि त्यात 1 चमचा तूप घ्या (घरगुती तूप खाण्याचे फायदे अधिक होतात) आणि 2 लवंग त्यात भाजा. केवळ 1 मिनिट्स भाजून घ्या आणि त्यावर धुतलेला तांदूळ घाला. त्यानंतर तुम्ही नियमित ज्याप्रमाणे तांदूळ शिजवता तसाच शिजवा. यामुळे तांदूळ लवकर शिजतो आणि याचा स्वादही अधिक चांगला होतो.
5. तांदळात पाणी जास्त झाल्यास
तांदळामध्ये पाणी जास्त झाले असेल आणि खाण्याच्या लायकीचा वापत नसेल तर शिजविण्यासाठी एका ठिकाणी ब्रेडचा स्लाईस त्यामध्ये घाला. तांदळातून अधिक पाणी काढून घेण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर तांदूळ जास्त शिजवावा लागत नाही.
या पाचही पद्धती तुम्हाला नेहमीचा डाळ भात अधिक चविष्ट आणि अप्रतिम बनविण्यास मदत करतात. तुम्ही जर कधी पहिले याचा उपयोग केला नसेल तर नक्की करून पाहा आणि नियमित डाळ भात बनवा अधिक चविष्ट.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक