ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
काही मिनिट्समध्ये दिसा बारीक, सोप्या ट्रिक्स आणि टिप्स

काही मिनिट्समध्ये दिसा बारीक, सोप्या ट्रिक्स आणि टिप्स

वजन घटविणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही आणि ते पण अगदी त्वरीत तुम्हाला स्लिम अर्थात बारीक लुक (Slim Look) हवा असेल तर शक्यच नाही. पण काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही हा स्लिम लुक नक्कीच मिळवू शकता. आश्चर्य वाटलं ना? पण होय तुम्ही आता पटकन अशा काही टिप्स वापरून बारीक दिसू शकता. काही कमाल टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्ही या टिप्सचा नक्की वापर करा आणि दिसा स्लिम ट्रीम. जाणून घेऊया काय आहेत या अफलातून टिप्स. 

स्लिम लुकसाठी अशा तऱ्हेने घाला कपडे

स्लिम लुकसाठी अशा तऱ्हेने घाला कपडे

मिनिटांमध्ये दिसायचं असेल बारीक तर तुम्हाला सर्वात आधी आपल्या कपड्यांकडे लक्ष द्यावं लागतं. आपल्या वॉर्डरोबमधले असे काही आऊटफिट्स ठेवा जे तुम्हाला अधिक स्लिमर लुक देतील. उदाहरणार्थ काळा, गडद निळा रंगाचे काही प्लेन कपडे तुम्ही घाला. तसंच तुम्ही शेपवेअरचाही वापर करा. याचा वापर करून तुम्ही मिनिट्समध्ये स्लिम लुक मिळवू शकता. तुमची अपर बॉडी जर जाड असेल तर तुम्ही गडद रंगाचा व्ही नेव्ही लाईनवाला टॉप नक्की घाला आणि जर तुमची लोअर बॉडी जाड असेल तर तुम्ही गडद रंगाची जीन्स आणि स्कर्ट याचा वापर करा. 

स्लिम लुकसाठी करा अशी हेअर स्टाईल

स्लिम लुकसाठी करा अशी हेअर स्टाईल

ADVERTISEMENT

तुम्हाला माहीत आहे का? हेअर कटमुळेदेखील तुमचा चेहरा बारीक दिसू शकतो अथवा तुम्ही बारीक दिसू शकता. हो हे खरं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा केस कापायचे असतील तेव्हा तुम्ही पार्लरमध्ये आपल्याला नक्की कसा लुक हवा आहे ते सांगा. बारीक आणि तरूण दिसण्यासाठी तुम्ही जास्त कुरळे केस अथवा वेव्ही हेअरकट ठेऊ नका. केस कापण्यापेक्षा तुम्ही केस स्ट्रेटनिंग करून घ्या. स्ट्रेटनिंगमुळे चेहरा अधिक बारीक दिसण्यास मदत मिळते. 

असा करा मेकअप

मिनिट्समध्ये तुम्हाला जर स्लिम लुक हवा असेल तर तुमचे मेकअप कौशल्यही यामध्ये तुमची मदत करू शकते. हो मेकअपच्या वेगवेगळ्या शेड्स, मेकअप ब्रशचा वापर करून तुम्ही फेस कट करून आपला चेहरा बारीक दाखवू शकता. तुमचा चेहरा गोल अथवा चौकोनी आहे तर मेकअप ब्रशच्या सहाय्याने तुम्ही चेहरा उभा अथवा अंडाकृती दाखवू शकता. तुम्ही योग्य मेकअप ट्रिक्स शिकून घ्या आणि मग आपल्या चेहऱ्याला योग्य बारीक लुक द्या. मिनिट्समध्ये तरूण आणि बारीक लुक देण्यासाठी तुम्ही मेकअप तज्ज्ञांकडून ट्रिक्स शिकून घ्या.

फेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim

अशा फुटवेअरचा करा वापर

योग्य शरीराची ठेवण आणि राहणीमान दाखविण्यासाठी तुम्हाला हिल्सचा वापर करून घेता येईल. तुम्ही हिल्स घालून नक्कीच अधिक बारीक आणि स्मार्ट दिसाल. स्लिम लुक हवा असेल तर वेज अथवा प्लॅटफॉर्म हील्सच्या ऐवजी पेन्सिल हिल्सचा वापर करा. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व अधिक चांगले दिसावे यासाठी योग्य फुटवेअरचा वापर करावा. 

ADVERTISEMENT

पोट असेल मोठं तर अशी करा साडी आणि लेहंग्याची स्टाईल, दिसाल बारीक

स्लिम लुकसाठी असे दागिने घाला

स्लिम लुक हवा असेल तर तुम्ही जाडसर दागिने घालणं शक्यतो टाळा. याऐवजी तुम्ही अगदी लाईटवेट आणि सिंगल लेअर दागिन्यांची निवड करा. जाडसर आणि मल्टीलेअर्ड दागिने घालून तुम्ही अधिक जाड दिसता. स्लिम लुकसाठी कमीत कमी दागिने घाला आणि अगदी बारीक कानातले अथवा गळ्यातले तुमच्यासाठी योग्य आहे.

डाएट न करताही दिसायचं असेल लग्नात बारीक, तर वापरा या सोप्या ट्रिक्स

स्लिम लुकसाठी स्मार्ट टिप्स

स्लिम लुकसाठी स्मार्ट टिप्स

ADVERTISEMENT

जर तुम्ही एखाद्या पार्टीसाठी वन पिस ड्रेस निवडला असेल तर डबल अथवा मल्टी कलर ड्रेस निवडू नका. सिंगल कलर अथवा गडद रंगाचा ड्रेस तुम्ही निवडा. यामध्ये तुमच्या शरीराची जाडी दिसून येत नाही. प्लस साईझ असणाऱ्या महिलांनी काळा, गडद निला, डीप रंग वापरून आपले स्टाईल स्टेटमेंट बनवावे. तसंच पार्टीत जाताना गळ्यातले, कानातले, बॅग इत्यादी बऱ्याच छानशा गोष्टी निवडाव्या. जेणेकरून तुमच्या जाडीकडे लक्ष न जाता तुम्ही घातलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. 

आम्ही सांगितलेल्या या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स वापरून पाहा. नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल आणि तुम्ही मिनिट्समध्ये नक्कीच बारीक दिसाल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT