पोट असेल मोठं तर अशी करा साडी आणि लेहंग्याची स्टाईल, दिसाल बारीक

पोट असेल मोठं तर अशी करा साडी आणि लेहंग्याची स्टाईल, दिसाल बारीक

आपण जी स्टाईल करतो तीच योग्य आहे असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं पोट मोठं असतं तेव्हा साडी नेसताना आणि लेहंगा घालताना स्टाईल करण्यात खूपच त्रास होतो. शरीराच्या बाकी भागवरील चरबी कदाचित चालून जाते. पण पोट मोठे असेल तर साडी अथवा लेहंगा हे कपडे कॅरी करताना त्याची स्टाईल योग्यरित्या होणे गरजेचे आहे. साडीमध्ये पोट बाहेर लटकलेले दिसत असेल तर नक्कीच ते आपल्यालाही आणि समोरच्या व्यक्तीला बघायलाही अतिशय वाईट दिसते. तुम्हाला एखाद्या लग्नाला अथवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर तुम्हाला स्टायलिश लुक करून जायला हवंच. पण त्यासाठी योग्य स्टाईल करणेही गरजेचे आहे. तुम्ही पोट मोठे असेल तर कशा रितीने साडी नेसावी अथवा लेहंगा कॅरी करावा याच्या काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही याचा वापर केल्यास, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.

लेहंगा आणि ब्लाऊजवर द्या विशेष लक्ष

पोट जर मोठे असेल अथवा साडी अथवा लेहंग्यामध्ये बाहेर दिसत असेल तर तुम्ही सर्वात जास्त  लक्ष द्यायला हवं ते ब्लाऊजच्या स्टाईलकडे. तुम्ही योग्य स्टाईलचा ब्लाऊज घातला तर साडीचा पदर कसाही असो तुमचे पोट नक्कीच लपले जाते. ब्लाऊजचे डिझाईन असे असायला हवे ज्यामध्ये तुमचे पोट लपेल जाईल आणि तुमच्या पोटावरून समोरच्या माणसाचे लक्ष विचलित होईल. यासाठी तुम्ही लेहंग्यावर असे वेगवेगळे ब्लाऊज घालून त्याचा वापर करून घेऊ शकता. 

 - केप ब्लाऊज
- स्लिट कुर्ती ब्लाऊज (लेहंग्यासह)
- पेपलम ब्लाऊज
- कॉर्सेट ब्लाऊज
- फुल लेंथ ब्लाऊज (पूर्ण हाताचा आणि कमरेपर्यंत लांबी असणारा)

अशा ब्लाऊजसह तुम्ही साडी अथवा लेहंगा घातला तर तुमच्या मोठ्या पोटाकडे लक्ष जाणार नाही. तसंच तुम्ही गळाही जास्त खोल ठेऊ नका. यामुळे तुम्ही बारीक दिसाल.

स्टायलिश जॅकेटची होईल मदत

पोट मोठं असेल तर स्टायलिश जॅकेटचा वापर ही सर्वात उत्तम टीप आहे. तुमचे पोट सुटले असेल तर तुम्ही साडी अथवा लेहंग्यावर स्टायलिश जॅकेट घाला. हे जॅकेट लांब अथवा शॉर्ट कसेही असू शकते. तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या साडी अथवा लेहंग्यानुसार तुम्ही हे जॅकेट घाला. जॅकेट असेल तर तुम्ही लेहंग्यावर ओढणी घेण्याचीही गरज नाही. एखादे मल्टीकलर (रंगबेरंगी) जॅकेट तुम्हाला पोट लपविण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

फ्री स्टाईल दुपट्टा

तुमचे पोट खूपच मोठे असेल आणि ब्लाऊज अथवा जॅकेटचाही उपयोग होणार नसेल तर तुम्ही तुमच्या ओढणीचा वापर करून स्टाईल करू शकता. तुम्ही साडीसारखा पदर जर ओढणीच्या मदतीने घेतला तर ही एक वेगळी स्टाईलही होईल आणि तुमचे पोटही दिसणार नाही. साडी असो वा लेहंगा असो तुम्ही फ्री स्टाईलनेच ही ओढणी घ्या हे लक्षात ठेवा. फ्लोईंग स्टाईल ओढणी आणि साडीच्या पदराने तुम्ही तुमचे पोट लपवू शकता. तुमच्या केवळ पोटाची वाढ झाली असेल तर ती ट्रिक नक्कीच तुमच्या मदतीला येईल. तसंच तुम्ही साडीचा पदर काढताना पोटाजवळून घट्ट ओढून घ्या. जेणेकरून पोट अधिक झाकले जाईल.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

सेफ्टी पिन्सचा करा वापर

Beauty

WANDERLUST CHROME MATTE NAIL POLISH - CANCUN

INR 290 AT MyGlamm

तुम्ही जर एखादा भारतीय कपड्याचा वापर करणार असाल तर सेफ्टी पिन्स महत्वाच्या आहेत. साडी आणि पंजाबी ड्रेस अथवा लेहंग्याचा वापर करताना सेफ्टी पिन्सचा खूपच उपयोग होतो. पोटाजवळून जेव्हा पदर घेतो तेव्हा ब्लाऊज आणि साडीच्या पदराला पिन लावली तर पोट झाकले जाते. तसंच तुम्हाला लेंहग्यावर ओढणी घ्यायची असेल तरीही तुम्ही सेफ्टी पिन्सच्या मदतीने ओढणी लाऊन व्यवस्थित पोट झाकून घेऊ शकता. ब्लाऊजसह तुम्ही पदर व्यवस्थित पिनअप केला तर तुमची साडीही सुटणार नाही आणि तुम्हाला त्रासही होणार नाही.

 

बेली बटणाकडे द्या लक्ष

तुमचे पोट सुटले असेल तर तुम्हाला बेली बटणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जर लेहंगा अथवा परकर बेली बटणाच्या खाली बांधले तर तुमचे पोट अधिक सुटलेले दिसेल. त्यामुळे पोटावर अगदी बेंबीवर तुम्ही परकर अ्थवा लेहंगा बांधा. यामुळे तुमच्या सुटलेल्या पोटाचा भाग हा परकराखाली लपला जाईल. जर लोअर बेली फॅट जासत असेल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.

 

केस मोकळे ठेवा

तुमचे केस मोठे असतील तर तुम्ही साडी अथवा लेहंग्यावर केस नेहमी मोकळे ठेवा. यामुळे तुमच्या पोटाकडे लक्ष न जाता तुमच्या केसांकडे लक्ष जाते आणि लक्ष वळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलकडेही लक्ष द्या. तसंच तुम्ही साडीवर एखादा बेल्टही वापरू शकता. जेणेकरून तुमच्या पोटाचा भाग अधिक मोठा दिसणार नाही. 

‘रंग माझा वेगळा' मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक