ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्यावरील केस हटवा ‘या’ 6 घरगुती उपायांनी

चेहऱ्यावरील केस हटवा ‘या’ 6 घरगुती उपायांनी

चेहरा हा प्रत्येकाला नितळच हवा असतो. चेहऱ्यावर जसे नको असतानाही डाग आणि पिंपल्स येतात त्याचप्रमाणे चेहऱ्यावर आलेले केसही नको असतात. अचानक चेहऱ्यावर केस दिसून लागले तर मूड ऑफ नक्कीच होतो. गालाच्या किनाऱ्यावर अथवा ओठांवर येणारे हे केस कोणालाही आवडत नाहीत. चेहऱ्यावर वॅक्सिंग अथवा थ्रेडिंग करून घेणं ही नक्कीच चांगली आयडिया नाही पण तरीही हे नको असलेले केस घालवण्यासाठी दुसरा काही पर्यायही दिसत नाही. पण त्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे करून तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले हे केस नक्कीच घालवू शकता आणि तुमचा चेहरा पुन्हा तितकाच चमकदार करू शकता. या उपायांनी तुम्हाला नक्कीच चेहऱ्यावर लवकर केस येणार नाहीत. 

घरगुती उपायांनी हटवा चेहऱ्यावरील केस – Facial Hair Removal At Home In Marathi

1. अंड्याचा मास्क वापरून पाहा (Egg Mask)

यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. कारण याचं सर्व सामान हे तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्येच मिळेल. 

ADVERTISEMENT

Step 1: अंड तोडून त्याचा सफेद भाग एका वाटीमध्ये घ्या

Step 2: यामध्ये एक चमचा साखर आणि अर्थ चमचा मक्याचं पीठ (corn-flour) मिसळा

Step 3: हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर केस असतील त्या ठिकाणी लावा

Step 4: 20-30 मिनिट्स हे चेहऱ्यावर सुकू द्यावं

ADVERTISEMENT

Step 5: कोणत्याही सुक्या अथवा रफ कपड्याने तुमचा चेहरा साफ करा आणि मग थंड पाण्याने धुवा

2. साखर आणि लिंबू (Lemon And Sugar)

2. साखर आणि लिंबू (Lemon And Sugar)

साखर आणि लिंबू आपल्या त्वचा आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे याचा वापर करावा. 

ADVERTISEMENT

Step 1: एका वाटीत पाणी घेऊन त्यात एक चमचा साखर घाला 

Step 2: साखर विरघळेपर्यंत चमच्याने हे पाणी ढवळत राहा

Step 3: साखर विरघळल्यावर यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घाला

Step 4: कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 

ADVERTISEMENT

Step 5: हे सुकण्यासाठी 20-30 मिनिट्स जाऊ द्या आणि मग चेहरा धुवा

चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा हा प्रयोग करा आणि आपल्या चेहऱ्यावरील केस हटवा

3. मसूर डाळ आणि बटाट्याचा मास्क (Masoor Dal and Potato Mask)

3. मसूर डाळ आणि बटाट्याचा मास्क (Masoor Dal and Potato Mask)

ADVERTISEMENT

मसूर डाळ आणि बटाट्याचा मास्क या दोन्ही वस्तू आपल्या स्वयंपाकघरात कायम असतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी याचा महत्त्वाचा उपयोग होतो. 

Step 1: एका वाटीत मसूर डाळ घेऊन ती रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा

Step 3: आता बटाटा किसून मॅश करून त्याची पेस्ट बनवा

Step 4: डाळ आणि बटाट्याच्या दोन्ही पेस्ट  एकत्र करा

ADVERTISEMENT

Step 5: या पेस्ट एकत्र केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा

Step 6: हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा

Step 7: 30 मिनिट्सपर्यंत हे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर हाताने अथवा कपड्याने हे काढून टाका

चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोन वेळा हा प्रयोग करा आणि चेहऱ्यावरून केस काढून टाका.

ADVERTISEMENT

4. तुरटी आणि गुलाबपाणी (Alum And Rose Water)

चेहऱ्यावर नको असलेले केस घालवण्यासाठी तुम्ही तुरटीची पावडर बनवा आणि त्यामध्ये गुलाबपाणी घाला. तुरटी चे फायदे बरेच आहेत. हे करण्यासाठी नक्की कोणत्या स्टेप्स करायच्या पाहूया – 

Step 1: एका वाटीत दोन मोठे चमचे गुलाबपाणी घ्या

Step 2: आता यामध्ये अर्धा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा

ADVERTISEMENT

Step 3: चमच्यामध्ये सॉल्युशन घेऊन बघा आणि खात्री करून घ्या की, तुरटी व्यवस्थित मिसळली आहे की नाही. 

Step 4: कापसाच्या मदतीने हे चेहऱ्याला लावा

Step 5: त्यानंतर 20 मिनिट्स ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा 

5. केळं आणि ओट्सचा स्क्रब – Banana And Oats Scrub

ADVERTISEMENT

5. केळं आणि ओट्सचा स्क्रब – Banana And Oats Scrub

Step 1: एक पिकलेलं केळं घ्या आणि ते नीट मॅश करा जेणेकरून त्याची पेस्ट होईल

Step 2: यामध्ये 2 चमचे ओटमील घाला

Step 3: ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिट्स चेहऱ्यावर तसंच राहू द्या

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरून केस काढून टाकण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता. 

6. बेसन, दूध, क्रिम आणि हळदीचं मिश्रण

6. बेसन, दूध, क्रिम आणि हळदीचं मिश्रण

हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरील नको असलेले केस तर निघून जातीलच पण तुमच्या चेहऱ्यावर चमकदेखील येईल. 

ADVERTISEMENT

Step 1: एका वाटीत अर्ध कप बेसन घ्या

Step 2: यामध्ये अर्धा कप थंड दूध मिसळा

Step 3: एक चमचा ताजं क्रिम आणि हळददेखील मिसळा 

Step 4: आता हे मिश्रण चेहऱ्यावर लाऊन 20-30 मिनिट्स ठेवा

ADVERTISEMENT

Step 5: हे मिश्रण सुकल्यावर हाताने रगडून काढा अथवा पाण्याने धुवा

चांगल्या परिणामांसाठी हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा आणि चेहऱ्यावरून केस हटवा

हेदेखील वाचा – 

चेहऱ्यावरील केस काढताय? मग माहीत करुन घ्या या महत्वाच्या गोष्टी

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक

 

 

ADVERTISEMENT
27 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT