बऱ्याच जणांना दाढी केल्यानंतर शेव्हिंग लोशन म्हणून तुरटीचा वापर केला जातो इतकीच माहिती असते. तसंच पाणी शुद्ध करण्यासाठीही तुरटीचा वापर कसा केला जातो याची माहिती बऱ्यापैकी लोकांना माहीत असते. पण त्वचा आणि आरोग्यासाठी तुरटी एका अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते हे फार कमी लोकांना माहीत आहे. दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी आहे. यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. आता तुम्हाला असाही प्रश्न उद्धवला असेल की, शरीरातील अन्य समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी तुरटीचा उपयोग करता येतो का? तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. तुरटी चे फायदे अनेक आहेत. या लेखातून तुरटी त्वचा आणि अन्य शारीरिक आरोग्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरते हे आम्ही सांगणार आहोत. पण त्याआधी आपण तुरटी म्हणजे काय आहे? हे जाणून घेणं आवश्यक आहे.
तुरटी हा एक रंगहीन रासायनिक पदार्थ आहे. जे दिसायला एखाद्या क्रिस्टलप्रमाणे असते. तुरटी चे रासायनिक नाव पोटॅशियम अल्युमिनिअम सल्फेट असं आहे. तर इंग्रजीमध्ये तुरटीला अलम असं म्हटलं जातं. मात्र तुरटीचे रासायनिक नाव जास्त प्रचलित आहे. अतिशय सामान्य दिसणारी ही तुरटी आरोग्यासाठी मात्र महत्त्वाची आहे. तुरटीचे अनेक प्रकार असतात. ते जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. तुरटी पाणी शुद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते. अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवण्यात आलं आहे की, पाण्यात जर खूपच कचरा अथवा गाळ झाला असेल तर पाण्यात तुरटी फिरवल्याने तो सर्व गाळ खाली जाऊन बसतो आणि पाणी स्चच्छ होते. तुरटीमध्ये असलेल्या पोटॅशियम अल्युमिनिअर सल्फेटची ही कमाल आहे. आता पाहूया तुरटीचे प्रकार.
तुरटी वापरायची म्हणजे नक्की कोणती वापरायची असेही प्रश्न अनेकांना उद्भवत असतात. तुरटीची योग्य निवड करण्यासाठी याच्या वेगवेगळ्या प्रकाराबाबतही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपण जाणून घेऊया तुरटीचे विभिन्न प्रकार -
1. पोटॅशियम अलम - पोटॅशियम अलम अर्थात पोटाश अलम अथवा पोटॅशियम अलम सल्फेट या तिन्ही नावाने ओळखण्यात येते. याचा वापर अनादी काळापासून करण्यात येत आहे. असं म्हटलं जातं की, 1500 इसवी सन पूर्वीपासून तुरटीचा उपयोग पाण्यातील घाण स्वच्छ करण्यासाठी करण्यात येतो आहे. तुरटीमुळे पाणी स्वच्छ होते.
2. अमोनिअम अलम - अमोनिअम अलम हा एक पांढऱ्या रंगाचा क्रिस्टलसारखा घट्ट पदार्थ आहे. तुरटीचा हा प्रकार सौंदर्य प्रसाधन अथवा व्यक्तीगत काळजी घेणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनांमध्ये करण्यात येतो. आफ्टर लोशन अथवा हाताशी संबंधित तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये या तुरटीचा उपयोग करण्यात येतो.
3. क्रोम अलम - क्रोम अलम हादेखील तुरटीचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये क्रोमिअम पोटॅशियम सल्फेट असते. हे क्रोमिअम एक रासायनिक तत्व असून यामध्ये पोटॅशियमचं डबल सल्फेट आहे. ज्याचा वापर चामड्याच्या वस्तू बनवण्यामध्ये करण्यात येतो.
4. अल्युमिनिअम सल्फेट - याचा वापर पेपरमेकरसाठी तुरटीच्या स्वरुपातच करण्यात येतो. पण टेक्निकली याकडे तुरटी म्हणून पाहिलं जात नाही.
5. सोडिअम अलम - हे एक कार्बनिक नसणारे तत्व आहे. याला सोडा अलम अशीही ओळख आहे. याचा उपयोग बेकिंग पावडर बनवण्यासाठी आणि काही पदार्थांमध्ये करण्यात येतो.
6. सेलेनेट अलम - तुरटीचा हा असा प्रकार आहे ज्यामध्ये सल्फरच्या जागी सेलेनियम असतात.
तुरटीचे काहीच फायदे आपल्याला माहीत असतात. पण आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी तुरटीचे अनेक फायदे होतात. पाहूया काय आहेत तुरटी चे फायदे
तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एका ग्लासात पाणी गरम करा आणि त्यात चिमूटभर मीठ आणि एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही या पाण्याचा वापर दातांसाठी करा.
जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा अथवा दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही आफ्टर शेव्ह, डिओ अथवा बॉडी लोशन अशा प्रकारेही वापर करू शकता. याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर शरीरावरील बॅक्टेरिया मरून दुर्गंधी कमी होते.
माऊथवॉश म्हणून तुरटी अत्यंत उपयोगी आहे. रोज जर तुम्ही तुरटीचा माऊथवॉश म्हणून उपयोग केला तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका तर मिळेलच. त्याशिवाय तुमच्या दातांचे आरोग्यही चांगले राहील. विशेषतः मुलांच्या ओरल हेल्थसाठी तुरटी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. मुलांना लहानपणापासूनच तुरटीच्या वापराची सवय लावल्यास, दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत.
तुरटी चे फायदे इतकेच नाहीत. तर तुम्हाला मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता.
शहरांमध्ये ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. खोकल्याची समस्या थांबवण्यासाठी फिटकरीचा वापर करा. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनशी संबंधित समस्यांशी तुरटी दोन हात करू शकते. तुरटीमुळे मुत्राशयमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला थांबवण्याचे काम करता येते. एखाद्या संक्रमणामुळे झालेला हा त्रास तुरटीमुळे बंद होऊ शकत. रक्तस्राव होणाऱ्या भागावर तुरटी प्रभावीपणे काम करते.
केसांसाठीही तुरटी अत्यंत उपयोगी आहे. केसांमध्ये ऊवा होणं ही शाळेत जाणाऱ्या विदार्थ्यांसाठी तर अगदी सामान्य समस्या आहे. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुरटीचा वापर करा.
शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली तर तुम्ही त्यावर तुरटीचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी करण्यास मदत मिळते. शरीरावर कोणतेही घाव, कापले असेल अथवा तोंड आले असेल तर लवकर भरण्याचं काम तुरटी करते. एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाव वा जखम लवकर भरेल.
तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील आणि सर्व उपाय करूनही पिंपल्स जात नसतील तर तुमच्यासाठी तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुरटीची पेस्ट करून तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला याचा लवकरच योग्य परिणाम दिसून येईल.
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका - घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही
तुरटीचा उपयोग बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि एजिंग पासून वाचण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, हे एखाद्या अँटिएजिंगप्रमाणे काम करते. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर तुरटीचा तुकडा पूर्ण फिरवा.
तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्चचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच त्वचा टोन करण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करण्यात येतो. चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी. त्वचा उजळण्यास मदत मिळते.
पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही.
तुरटीचा वापर कशासाठी करावा हे आम्ही तुम्हाला सांगितले. पण याचा वापर नक्की कसा करावा हेदेखील कळायला हवे. जाणून घेऊया तुरटीचा वापर कसा करावा
तुरटीमुळे अनेक फायदे होतात यामध्ये काहीच शंका नाही. याचा वापर आपण शरीराशी निगडीत समस्यांमध्ये करू शकतो. पण तुरटीच्या फायद्यासह याचे काही नुकसानही आहे ज्याची आपण माहिती करून घ्यायला हवी. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा नक्कीच चांगला नसतो.
तुरटी आपण किती वेळा वापरू शकतो?
तुरटी आपण नक्की कोणत्या गोष्टीसाठी वापरतो आहोत यावर त्याचे वापरण्याचे प्रमाण अवलंबून आहे. सौंदर्य अथवा त्वचेसाठी याचा जास्तवेळा वापर करू नये. घावासाठी आपण दिवसातून तीन वेळा किमान वापरू शकतो. नक्की काय झाले आहे यावर तुरटीचा वापर आपण ठरवू शकतो.
त्वचा उजळवण्यासाी तुरटीचा उपयोग होतो का?
हो त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करून घेता येतो. तुरटीत असलेले गुणधर्म त्वचेवरील घाण काढून टाकण्यास आणि त्वचा उजळवण्यास मदत करतात.
तुरटीमुळे बॅक्टेरिया मरतात का?
एक ते दोन तासामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे काम तुरटी करते. यामध्ये असणारे अस्ट्रिन्जन्ट गुण हे बॅक्टेरियाला पूर्णतः मारून टाकण्याचे काम करते.
अंडरआर्म्ससाठी तुरटीचा वापर कसा करावा?
तुरटीची पावडर घेऊन त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट तुम्ही अंडरआर्म्सला लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अंडरआर्म्समधील केस काढून त्याला उजळवण्यासाठी तुरटी उपयोगी ठरते.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.