ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
जगातली अशी अतरंगी रेस्टॉरंट, जिथे न्यूड होऊन अथवा टॉयलेट सीटवर बसून खातात

जगातली अशी अतरंगी रेस्टॉरंट, जिथे न्यूड होऊन अथवा टॉयलेट सीटवर बसून खातात

हल्ली प्रत्येक गोष्टीत क्रिएटिव्हिटी आली आहे. पण ही क्रिएटिव्हिटी कोणत्या लेव्हलपर्यंत जाते याबद्दल तुम्ही विचारही करू शकत नाही. पण कोणत्याही गोष्टीला थोडं हटके बनवण्यासाठी हल्ली बरेच प्रयत्न केले जातात. तसं तर जगभरात अनेक चित्रविचित्र आणि अतरंगी रेस्टॉरंट आहेत. पण त्यापैकी अशी काही रेस्टॉरंट्स आहेत, ज्याच्या थीममुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली आहेत. आम्ही तुम्हाला इथे अशी काही रेस्टॉरंट्स सांगणार आहोत, जिथे अगदी हटके खाणं सर्व्ह करण्यात येतं. याबाबत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत!

1 – आईस रेस्टॉरंट, दुबई

Instagram

दुबईमधील बुर्ज खलिफा आणि इतर गोष्टींसाठी दुबई प्रसिद्ध आहेच. पण या ठिकाणी खूपच गरम होतं असं म्हटलं जातं आणि गरमीला मात देण्यासाठी दुबईमध्ये असं एक रेस्टॉरंट बनवण्यात आलं आहे, जे दुबईमधील एकमात्र बर्फाळ जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला अंटार्क्टिकाप्रमाणे थंडीचा अनुभव घेता येतो. ही जागा पूर्णपणे आर्टिफिशियल बर्फ आणि काचेने बनवण्यात आली आहे. इथलं तापमान हे कायम शून्यापेक्षाही कमी असतं आणि या ठिकाणी केवळ त्याच गोष्टी मिळतात ज्या बर्फापासून बनतात.

ADVERTISEMENT

2 – न्यूड रेस्टॉरंट, लंडन

Instagram

आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे वाचून थोडा धक्का बसेल किंवा आपण या गोष्टीचा विचारही करणार नाही की, सार्वजनिक ठिकाणी जाताना कपडे न घालता अर्थात न्यूड जेवण करायला जाऊ. तुम्हाला असा प्रश्नही पडेल की, कपडे न घालता कोणी जेवतं का? पण हे खरं आहे. 2016 मध्ये जगातील पहिलं न्यूड रेस्टॉरंट ‘दी बुनियादी’ हे लंडनमध्ये उघडण्यात आलं. हजारोंच्या संख्येने याठिकाणी लोक जेवण्यासाठी प्रिबुकिंग करतात. इथल्या वेट्रेस, शेफ आणि येणारी लोक हे सगळेच कपड्यांशिवाय असतात. इतकंच नाही इथले शेफ काम करतानाही कोणत्याही प्रकारचे कपडे घालत नाहीत. जेवणदेखील न्यूड राहूनच सर्व्ह करण्यात येतं.

3 – न्योताईमोरी रेस्‍टॉरंट, जपान

ADVERTISEMENT

Instagram

न्योताईमोरी याचा अर्थ आहे, महिलेच्या शरीरावर सर्व्ह करण्यात येणारं जेवण. याला ‘बॉडी सुशी’ असंही म्हटलं जातं.  या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या मोठ्या डायनिंग टेबलवर खास डिश सुशी सा साशिमी मुलींच्या वर ठेऊन सर्व्ह करण्यात येते. या मुलींच्या चारही बाजूने लोक बसून ही सुशी खात असतात. यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं वावगं वाटत नाही. कोणताही अश्लीलपणा इथे चालत नाही. न्यूड शरीरावर जेवण सर्व्ह करण्याची अशी अजब पद्धत जपानमध्ये गेले कित्येक वर्ष चालत आली आहे. आपल्याला ऐकायला विचित्र वाटत असलं तरीही तिथल्या लोकांना यामध्ये काहीच वावगं वाटत नाही.

4 – प्रीझन थीम रेस्टॉरंट , चीन

Instagram

ADVERTISEMENT

चीनमध्ये अनेक विचित्र रेस्टॉरंट्स आहेत. पण त्यापैकी प्रीझन थीम रेस्टॉरंट हे अतिशय वेगळं आणि विचित्र तऱ्हेच्या सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी तुम्हाला तुरूंगामध्ये टेबल ठेऊन जेवण सर्व्ह करण्यात येतं. हे तुम्हाला वाचायला आणि ऐकायला खूपच मजेशीर वाटेल पण याठिकाणी जेलरच्या कपड्यांमध्ये वेट्रेस तुमच्यासाठी जेवण घेऊन येतात आणि तुम्हाला सर्व्ह करतात. कोणताही गुन्हा न करता तुम्ही तुरूंगाची सफर करून येऊ शकता आणि त्याशिवाय इथलं जेवण अतिशय स्वादिष्ट असल्याचंही म्हटलं जातं.

5 – हार्ट अटॅक ग्रील रेस्टॉरंट, अमेरिका

Instagram

अमेरिकेतील लास वेगसमध्ये असणारं ‘हार्ट अटॅक ग्रील’ रेस्टॉरंट आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिश आणि थीमसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर नर्सच्या वेषातील बोल्ड वेट्रेस तुमचं स्वागत करायला तयार असतात. त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमधील रूग्णांचे कपडे घालायला या नर्स मदत करतात. हे कपडे घालूनच तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये जेऊ शकता. अन्यथा तुम्हाला इथे जेवण्याची परवानगी दिली जात नाही. याठिकाणच्या खाण्याची नावंही खूपच विचित्र आहेत. प्लेट लाईन फ्राईज, बायपास बर्गर, कोरोनेरी हॉट डॉग अशी आजारांची नावं पदार्थांना देण्यात आली आहेत. पण या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. कदाचित त्यामुळेच या रेस्टॉरंटला ‘हार्ट अटॅक ग्रील’ असं नाव देण्यात आलं असावं.

ADVERTISEMENT

6 – टॉयलेट रेस्टॉरंट, तैवान

Instagram

टॉयलेट सीटचं नक्की काम काय असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची नक्कीच गरज नाही. आपण तर याठिकाणी साधं पाणीही प्यायला घेऊन जात नाही. मग याठिकाणी जेवण हे वाचल्यावर थोडा अंगावर काटाच येतो नाही का? पण असं रेस्टॉरंट चीनमधील तैवानमध्ये बनवण्यात आलं आहे. चीनमधील या रेस्टॉरंटमध्ये टेबल अथवा खुर्ची असा कोणताही प्रकार नाही. तर टॉयलेट सीटवर बसून तुम्हाला जेवावं लागतं. टॉयलेटच्या आकाराचे आणि त्याचप्रकारची रचना या रेस्टॉरंटमध्ये करण्यात आली आहे. इतकंच नाही याठिकाणी पदार्थ आणि ड्रिंक्सदेखील टॉयलेट सीटवरच सर्व्ह करण्यात येतात.

7 – रेस्टॉरंट इन एअर, बेल्जियम

ADVERTISEMENT

Instagram

बेल्जियममधील हे असं एक रेस्टॉरंट आहे, जे हवेत आहे. तुम्हाला कदाचित हे वाचून नवल वाटेल. पण हो हे रेस्टॉरंट हवेत बांधण्यात आलं असून याची वेगळीच रचना करण्यात आली आहे. हवेमध्येच जेवण वाढलं जातं. क्रेनच्या मदतीने हवेमध्ये साधारण 50 मीटर उंच एक डायनिंग टेबल लटकवण्यात येतं आणि याठिकाणी बसून लोकं जेवणाचा आनंद घेतात. याठिकाणी प्रचंड हवा वाहत असते. पण हा एक वेगळा अनुभव असल्यामुळे या रेस्टॉरंटची चलती आहे. बऱ्याच लोकांना या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवायला आवडतं.

हेदेखील वाचा – 

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

ADVERTISEMENT

ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं

19 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT