ADVERTISEMENT
home / मनोरंजन
विशू, दगडूनंतर आता प्रथमेशला मिळाली नवी ओळख

विशू, दगडूनंतर आता प्रथमेशला मिळाली नवी ओळख

मराठी असो वा हिंदी चित्रपटसृष्टी असो…अनेकदा अभिनेत्यांना त्यांच्या नावाने कमी आणि त्यांच्या भूमिकेच्या नावाने जास्त ओळखले जाते. असंच काहीसं झालं आहे मराठीतील अभिनेता प्रथमेश परबच्या बाबतीत. ‘बालक पालक’ सिनेमाने सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या प्रथमेशला या सिनेमानंतर विशू हे नाव पडलं. तर ‘टाईमपास’ रिलीज झाल्यावर प्रथमेशला त्याचे चाहते दगडु म्हणू लागले. तर आता प्रथमेशला त्याचा नवा सिनेमा ‘टकाटक’ रिलीज झाल्यावर त्याचे चाहते या चित्रपटातल्या भूमिकेच्या नावाने हाक मारू लागलेत.

प्रथमेशला मिळालंय नवीन नाव

प्रथमेश परब आता जिथे जाईल तिथे त्याला ‘ठोक्या’ अशी हाक ऐकायला येते. याविषयी विचारला असता प्रथमेश म्हणाला की, “माझ्या सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता सोशल मीडियावरून भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सिनेमा रिलीज झाल्यावर मी चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरलो. पूर्वी कुठेही दिसलो, तर फॅन्स ‘ए दगडू’ अशी हाक मारत आता ठोक्या म्हणू लागले आहेत.“

यशाचं क्रेडीट लेखक आणि दिग्दर्शकांना

या फॅन्समधील त्याच्या लोकप्रियतेबद्दल विचारलं असता प्रथमेश म्हणाला की,“विशू काय दगडू काय किंवा ठोक्या काय .. या सर्व भूमिकांचं क्रेडिट अर्थातच माझ्या त्या-त्या सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शकांचं आहे. सध्या ठोक्या लोकांना आवडतोय. ठोक्यासारखा आपल्याला एक मित्र असावा, असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटतंय, हे त्या भूमिकेचं यश आहे. खरंतर ठोक्या सिनेमाचा हिरोच आहे. पण तो कुठेही हिरोसारखा न वावरल्याने प्रेक्षकांना आपलासा वाटतो. “

प्रथमेशसाठी हा सिनेमा पाहायला जाणा-यांची संख्या जास्त आहे, अशी चर्चासध्या सोशल मीडियावर सुरू आहे. याबद्दल विचारल्यावर प्रथमेश म्हणाला की, “हो, अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मी सुध्दा वाचतो आहे. डोक्याला जाम लावण्याचा यामध्ये माझा एक सीन आहे. तो पाहताना, प्रेक्षकांची हसता हसता अक्षरश: मुरकुंडी वळते. या चित्रपटामध्ये माझा एकही संवाद नसतानाही प्रेक्षकांनी हा सीन उचलून धरलाय.”

ADVERTISEMENT

प्रथमेशला मिळाली शाबासकीची थाप

प्रथमेशचा या सिनेमामध्ये एक मोनोलॉगही आहे. अनेक चाहते या मोनोलॉगची तुलना ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातल्या अभिनेता कार्तिक आर्यनच्या मोनोलॉगशी करत आहेत. प्रथमेश याबाबत विचारला असता म्हणाला की, “माझ्या मोनोलॉगवर चाहत्यांच्या तर प्रतिक्रिया येतच आहेत. पण फिल्ममेकर गोविंद निहलानी यांनी जेव्हा हा सिनेमा पाहिला. तेव्हा त्यांनी मला शाबासकी देत म्हटलं होतं की, हा ‘टकाटक’मधला सर्वोत्तम सीन आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या फिल्ममेकरकडून ही कौतुकाची थाप मिळणं, माझ्यासाठी खरोखर भाग्याचं आहे.”

ADVERTISEMENT

या यशानंतर आता ठोक्या म्हणजेच प्रथमेश परबच्या करिअरला पुन्हा एकदा चांगलंच बूस्ट मिळालं आहे. बेस्ट ऑफ लक प्रथमेश. 

हेही वाचा –

परफेक्शनचा हट्ट अभिनेता प्रथमेश परब पडला महाग

सर्वाधिक मानधन घेणारे मराठी कलाकार

ADVERTISEMENT

लवकरच मराठी पडद्यावर येतोय ‘सत्यशोधक’ चित्रपट

16 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT