ADVERTISEMENT
home / Uncategorized
krutika_desai_fb

अभिनेत्री कृतिका देसाईसोबत भरदिवसा घडला असा प्रकार

सर्वसामान्यांनाच नाहीतर सेलिब्सलादेखील सुरक्षा असताना अनेक विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. ‘चंद्रकांता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कृतिका देसाई (Kruitka Desai )हिच्यासोबत भरदिवसा असा काही प्रकार घडला आहे की, त्यामुळे ती चांगलीच हादरुन गेली आहे. इतकेच काय तर तिने घटनेचा व्हिडिओ शेअर करत इतरांनाही अशा टोळीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. फिल्मसिटीतून शूटिंग आटपून घरी परतत असताना तिला थांबवून तिला लुटण्याच्या इराद्याने आलेल्या चोरांचा हा व्हिडिओ असून सध्या तिने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. कृतिका देसाईसोबत नक्की झालं तरी काय चला घेऊया हा सगळा प्रकार जाणून

ड्रग्न असल्याचा संशय

अभिनेत्री कृतिका देसाई आपले गोरेगाव फिल्मसिटीतून निघाली होती. गोकुलधाम ते फिल्मसिटी या दरम्यान तिला तीन जणांनी थांबवले. पोलीस असल्याचा आव आणून त्यांनी तिला गाडी तपासायची आहे असे सांगितले.  गाडी तपासण्यासाठी त्यांनी जे कारण दिले ते धक्कादायक होते. त्या दुचाकीस्वारांच्या मते या गाडीत ड्रग्ज असल्याची माहिती होती. त्यामुळे त्यांना गाडी तपासायची होती. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ कृतिका हिने रेकॉर्ड केला आहे. सुदैवाने ती त्यांचे चेहरे रेकॉर्ड करु शकली आहे.  ती या व्हिडिओमध्ये लेडी कॉन्स्टेबल आणा असे देखील सांगते. पण तो व्यक्ती तिच्याशी न बोलता कृतिकाच्या ड्रायव्हरशी बोलताना दिसतो. कृतिका ओरडतेय हे कळल्यावर तो गाडीपासून थोडा लांबही झाला आहे. ती काही फसत नाही हे कळल्यानंतर त्यांनी तिला पुन्हा काही अडवले नाही असे दिसतेय. पण अशाप्रकारे पोलीस असल्याचे सांगून कोणाचीही फसवणूक करण्याचा हा प्रकार फारच भयानक असल्याचे तिने सांगितले आणि लोकांना सावध होण्याचा सल्ला दिला आहे. 

अधिक वाचा: या कारणामुळे लाडकी चंद्रा होऊ लागली आहे ट्रोल

केले सावध

ही पोस्ट कृतिकाने आठवडापूर्वी केलेली आहे. पण हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या फसवणुकीच्या अनेक घटना घडत असताना या नव्या व्हिडिओमुळे हा एक प्रकार समोर आला आहे. कृतिका या संदर्भात रितसर तक्रार करणार होती. याचा पुढे काय तपास करण्यात आला आहे हे अदयाप कळलेले नाही. पण कार चालकांनी किंवा कोणीही असो अशा गोष्टीला घाबरुन जाऊ नये हाच संदेश यातून घेण्यासारखा आहे. 

ADVERTISEMENT

अभिज्ञा भावेचा फोन चोरीला

काहीच दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला होती. रिक्षातून प्रवास करताना तिचा फोन तिच्या हातातून चोरांनी खेचला आणि पळ काढला होता. ही घटना ताजी असतानाच कृतिकासोबत घडलेला हा प्रकार खरंतर धक्कादायकच आहे असे म्हणायला हवे. 

अधिक वाचा : चाहत्यांची प्रतीक्षा संपली, ब्रह्मास्त्रचे ट्रेलर अखेर झाले रिलीज

कृतिकासोबत घडलेला हा प्रकार खरंच धक्कादायक होता. दरम्यान कृतिका ही सध्या मालिकेत काम करत असून तिचे रोजचे शूट रुटीन सुरु असते.

17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT