ADVERTISEMENT
home / मनोरंजन
amruta_khanvilkar_got_trolled

या कारणामुळे लाडकी चंद्रा होऊ लागली आहे ट्रोल

 चंद्रमुखी चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) चांगलीच चर्चेत आली आहे.  तिच्या साडीपासून तिच्या एक एक अदा चाहत्यांना आवडल्या होत्या. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तिने घेतलेली मेहनतदेखील वाखाणण्यासारखी होती. पण आता आणखी एका कारणामुळे अमृता चर्चेत दिसत आहे. ही चर्चा चांगल्या कारणासाठी नाही. खरंतर  कमेंट करताना दाखवलेली एक्सायटमेंट तिला भारी पडली आहे असेच काहीसे दिसत आहे. अमृताने नेमके असे काय केले? चला घेऊया जाणून 

अधिक वाचा: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

चित्रपटाच्या ट्रेलरवर केली कमेंट

खरंतरं आज ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला पाहून अनेकांनी आलियाची तारीफ केली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक जण प्रतिक्षा पाहात आहेत. फायनली हा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे खूप जणांनी कमेंट केली आहे. पण यामध्ये एका कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती कमेंट आहे अमृता खानविलकरची. अमृताने आलियाच्या पोस्टखाली अशी काही कमेंट केली आहे की, त्यामुळे अनेकांनी तिला तू जरा अतिच करतेय असे म्हटले आहे. हा ट्रेलर इतकाही चांगला नाही असे त्याने म्हटले आहे. दुसरीकडे अमृताची बाजू घेण्यासाठी तिचा फॅन फॉलोअर्स सज्ज झाला. अमृताची बाजू घेत अनेकांनी तो ट्रेलर चांगलाच आहे अशी कमेंट केली आहे. 

ट्रेलरला मिळाला चांगला प्रतिसाद

ज्या कारणासाठी अमृता ट्रोल झाली आहे. ते कारण म्हणजे ब्रम्हास्त्र चा ट्रेलर. आलिया- रणबीरच्या लग्नादरम्यान या मधील केसरीया हे गाणं रिलीज करण्यात आलं. त्याआधीपासून या चित्रपटाने चांगलाच बझ केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होईल अशी प्रतिक्षा अनेक जण पाहात असताना अखेर हा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा पहिला भाग शिवावर असणार आहे. त्याच्याकडे असलेल्या शक्ती आणि त्यापासून तो सृष्टीचे संरक्षण कसे करणार हे दाखवण्यात आले आहे. भरपूर ॲनिमेशन असलेल्या या चित्रपटाची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 

ADVERTISEMENT

अमृता आणि तिच्या अदा

अमृताने तिच्या चंद्रमुखी या चित्रपटासाठी वर्षभरापूर्वी तयारी सुरु केली होती. तिने या भूमिकेसाठी आपले वजनही वाढवले होते. तिने या चित्रपटासाठी खास नाकंही टोचलं. हे सारे व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चंद्रमुखी चित्रपटासाठी तिने विशेष मेहनत घेतलेली दिसते. या चित्रपटात तिने सादर केलेली लावणी तर इतकी सुंदर होती की, अनेकांनी हे गाणं डोक्यावर घेतलं. याचे प्रमोशन करताना सगळ्यांच्या नजरा या अमृता आणि तिच्या साड्यांवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यामुळे तिच्या साड्या देखील चांगल्याच गाजल्या. गेल्या काही दिवसांपासून अमृताच्या सोशल मीडियावर चांगलाच ट्राफिक होताना दिसत आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओही खूप प्रसिद्ध होताना दिसत आहे.

पण अशा पद्धथीने कमेंट करणे हे अमृताला चांगलेच महागात पडले आहे हे नक्की! 

अधिक वाचा: आकाशाला गवसणी घालणाऱ्या ‘अनन्या’चा टीझर प्रदर्शित

16 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT