ADVERTISEMENT
home / मनोरंजन
प्रियामणी

दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळते चुकीची वागणूक, अभिनेत्रीने केला खुलासा

 साऊथचे चित्रपट हे अनेकांना हिंदी चित्रपटांपेक्षाही जास्त आवडतात. त्यामुळेच या चित्रपटांचे हमखास हिंदी डबिंग केले जाते. त्यामुळे टॉलीवूड बॉलिवूडपेक्षा नक्कीच सरस असल्याचे आपल्याला वाटते. पण अनेक दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडचा खूपच वाईट अनुभव आल्याचे दिसत आहे. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने तिला आलेला अनुभव सांगत ही धक्कादायक माहिती दिली आहे.  फॅमिली मॅन या प्रसिद्ध सीरिजमधून सगळ्यांच्या समोर आलेली साऊथची अभिनेत्री प्रियमणी हिने एका मुलाखतीदरम्यान तिला आलेला आपला अनुभव सांगितला आहे.  याची चर्चा आता जोरदार सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

काय म्हणाली प्रियमणी

 प्रियमणीने सांगितल्याप्रमाणे अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये एखादं दोन पात्र साऊथ इंडियन तरी असते. अशावेळी ज्या कलाकारांना हे पात्र साकारयला दिले जाते. त्यांच्या ओठी मराठी ही अजिबात चांगली नसते असे दाखवले जाते. पण असे अजिबात नाही. आमचा हेल तिकडचा असला तरी आता अनेक कलाकारांना उत्तम हिंदी बोलता येते. यापूर्वीही साऊथच्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये राज्य गाजवले आहे. रेखा, हेमामालिनी, श्रीदेवी अशी काही कलाकारांची नावे आहेत. ज्यांच्या उत्तम हिंदी आणि संवादकौशल्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. असे असताना हिंदी चित्रपटात कायम दाक्षिणात्य पात्र साकारताना त्यांची हिंदी अशी का असते? असे विचारत तिने आपल्या सहकलाकारांची बाजू मांडली आहे. 

#unshaved आर्म्सचा फोटो शेअर करत या अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

दाक्षिणात्य कलाकारांची उडवली जाते खिल्ली

दाक्षिणात्य भाषेमध्ये अनेक प्रकार आहेत. तामिळ, तेलगु, मल्याळम, अशा वेगवेगळ्या भाषा येतात. या सगळ्या भाषांमधील फरक फारच कमी लोकांना माहीत असेल. पण साऊथ म्हटले की, लोक आईयो, कैसा जी, क्या बोलता जी असे काही शब्द वापरले जातात. जे अत्यंत चुकीचे आहे. हा एक प्रकारे आमचा अपमान आहे. ही आमची भाषा आहे आणि हा आमचा अभिमान आहे. त्यामुळे अशाप्रकारे आमची प्रतिमा मलीन करणे हे फारच चुकीचे आहे. हिंदी चित्रपट वगळता अनेक चित्रपट पाहिले आहेत. पण त्या कोणत्याच चित्रपटात भाषेचा आणि लोकांचा अपमान केला जात नाही.  त्यामुळे हे फक्त बॉलिवूडमध्येच दिसून येते. पण हे चुकीचं आहे. आता काही ठिकाणी असे होतही नसेल. अनेक बदल घडताना देखील दिसत आहे. पण या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या ज्या व्यक्त करणे देखील गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

उठून दिसली भूमिकेत

प्रियामणी ही हिंदीतील अत्यंत गाजलेल्या अशा ‘फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये दिसली होती. त्यात तिने साकारलेले पात्र हे उत्तम होते. घर आणि जबाबदाऱ्या सांभाळताना येणारी व्यवधान. नवरा सिक्रेट एजंट आहे, देशासाठी काम करतो हे माहीत नसणं, त्याचं वेळ न देणं त्यामुळे तिने चुकीच्या माणसाशी प्रेमात पडणं असे सगळे काही यामध्ये पाहायला मिळाले. यामध्ये तिने दाक्षिणात्य भूमिका केल्यामुळे ती तिला अधिक चांगल्या पद्धतीने करता आली. त्यामुळे प्रियामणी सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे.

तिने केलेल्या या वक्त्यावर नक्कीच लक्ष देणे फारच गरजेचे झाले आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला सांगलायला विसरु नका.

” धर्मवीर” चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

30 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT