ADVERTISEMENT
home / मनोरंजन
तिलोत्तमा शोम

#unshaved आर्म्सचा फोटो शेअर करत या अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

देवाने दिलेल्या आपल्या अवयवाचा आपल्याला अभिमान हा असायलाच हवा.  आपले शरीर आपले मंदिर आहे असे समजून जे काही दिले आहे याचा मान राखणे फारच गरजेचे असते. आता काखेतील केस… महिलांच्या काखेत प्युबरटीनंतर येणारे केस हे अगदी सर्वसामान्य आहेत. त्याची लाज कशाला बाळगायला हवी. लोक काय म्हणतील याचा विचार न करता एका अभिनेत्रीने हात वर करत आपला एक असा फोटो शेअर केला आहे याची चर्चा आता सगळ्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे. ही बिनधास्त अभिनेत्री आहे तिलोत्तमा शोम. जाणून घेऊया या विषयी अधिक

मौनी रॉय चढणार बोहल्यावर, हळदी-मेहंदीचे व्हिडिओ व्हायरल

सॉरी बट नॉट सॉरी

तिलोत्तमाने काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिने अंडरआर्म्सवर वर केलेले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने तिच्या काखेतील केस मुद्दाम दाखवलेले आहेत. माझे शरीर माझे आहे. आणि त्यातील सगळ्या गोष्टी या माझ्यासाठी अभिमानाच्या आहेत. मला माझा असा फोटो शेअर करताना अजिबात माफी मागायची नाही. मी काखेतील केस काढते आणि नाही सुद्धा त्यामुळे तिची चर्चा होत आहे. तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. त्यावर अनअपोलोजेटिक असे लिहले आहे. म्हणजेच याचा अर्थ हा माफी मागायची गरज नाही असाच होतो. त्यामुळे तिची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. ती पहिली सेलिब्रिटी नाही जिने असा फोटो शेअर केला आहे. पण तिने हा फोटो शेअर करत सगळया महिलांसाठी एक प्रेरणा दिली आहे. 

तिलोत्तमाला मिळाले अनेक पुरस्कार

तिलोत्तमाला पाहिल्यानंतर ती फार ग्लॅमरस असते नाही. ती हाडाची कलाकार आहे. ती तिच्या लुककडे लक्ष देण्यापेक्षा तिच्या अभिनयाकडे लक्ष देते. तिचे अनेक फोटो हे अनफिल्टर्ड असतात. त्यामुळे तिच्या फोटोजना तिच्या फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळते. तिलोत्तमाचा नुकताच सर नावाचा एक चित्रपट नेटफ्लिक्सवर येऊन गेला. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तिलोत्तमाला यासाठी खूप चांगल्या प्रतिक्रिया देखील मिळाल्या. त्यामुळे तिचा हा चित्रपट जर कोणी पाहिला नसेल तर तो नक्की पाहायला हवा.

ADVERTISEMENT

रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदाच बोलली रुबिना दिलैक

‘सर’मध्ये दिसली एक वेगळी तिलोत्तमा

तिलोत्तमाचा एक नवा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर आलाय. या चित्रपटाच तिने एका मोलकरणीची भूमिका साकारली आहे. एका मोठ्या घरात केवळ एका पुरुषासाठी काम करताना तिला अनेक जण वेगवेगळे प्रश्न विचारतात. पण नेटाने काम करायचे शिलाईकाम शिकून मोठे व्हायचे असे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती या घरात काम करते. मालकाचे अचानक तुटलेले लग्न यामुळे तिला पुन्हा कामावर यावे लागते.  ती काम करते. शिलाईकाम शिकते. पण अचानक घर मालक तिच्या प्रेमात पडतो. हे प्रेम खरे असते. त्यामुळेच त्याला तिच्यापासून दूर जाणे शक्य नसते. तो त्या प्रेमाची कबुली मित्राकडे आणि घरातल्यांकडे देतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी तो देश सोडून जातो. कारण इतरांना ते कधीही पचनी पडणारे नसते. पण तो देश सोडून गेला तरी तिला विसरलेला नसतो. कारण तिच्या शिलाईचे वेड तो लक्षात ठेवून तिला तो तसे काम मिळवून देतो. 

आता तिलोत्तमाचा हा फोटो पाहून चर्चा तर होणारच ना!

शाहिद कपूरच्या जर्सीला मिळाली नवी रिलीज डेट, कोरोनामुळे होता रखडला

ADVERTISEMENT
28 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT