ADVERTISEMENT
home / मनोरंजन
anand-dighes-biography-will-be-revealed-in-the-movie-dharmaveer

” धर्मवीर” चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध रुपातील आनंद दिघे यांचा जीवनपट “धर्मवीर” या चित्रपटातूून प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.  मंगेश देसाईचं (Mangesh Desai) निर्मितीमध्ये पदार्पण, प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Tarade) यांचं लेखन आणि दिग्दर्शन आहे.  अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून आपलं अभिनेता म्हणून स्थान निर्माण केलेले मंगेश देसाई साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे “धर्मवीर” या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी अतिशय आव्हानात्मक विषयाची निवड केली आहे. 

अधिक वाचा – मौनी रॉय चढणार बोहल्यावर, हळदी-मेहंदीचे व्हिडिओ व्हायरल

प्रवीण तरडे नव्या विषयासाठी सज्ज 

“देऊळ बंद”, “मुळशी पॅटर्न” यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटानंतर “धर्मवीर” चित्रपटाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रविण विठ्ठल तरडे सज्ज असून लेखन आणि दिग्दर्शन हे त्यांचे आहे.  केदार गायकवाड सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहत असून या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. “धर्मवीर” चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वी निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचं चित्रीकरण सध्या ठाणे येथे सुरू झालं आहे. आनंद दिघे यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याची आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्याकडे बाळासाहेब आणि आनंद दिघे हे दोघेही देवाच्या ठिकाणी मानली जाणारी माणसं आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांच्यावरील चित्रपट नक्की कसा असणार याचीही उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तर आनंद दिघे यांच्या भूमिकेत नक्की कोणता अभिनेता बाजी मारणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजूनही ही सर्व माहिती गुलदस्त्यातच आहे. 

अधिक वाचा – इंदौरमध्ये पूर्ण झालं सारा आणि विकीच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग

ADVERTISEMENT

कसा असेल चित्रपट

या चित्रपटासाठी अनेकांची निवड चाचणी करण्यात आली होती असं सांगण्यात येतं. त्यामुळे यामधील कलाकार आणि याची कथा पटकथा या सगळ्याबाबत एक उत्सुकता निर्माण झाली आहे. कसा असेल हा चित्रपट याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. प्रवीण तरडे यांनी आतापर्यंत लिहिलेल्या कथा या नेहमीच गाजल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतही वेगळीच आशा निर्माण झाली आहे. त्यात आनंद दिघे हे असे व्यक्तिमत्व होते की, त्यांच्याबाबत जितके बोलावे तितके कमी आहे. त्यामुळे कोणता कलाकार हे अभिनयाचं शिवधनुष्य पेलणार आहे याबाबतही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र हे लवकरच आता कळेल असा विश्वासही प्रेक्षकांना आहे. तर मंगेश देसाई पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकत असून वेगळा विषय हाताळत आहेत याबाबतही अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. लवकरच याबाबत उलगडा होईल असे प्रेक्षकांना वाटत असून ही उत्सुकता मात्र नक्कीच ताणली गेली आहे. 

अधिक वाचा – #unshaved आर्म्सचा फोटो शेअर करत या अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT